फन टेक-हॉबीज् चा शोध!

पूर्वीच्या काळी छंद म्हणताच केवळ क्रीडा किंवा कला यांचाच विचार केला जायचा; परंतु आता तसे नाही - सध्याच्या काळात तंत्रज्ञानावर आधारित छंद जोपासले जातात. तुमच्या फावल्या वेळात तुमच्या कंप्युटरवर जोपासता येण्यासारखे अनेक सृजनात्मक छंद आता उपलब्ध आहेत. त्यांच्या मदतीने तुम्ही सभोवतालच्या जगाची माहिती मिळवून सुंदर कलाकृतींची निर्मिती करू शकता.   

तंत्रज्ञानावर आधारित या काही साध्या छंदांपासून सुरूवात करा -

1. ब्लॉगिंग

ब्लॉग म्हणजे डायरी किंवा रोजनिशी सारखी वेबसाइट जिचा वापर करून तुम्ही ऑनलाइन प्रेक्षकांसोबत अनौपचारिक संवाद साधू शकता. ऑनलाइन नियतकालिक चालविण्यासाठी किंवा तुमची प्रतिभा दर्शविण्यासाठी ब्लॉगिंग हे एक चांगले माध्यम ठरते. पारंपारिक ब्लॉग्ज मध्ये केवळ लिखाण आणि चित्रांचा समावेश केला जायचा परंतु आता मात्र माध्यमे आणि व्यासपीठे यांच्यामुळे ब्लॉगिंगच्या कलेचा खूप विस्तार झाला आहे. आता तुम्ही साउंडक्लाऊड सारख्या व्यासपीठांचा वापर करून तुमचा आवाज जगापर्यंत पोहोचवू शकता. किंवा 140 किंवा त्याहूनही कमी अक्षरांच्या "मायक्रोब्लॉग" साठी ट्वीटर आणि इंन्स्टाग्रामचा वापर करू शकता. कोणत्याही माध्यमाचा किंवा व्यासपीठाचा वापर जरी केला तरी ब्लॉगिंग हा जगाशी मोठ्या प्रमाणावर जोडले जाण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

 

2. Coding

कंप्युटर सॉफ्टवेयर, ॲप्स आणि वेबसाइट्स तयार करण्यासाठी काय करावे लागते असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? त्याचे उत्तर आहे कोड. तुमचे ब्राऊजर, तुमची ओएस, तुमच्या फोन मधील ॲप्स, फेसबुक आणि ही वेबसाइट - हे सर्व कोड ने बनलेले अहेत. कोडींग हा एक अतिशय फायदेशीर आणि मनोरंजक असा छंद आहे. या छंदाला तुम्ही अतिशय समाधानकारक अश्या कारकीर्दीचे रूप देखिल देऊ शकता. आणि कोणी सांगावे हा छंद जोपासताना तुम्ही कदाचित पुढील फेसबुक चे निर्माते बनण्याच्या मार्गावर देखिल असू शकता ! म्हणूनच, कोडींगच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी आणि तुमच्या मदतीकरिता काही स्त्रोत उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही येथे एक मार्गदर्शक देत आहोत.

3. व्लॉगिंग
व्लॉग (किंवा व्हिडिओ ब्लॉग) म्हणजे एक असा ब्लॉग ज्यात व्हिडिओ असतो. सुरूवातीला तुम्ही तुमच्या प्रेक्षकांसाठी व्लॉग द्वारे काही सोप्या दैनंदिन क्रिया दाखवू शकता किंवा त्यांच्यासाठी DIY ची निर्मिती करून त्यांना प्रयत्न करण्यास सांगू शकता.

कितीतरी व्यावसायिक व्लॉगर्सनी त्यांची कारकीर्द अश्या प्रकारे सुरू केली आहे हे समजल्यावर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकीत व्हाल. ज्यांना सुपरवुमन म्हणून ओळखले जाते त्या लिली सिंग, श्रद्धा शर्मा, तन्मय भट हे काही व्लॉगर्स आहेत ज्यांनी स्वतःच्या घरात व्हिडिओ शुटींग करून या कारकीर्दीला सुरूवात केली होती. यू-ट्यूब वरील प्रसिद्ध प्रवास आणि सौंदर्य व्लॉगर शॅरेझाद श्रॉफ यांनी मेक-अप बद्दलच्या सूचनांचे व्लॉगिंग करून प्रसिद्धी मिळविली. डेल फ्यूचरिस्ट एक असा कार्यक्रम ज्यात तुमच्या छंदांना कारकीर्दीमध्ये कसे परिवर्तीत करता येईल त्याची माहिती दिली गेली होती, त्यामध्ये देखिल त्यांचा सहभाग होता.

त्यांचे व्लॉग्ज बघून तुम्हाला शुभारंभ करण्यास मदत मिळेल आणि कालांतराने तुम्ही तुमची स्वतःची शैली निर्माण करू शकाल. गर्दीमध्ये स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी उत्तम दर्जाचे व्लॉग्ज बनविता यावेत यासाठी या लेखातील सूचनांचा वापर करा.

 4. फोटोग्राफी

जर तुम्हाला ॲनलॉग आणि डिजिटल जगतातील संबंधांचा शोध घेण्याची इच्छा असेल, तर फोटोग्राफीचा हा छंद तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो. फोटोग्राफी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे तपशील पाहण्याची सवय लावते आणि आयुष्यातील अत्यंत सुंदर अश्या क्षणांना छायाचित्रांच्या स्वरूपात साठवून ठेवण्यास मदत करते. एकदा का तुम्हाला निर्दोष छायाचित्रे काढण्याची कला हस्तगत झाली की मग तुम्ही फोटो-एडिटिंग वरील माहितीसाठी या मार्गदर्शकाचा वापर करून तुमच्या स्वतःच्या उत्कृष्ट कलाकृती (मास्टरपीसेस) निर्माण करू शकाल.

नवयुगातील हे छंद तुमच्यासाठी अगणित शक्यतांचे दरवाजे उघडतील. त्या सर्वांचाच या संकल्पनेवर भर आहे की तुमची आवड काहीही असली तरी तुमच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देऊन त्यांना जगासमोर आणण्यासाठी तुम्हाला केवळ तुमच्या कंप्युटरची आवश्यकता आहे. 

मग तुम्ही कसली निवड केली?