पीसी शिकण्याची मजा कशी वाढवतो, त्याचे चार प्रकार!

“आपण लोकांना शिक्षणाकडे आणण्यापेक्षा शिक्षणाला लोकांपर्यंत न्यायला हवे.’’

-इलियट मेसी

 

प्रत्येक विषय काही प्रत्येकाला कंटाळवाणा वाटत नाही. त्याचप्रमाणे, जन्मत:च एखादा विषय खूप आवडतो, असेही होत नाही. एखादा एकसुरी किंवा रटाळ वाटणारा विषय मनोरंजक पद्धतीने किंवा मुलांना त्यात रस वाटेल अशा पद्धतीने शिकवणे, हे एखाद्या शिक्षकासाठी खूप आव्हानात्मक असते. आणि योग्य पद्धत अवलंबली नाही तर शिकवणे खूप कठीण होऊ शकते. म्हणूनच शिकवण्यासाठी पीसीचा उपयोग किंवा मदत घेणे चांगले. तुमचे विद्यार्थी शिकण्याच्या प्रक्रियेत अधिकाधिक  गुंतलेले राहावे किंवा त्यांनी आवडीने, लक्ष देऊन शिकावे यासाठी पीसीवर वेगवेगळे पर्याय/मार्ग उपलब्ध आहेत. कंटाळवाणे विषय पीसीच्या मदतीने शिकवल्यास कंटाळवाणे तर वाटणार नाहीतच उलट अधिक रंजक होतील.


1. इतिहास

एखाद्या प्रसिद्ध सिनेमात जशी रंजकता असते, तशी सगळी वैशिष्ट्ये इतिहास या विषयात असतात. त्यामुळे हा विषय शिकायला मुले अत्यंत उत्साही असायला हवीत. शिक्षकांनी शिकवताना दृक्श्राव्य माध्यम म्हणजेच व्हिज्युअल मिडीयाच्या मदतीने शिकवले, तर एरवी मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा कंटाळा कुठल्याकुठे पळून जाईल. सिनेमा तयार करणाऱ्यांना (फिल्ममेकर्स) त्यांच्या सिनेमाच्या विषयाबद्दल अत्यंत प्रेम असते. उदा:- हॉलोकॉस्टचे (विशेषत: आगीने होणारा मानवी जीवनाचा विध्वंस) गांभीर्य मुलांना समजावून सांगायचे असेल तर तुम्ही त्यांना द पियानिस्ट किंवा शिंडलर्स लिस्ट किंवा द डायरी ऑफ अॅन फ्रँक दाखवाल. हे सिनेमे पाहून झाल्यानंतर त्यातल्या ऐतिहासिक संदर्भाच्या अचूकतेविषयी आणि सिनेमाल्या कोणत्या भागांमध्ये त्याच्याशी साधर्म्य दाखवणारे प्रसंग आहेत, याविषयी तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता. शिवाय, पीसी रिसोर्सेस (स्रोत) वापरून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात साहित्य संपदा शोधण्यासाठी प्रवृत्त करा.

 

2. विज्ञान

जगाच्या पाठीवर सगळ्याच मुलांचा एक आवडता प्रश्न असतो आणि तो म्हणजे “का?’’ या जगाविषयी त्यांना असलेल्या नैसर्गिक कुतूहल आणि चिकित्सक वृतीला खत पाणी घालून किंवा प्रवृत्त करून आणि या प्रश्नांची उत्तरे त्यांनी स्वत:च शोधावीत असे वाटत असेल, तसेच मुलांना पुस्तकांच्या जगाबाहेरची सैर घडवायची असेल तर प्रॅक्टिकल अॅप्लिकेशन ऑफ सायन्स (विज्ञानाचे प्रत्यक्ष उपयोजन) दाखवणे हा सर्वोत्तम उपाय आहे. या प्रक्रियेमध्ये त्यांनी सहभागी करून घेण्यासाठी त्यांना त्यासंबंधी चर्चा करू देण्याची मुभा देणे आवश्यक आहे. त्यानंतर, प्रयोगांकडे निर्देश करून नुकताच शिकलेला सिद्धांत ते कशा प्रकारे प्रत्यक्षात आणू शकतात हे दाखवा. अशाप्रकारे विज्ञान शिकण्यात मुलांचा रस वाढू शकतो आणि ते त्यांना मजेशीर वाटू शकते.

 

3. गणित

काही विद्यार्थ्यांना गणिताचा अभ्यास करणे म्हणजे प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहण्या इतके कठीण वाटते. आकडेमोड हे मुलांसमोर एक मोठं आव्हान असतं. सुदैवाने तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना आपण गणिताची गोडी लावू शकतो. या वेबसाईट्सवर इंटरॅक्टिव्ह अॅक्टिविटीज (अभ्यास) आणि दृष्यात्मक सादरीकरणे (प्रेझेन्टेशन्स) असतात त्यामुळे विद्यार्थी त्याच्या अभ्यासात खूप दंगून जातात. वर्गात शिकलेल्या संकल्पना खऱ्या जगात किंवा दैनंदिन जीवनात कशा वापरल्या जातात हे समजते तेंव्हा आपण काय शिकतोय याचे मुलांना आपोआपच आकलन होते.

 

4. भूगोल

भूगोलाचा एक धडा शिकणे म्हणजे वर्गात बसल्या बसल्या जगाची सैर करून येण्यासारखं आहे. नकाश्यावर वेगवेगळे देश शोधणे असो किंवा देशादेशांनुसार बदलणाऱ्या वेळा (Time Zone) असोत. पीसीच्या मदतीने, विद्यार्थी Google Earth च्या दृष्टीकोनातून सगळ्या जगाचा अभ्यास करू शकतात. विद्यार्थी ज्या जगात राहात आहेत, त्याच्याविषयी अशा पद्धतीने शिकवण्यासाठीचा हा एक उत्तम मार्ग आहे. विद्यार्थी ज्या भौगोलिक स्थानात आहेत त्याच्या व्यतिरिक्त  कित्येक पटींनी अधिक माहिती मिळवण्याची त्यांना मिळालेली ही संधी आहे.

 

तुमच्या संकल्पनांचे संदर्भ आणि संबंधित माहिती जर स्पष्ट असेल तर विद्यार्थ्यांना जगातला कोणताही विषय कंटाळवाणा वाटणार नाही.