प्रत्येक विद्यार्थ्याला मार्गदर्शकाची गरज का आहे, ते पुढे दिले आहे

 

तुम्हाला भेटलेल्या प्रत्येक मुलाकडे एक गोष्ट असते जी कोणी तरी ऐकून घेण्याची गरज असते. कदाचित ती ऐकून घेण्यासाठीच तुमची निवड झाली असेल.“

- बेथनी हिल

 

व्यावसायिक आणि वैयक्तिक विकासाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी एकत्र आलेल्या दोन व्यक्तींमधील नाते हे मार्गदर्शकाचे असते. सामान्यतः, मार्गदर्शक ही एक अनुभवी व्यक्ती असते जी कमी अनुभव असलेल्या व्यक्तीला आपले  ज्ञान, अनुभव आणि सल्ला देते.

मार्गदर्शक मिळविण्याबद्दल विचार करण्यासाठी उपयुक्त अशी तीन कारणे :

 

1. मार्गदर्शक आपल्याला प्रोत्साहन देऊन काम करत रहाण्यास मदत करतात

मार्गदर्शन म्हणजे चालना देणारा एक मेंदू, ऐकून घेणारा कान आणि योग्य दिशेने दिला गेलेला धक्का असतो.”

- जॉन क्रॉस्बी

चांगला मार्गदर्शक तुम्हाला तुमचे सामर्थ्य वाढविण्यासाठी प्रोत्साहन देतो, तुम्ही कुठे कमी पडत आहात ते सांगतो आणि तुमचे सामर्थ्य वाढविण्यास मदत करतो.

 

2. मार्गदर्शकांच्या अनुभवांवरून शिकून तुम्ही पुन्हा त्याच चूका करणे टाळू शकता

"तुम्हाला तुमच्या क्षमतांवर जितका विश्वास असतो, त्यापेक्षा जास्त तुमच्या मार्गदर्शकाला असतो. तो मार्गदर्शक तुमची क्षमता आणि तुमची प्रतिभा जगासमोर आणण्यास मदत करतो."

- बॉब प्रॉक्टर

तुम्ही आत्ता जे करत आहात, त्याबाबतीत मार्गदर्शकाने सगळे अनुभव घेतलेले असतात. तुमचा मार्गदर्शक योग्य ते अभिप्राय देऊन तुम्हाला योग्य कृती करण्यास आणि यशस्वी होण्यास मदत करतो. उदाहरणार्थ – जर तुमचा निबंध लिहिताना तुम्हाला व्याकरणात अडचण येत असेल तर तुमचा मार्गदर्शक तुम्हाला ग्रामरली किंवा ग्रामरिक्स सारखे एखादे पीसी टूल (साधन) वापरण्याचा सल्ला देऊ शकतो.

 

3. मार्गदर्शक प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र ध्येय निश्चित करण्यास मदत करतात

जसे लोखंडाने लोखंडाला धार होते, त्याचप्रमाणे एक माणूस दुसऱ्या माणसाची बुद्धी प्रखर बनवू शकतो

- द बायबल

पायरी 1 – ध्येय निश्चित करा

पायरी 2 – काय करायचे त्याची योजना तयार करा

पायरी 3 – काम करण्यास सुरूवात करा

पायरी 4 – काम करत असताना बदलांशी जुळवून घ्या

पायरी 5 – चुकांपासून शिका

पायरी 6 – पुन्हा सर्व करा

ध्येय निश्चित करणे हा यशस्वी शिक्षणाचा पाया आहे. एकदा त्यात तुम्ही यशस्वी झालात की मग तुमच्या मार्गदर्शकाकडून उत्तम ज्ञान नक्कीच मिळवू शकाल.

उत्तम मार्गदर्शक मिळाले की मग तुमची सृजनशीलता केवळ परीक्षेच्या आदल्या दिवसापुरतीच मर्यादित न रहाता, तुमच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनेल. ती तुमची सवय बनेल. शाळेत प्रत्येक गोष्टीत यशस्वी बनणे कोणाला आवडत नाही!