तुमच्या पाल्याला गृहपाठ करताना पीसी ची मदत कशी होऊ शकते ते पहा

 

 

आपल्या सभोवतालचे जग डिजिटल बनत आहे त्यामुळे पालकत्व सुद्धा तसे बनले तर त्यात आश्चर्य वाटायला नको! शिक्षणाच्या बाबतीत पालकांनी देखिल तंत्रज्ञान-कुशल डिजिटल पालक बनण्याची गरज आपल्याला 2018 च्या वर्षाने दाखवून दिली आहे.

1. पीसी मुळे संशोधन जलद गतीने होते

चांगल्या गुणवत्तेच्या असाइनमेंट्स साठी चांगल्या गुणवत्तेचे संशोधन लागते. गूगल सर्च, गूगल स्कॉलर आणि किडल यांसारख्या पीसी वरील साधनांचा वापर केल्यास शोध घेणे जलद तर होतेच त्याचबरोबर सोपे देखिल बनते. गूगल स्कॉलर वर जवळपास सर्व विषयांवरील, रिसर्च पेपर (शोध निबंध), अहवाल आणि विद्वानांचे लेख प्रसिद्ध केलेले असल्यामुळे त्याचा विशेष फायदा होतो.

2. पीसी मुळे तुमच्या पाल्याला प्रेरणा मिळते

ब-याचदा मुले गृहपाठ करण्याऐवजी, दिरंगाई करून वेळ वाया घालवतात. या दिरंगाईमागचे कारण दिशाहीनता हे असते. नक्की काय करायचे ते न समजल्याने मुले तसे करतात. टेम्लेटलॅब सारख्या वेबसाइट्स वरती निबंधांसाठी तयार नमुने दिलेले असतात, त्यांचा वापर केल्यास तुमच्या मुलांना सुरूवात करणे सोपे जाते.

3. विविध गोष्टींना एकत्र करण्यात पीसी मदत करतात

पीसी वर वर्ड, पीपीटी, एक्सेल, व्हिडिओ सारख्या विविध गोष्टी एकत्रित उपलब्ध असतात. त्यांचा वापर करून तुमचा पाल्य विविध कौशल्ये शिकू शकतो. निबंधासाठी वर्ड चांगले असते तर गणिते सोडविण्यासाठी एक्सेल ची मदत मिळते. तसेच पीपीटी शिकल्यामुळे तुमच्या पाल्याची सादरीकरण कौशल्ये सुधारतात.

4. पीसी मुळे सर्व गोष्टी सुसंघटित राहतात

पीसी मुळे तुमच्या पाल्याच्या अभ्यासाशी संबंधित सर्व गोष्टी एका ठिकाणी उपलब्ध होतात. त्यामुळे त्यांना जलद गतीने काहीही शोधणे सोपे होते. कॅलेंडर, एवरनोट आणि वन नोट यांसारख्या स्त्रोतांमुळे डॉक्यूमेंट्स, वेबसाइट्स, चार्ट्स इत्यादी गोष्टी एकत्रित ठेवता येतात ज्यामुळे परीक्षेच्या काळात तुम्हाला शोधाशोध करायची गरज भासत नाही.

5. पीसीवर विषयांना अनुसरून मार्गदर्शके उपलब्ध असतात

पीसी वर, शब्दांच्या योग्य उच्चारापासून ते विज्ञानातील जटील सिद्धांतांपर्यंत प्रत्येक विषयाबद्दल काही ना काही उपलब्ध असते. तुम्हाला आणि तुमच्या पाल्याला फक्त योग्य त्या पीसी स्त्रोतांचा वापर करून शोध घ्यावा लागतो. समजण्यास सोप्या अश्या व्हिडिओज् साठी यूट्यूब हा चांगला मार्ग आहे.

6. पीसी मुळे तुमच्या पाल्याला चांगला अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते

तुमच्या मुलांना मिळालेला गृहपाठ त्यांनी पूर्ण करावा यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीही पीसी चा उपयोग होतो. पीसी चा वापर एक तास अभ्यासासाठी करून त्याव्यतिरिक्त आणखी 15 मिनिटांचा वेळ पीसी वर खेळण्यासाठी दिला तर तुमची मुले वेळ वाया न घालवता, नक्कीच उत्साहाने अभ्यास पूर्ण करतील.

पीसी वरील योग्य साधने आणि स्त्रोतांचा वापर करून, लहान वयातच तुमच्या पाल्याच्या शिकण्याच्या क्षमतेला वाव देण्यासाठी गृहपाठाचा एक उपक्रम म्हणून वापर करा. गृहपाठासाठी शुभेच्छा!