तुमची अध्यापन कौशल्ये विकसित करण्यासाठी तुम्ही कराव्यात अशा चार गोष्टी

 

 

आपल्या भोवतालच्या जगात सध्या तंत्रज्ञानाला भरपूर प्रसिद्धी मिळत आहे - आपल्या वर्गांमध्ये देखिल त्याला जागा मिळणे स्वाभाविकच आहे. तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना उपलब्ध होणारे अमर्यादित ज्ञान आणि स्त्रोत याचा तुम्हाला वर्गात शिकविताना नक्कीच फायदा होऊ शकतो.

तुमची अध्यापन कौशल्ये विकसित करण्यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या चार गोष्टींचा वापर करू शकता :

1. महत्वाच्या गोष्टी आधी - अभिप्राय मिळवा

तुमच्या व्यावसायिक वृद्धीसाठी, सोबत काम करणारे इतर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याकडून तुमच्या बद्दल अभिप्राय मिळवा. अभिप्राय मिळविण्यासाठी एक तर तुम्ही वर्गातील तास संपल्यानंतर विचारू शकता किंवा तपशीलवार प्रश्न असलेले Question Pro सर्वेक्षण पाठवू शकता. मिळालेल्या प्रतिसादांच्या आधारे तुम्ही तुमची बलस्थाने अधिक बळकट करू शकता तसेच ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला सुधारणा करण्याची आवश्यकता आहे त्या समजून घेऊन सुधारू शकता.

2. वाचनाची सवय लावून घ्या

अभ्यासक्रम नियोजन करणे, सलग विविध वर्गांना शिकविणे, प्रश्नपत्रिका तयार करणे इत्यादी गोष्टींमधून मोकळा वेळ मिळणे फार अवघड असते. परंतु या धावपळीतून तुम्ही किमान 15 मिनिटांचा वेळ काढून तुमच्या कामाशी संबंधित गोष्टी Google Scholar वर वाचू शकलात तर तुमची नक्कीच प्रगती होत राहील. तुम्ही वाचलेला प्रत्येक लेख तुम्हाला वर्गात वेगवेगळे प्रयोग करून पाहण्यासाठी प्रोत्साहित करत राहील. तुम्ही जे वाचन करता त्याने तुमचे ज्ञान तर वाढतेच, पण त्याचबरोबर तणाव कमी होण्यास देखिल मदत होते. वाचनामुळे तुमची लेखन कौशल्ये आणि विश्लेषण कौशल्ये देखिल विकसित होतात.

3. शिक्षक नसलेल्या तुमच्या इतर मित्रांबरोबर संभाषण करा

तुमच्या शिकविण्याच्या पद्धतींवर पूर्णपणे वेगळ्या दृष्टीकोनातून मत मिळविण्यासाठी तुमच्या अशा मित्रांबरोबर बोला जे शिक्षकी पेशामधले नाहीत. त्यांच्या प्रतिसादांमुळे तुम्हाला कदाचित अशा काही गोष्टी समजून येतील ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. तसेच अशा गप्पांमधून तुम्हाला काही वेळासाठी कामाच्या तणावातून मुक्तता मिळून तुमचे मन हलके होण्यास मदत मिळेल.

4. शिकणे बंद करू नका

शिक्षकांनी शिकविले पाहिजेच पण त्याचबरोबर स्वतः शिकणे देखिल चालू ठेवा. एखादा ऑनलाइन कोर्स करा किंवा आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसांत करता येईल असा एखादा डिप्लोमा करा. अशा गोष्टींमधून शिकत राहिल्याने तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील चढाओढीमध्ये नेहमीच आघाडीवर रहाता येईल तसेच तुमच्या क्षेत्रातील सर्व अद्यावत माहिती तुमच्याकडे असेल. तुमच्या जिज्ञासेला वाव द्या.

जर तुम्ही पहिल्यांदाच शिकवत असाल आणि योग्य प्रकारे सुरूवात करायची तुमची इच्छा असेल, तर त्यासाठी पीसी ची मदत घेतल्यास तुमची अध्यापन कौशल्ये अधिक प्रभावशाली बनतील. धड्यांच्या योजना बनविणे असो किंवा विद्यार्थ्यांना आवडेल असा गृहपाठ देणे असो, तुम्हाला चांगली सुरूवात करण्यास मदत करतील असे काही महत्वाचे मुद्दे आम्ही एकत्रित केले आहेत.