तुमच्या मुलाच्या अभ्यासात मदत व्हावी या हेतूने वेबसाईट निवडण्यापूर्वी हे चार प्रश्न जरूर विचारात घ्या:

 

कॉम्प्युटरच्या मदतीने अभ्यास करणे म्हणजे मुलांसाठी आनंदाची पर्वणी असते. मात्र मुले योग्य वेबसाईटचा वापर करत आहेत, ह्याची खात्री करणेही आवश्यक असते. ज्या वेबसाईट्समध्ये शिकवण्याबरोबरच मनोरंजनावर देखील भर दिलेला असतो, अशा वेबसाईट्स मुलांना खिळवून ठेवू शकतात. परिणामी मुले अभ्यासात अधिक रस घेतात.
योग्य वेबसाईट शोधणे हे अतिशय जिकीरीचे आणि आव्हानात्मक काम आहे. ज्या वेबसाईटमध्ये तुमच्या मुलांच्या दृष्टीने उपयुक्त असलेला अभ्यासविषय आहे आणि ती रंजकही आहे, अशी वेबसाईट निवडणे आवश्यक असते.
तुमच्या मुलांचा अभ्यास उत्तम रीतीने व्हावा म्हणून योग्य वेबसाईट निवडण्यासाठी एक चेकलिस्ट तुमच्यासाठी देत आहोत.

१. तुमच्या मुलाच्या अभ्यासाविषयक गरजा याद्वारे पूर्ण होत आहेत का?

तुम्ही निवडलेली वेबसाईट तुमच्या मुलाच्या अभ्यासाच्या पातळीनुसार योग्य असायला हवी. त्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्या मुलाचे वय आणि इयत्ता. ह्या दोन घटकांव्यतिरिक्त मुलाच्या विकासासाठी कोणत्या विषय आणि कौशल्यांवर भर देणे गरजेचे आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. तुमच्या मुलांना आव्हानात्मक वाटेल अशी इंटरॅक्टिव्ह वेबसाईट निवडा.

२. ती मोफत वापरासाठी आहे का?

बऱ्याचशा वेबसाईट्स ह्या ‘फ्रीमियम’ रचनेच्या असतात. म्हणजे त्या वेबसाईटवरील माहिती एका ठरावीक मर्यादेपर्यंतच वापरता येते. ती वेबसाईट निवडण्यापूर्वीच तिचे किंमत तपासून घ्यावी. अन्यथा, निवडल्यानंतर तिच्या किंमतीबद्दलची काही गुप्त माहिती (हिडन कॉस्ट) अचानकपणे समोर आली तर, तुमच्या मुलाच्या अभ्यासात व्यत्यय यायला नको. युजर रेटिंग्ज (आधीच्या वापरकर्त्यांची पसंती), त्यांचे अभिप्राय (रिव्ह्यूज) आणि शिक्षकांची शिफारस (रेकमेंडेशन) या गोष्टींमुळे, त्या वेबसाईटसाठी पैसे द्यायचे की दुसरी वेबसाईट शोधायची, हे तुम्हाला ठरवता येईल.

३. माहिती मुलांच्या अभ्यासाशी संबंधित आहे का?

योग्य माहिती आणि योग्य साधने तुमच्या मुलांच्या अभ्यासाला छान वळण देऊ शकतात. समवयीन मुले आणि त्या क्षेत्रातील विषय-तज्ञ यांची त्या वेबसाईटला असलेली पसंती ही त्या वेबसाईटच्या उपयुक्ततेची आणखी एक पावती ठरू शकते. त्या वेबसाईटवरील विषय-सामग्री (कंटेंट)ची, त्याविषयी वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध असलेले अभिप्राय, तसेच तुमच्या मुलाच्या शिक्षकांकडे चौकशी करून आणि त्यांच्या मित्रांच्या मते घेऊन खात्री करून घ्या.

४. त्या माहितीचा वापर करणे सुरक्षित आहे का?

ऑनलाईन सेफ्टी (ऑनलाईन सुरक्षितता) हा पालकांसाठी खूप चिंतेचा विषय आहे, हे अगदी साहजिक आहे. पालकांनी त्या वेबसाईटवरील मालवेअर, पॉप-अप्स, वैयक्तिक माहिती फसवणुकीने काढून घेण्याच्या छुप्या उद्देशाने वारंवार दिसणाऱ्या जाहिराती (इन्व्हेजिव्ह जाहिराती) आणि खोट्या लिंक्स यांची सुरक्षितता आणि विश्वासार्हता पारखण्यासाठी त्या वेबसाईटची अगदी सखोल तपासणी केली पाहिजे. मुलांच्या दृष्टीने अधिक दक्ष राहायचे असेल तर, पालक गुगल ट्रान्स्परन्सी रिपोर्ट टूलच्या मदतीने, मुलांना वापरण्यास उपयुक्त नसलेल्या वेबसाईट्सची माहिती मिळवू शकतात.

पायरी १. तुम्हाला तपासून पहायची असलेल्या वेबसाईटची लिंक कॉपी करून पेस्ट करा.

 

पायरी २. एन्टर की दाबा.

 

पायरी ३. रिझल्ट पाहा.
संवाद असणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच मोठ्या मुलांशी आणि तुमच्या मुलाच्या वर्गातील मुलांशी सतत संपर्कात रहा आणि त्यांची मते सुद्धा जाणून घ्या. त्याचप्रमाणे तुम्ही निवडलेला पीसी (कॉम्प्युटर) हा सुद्धा योग्य असल्याची खात्री करून घ्या - https://www.dellaarambh.com/marathi/pick-right-school-pc/