शिकविताना प्रत्येक शिक्षकाने लक्षात ठेवाव्यात अशा चार गोष्टी

 

पीसी केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांनादेखिल शिकण्यासाठी प्रोत्साहन देताना नविन पद्धतींचे प्रयोग करून सृजनशील आणि संशोधक बनण्याचा वाव देतो.

मिस. आकांक्षा बक्षीजॉइंट डायरेक्टर सीडलिंग इंटरनॅशनल अकॅडमी

विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षकांची भूमिका नेहमीच महत्वाची असते. संशोधनाने हे सिद्ध केले आहे कि चांगले शिक्षक विद्यार्थ्याच्या केवळ शालेय जीवनातच नाही तर पुढील आयुष्यभराच्या कारकीर्दीमध्ये देखिल बदल घडवू शकतात. [1] उत्कट, स्फूर्तीदायक आणि परिणामकारक शिक्षक चांगल्या शिक्षणाचा पाया रचतात.

योग्य दिशेने काही थोडे प्रयत्न करून शिक्षक विद्यार्थ्यांचे अभ्यास आणि शिक्षणाबरोबरचे नाते सुदृढ करू शकतात.

1. संवादात्मक क्टिविटी करून शिकवा

एका नविन UChicago-led अभ्यासाप्रमाणे असे दिसून आले आहे कि जे विद्यार्थी पारंपारिक पद्धतीने केवळ पाठांतर करून अभ्यास करतात त्यांच्यापेक्षा जे विद्यार्थी शिकलेल्या संकल्पना प्रत्यक्षात वापरतात ते परिक्षेत जास्त चांगले यश मिळवतात. [2] शिकविवेल्या गोष्टींशी संबंधित फिल्ड ट्रिप्स, आभासी प्रतिमा उभारणी, लॅब व्हिजिट्स आणि ग्रुप ॲक्टिविटी चा वापर लर्निंग बाय डूइंग (कृतीने शिका) या पद्धतीमध्ये केला जातो.

2. सहकार्याला शिक्षणाचा एक भाग बनवा

विद्यार्थ्यांमधील आंतरवैयक्तिक, काल व्यवस्थापन आणि  संघटनकौशल्ये विकसित करण्यासाठी सहकार्यात्मक प्रोजेक्टची खूप मदत होते. ग्रुप ॲक्टिविटीज साठी तुम्ही विविध प्रकारची चर्चासत्र, प्रेझेंटेशन तयार करणे, रिपोर्ट्स बनविणे आणि वैचारिक सत्रांचा वापर करू शकता. या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांच्या हे लक्षात येईल की ते कोणत्या गोष्टींमध्ये तरबेज आहेत आणि कोणत्या गोष्टींमध्ये त्यांना जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे.

3. आपली बलस्थाने आणि कमकुवतपणा ओळखणे

जर एखाद्या विद्यार्थ्यामध्ये भाषाकौशल्ये विकसित असलेली प्रमुख्याने आढळून येत असतील तर अशा विद्यार्थ्याला वक्तृत्वस्पर्धा  आणि वादविवाद स्पर्धा यांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. याउलट जर एखादा विद्यार्थी एखाद्या विषयात कच्चा असल्याचे आढळून आले तर त्याला Wikispace classroom  [3]  सारख्या गोष्टींद्वारे त्या विषयाशी संबंधित शैक्षणिक स्त्रोत उपलब्ध करून दिले पाहिजेत. तसेच ग्रुप प्रोजेक्ट दिल्यामुळे विद्यार्थी एकमेकांकडून देखिल शिकतात.

4. पीसी चा वापर करून शिकण्याची सवय लावा

शिकण्यासाठी पीसी चा वापर केल्याने विद्यार्थ्यांना ते विषय नीट समजण्यास आणि त्या विषयाचे सखोल ज्ञान मिळण्यास मदत होते. प्रतिकृतींपासून ते ऑनलाइन टूल्स पर्यंत सर्व प्रकारची साधने पीसी मुळे विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात.[4] घोकंपट्टीपेक्षा या मार्गाने शिकल्यास विद्यार्थ्यांना संकल्पना नीट समजतात आणि त्या चांगल्या लक्षात राहतात ज्याचा फायदा विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही होतो.

शिक्षकांना देखिल रोज नविन गोष्टी शिकायला मिळतात. या सर्व पद्धतींचा वापर केल्यास विद्यार्थ्यांची अभ्यासाबद्दलची गोडी नक्कीच वाढेल आणि वर्गात उत्साहाचे वातावरण राहील.

#DellAarambh चा वापर करून आम्हाला Tweet करा आणि सांगा की तुम्ही तुमच्या वर्गातील शैक्षणिक अनुभव कसा विकसित करत आहात.