गृहपाठ तर कायमच असणार आहे, पुढे दिलेले 7 पीसी स्त्रोत तुम्हाला त्यात मदत करतील

 

गृहपाठ दोन प्रकारचे असतात - एक जो तुम्हाला करावा लागतो आणि दूसरा जो तुम्हाला करावासा वाटतो. गृहपाठ करताना जेव्हा तुम्ही पीसी चा वापर करता, तेव्हा तुम्हाला तो गृहपाठ करावासा वाटतो. पुढे दिलेल्या पीसी स्त्रोतांचा वापर केल्यास, अभ्यास नेहमीपेक्षा नक्कीच जास्त मनोरंजक होईल.

1. मुद्द्यांची सत्यता पारखून घ्या

विज्ञानापासून ते समाजशास्त्रापर्यंत कोणत्याही विषयातील मुद्द्यांच्या खरेपणाची पडताळणी करण्यात त्वरित मदत मिळविण्यासाठी फॅक्ट मॉन्स्टरच्या वापरण्यास अत्यंत सोप्या असलेल्या सर्च बॉक्सचा संदर्भ घ्या.

2. डिजिटल पाठयपुस्तकांचा वापर करून शोधाचा वेग वाढवा

तुमचे पाठ्यपुस्तक शाळेत विसरला आहात किंवा त्याची तात्पुरती गरज आहे का? तसे असल्यास काळजी करू नका. विविध विषयांवरील हजारो पाठ्यपुस्तकांच्या विनामुल्य वापरासाठी Ck12 हा तुमचा एकमेव स्त्रोत आहे.

3. एकाच ठिकाणी बसून पहा आणि शिका

एखादी संकल्पना तुम्हाला नीट समजली नाहीये का? मूलभूत गोष्टी शिकणे आणि सखोल माहिती मिळविण्यासाठी पीसी चे स्त्रोत शोधणे या दोन्ही गेष्टींसाठी यूट्यूब हा अतिशय चांगला आरंभ बिंदू आहे.

4. तुम्ही ज्या गोष्टीबद्दल वाचत आहात तीला प्रत्यक्षात समजून घ्या

गूगल आर्ट्स आणि कल्चर (गूगल कला आणि संस्कृती) यामध्ये आत्तापर्यंत घडलेली प्रत्येक गोष्ट अतिशय सोप्या भाषेत कथांच्या स्वरूपात दिलेली आहे आणि ते तुम्ही वर्चुअल एक्सप्लोरेशन (दृश्य अन्वेषणाच्या) माध्यमातून पाहू देखिल शकता.

5. सोपे करून दाखवलेले इंग्रजी साहित्य

हल्ली वापरात असलेल्या इंग्रजी भाषेत शेक्सपिअर वाचण्याचे एक ठिकाण म्हणजे श्मूप. येथे तुम्ही साहित्यातील गर्भित अर्थ समजून घेऊ शकता तसेच व्याकरणाचे नियम देखिल समजून घेऊ शकता.

6. गणिताचा पाहिजे तितका सराव करा

प्रत्येक पायरीसाठी दिलेल्या मार्गदर्शनामुळे, Scmoop’s चे मॅथ शॅक हा गणितातील प्रश्नांचा सराव करण्याचा आणि तुमच्या ज्ञानातील त्रुटी भरून काढण्याचा एक उत्तम स्त्रोत आहे.

7. पिरियॉडिक टेबल (आवर्त सारणी) मध्ये तरबेज व्हा

पीटेबल मध्ये, आवर्त सारणीतील सर्व रसायनांच्या शोधाच्या गोष्टी, चिन्हे, अणूक्रमांक आणि दैनंदिन जीवनात होणारा वापर हे सर्व सोप्या भाषेत दिलेले असते.

तुमच्या पीसी चा अत्यंत योग्य वापर करण्यासाठी, पीसीच्या स्त्रोतांबद्दल संशोधन करणे, त्यांना वापरून पाहणे आणि त्याबद्दल मित्र आणि कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेणे यात थोडा वेळ घालवणे नेहमीच चांगले असते. सरतेशेवटी, एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला नेहमीच प्रगती करायची आहे आणि या वापरून पाहिलेल्या आणि तपासलेल्या सूचनांचा वापर केल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहात.