अभ्यासासाठी पीसी चा वापर तुमच्या पाल्यासाठी कसा फायदेशीर ठरू शकतो

 

"आनंदाने मनापासून शिकलेल्या गोष्टी आपण कधीच विसरत नाही" - अल्फ्रेड मर्सियर

आपली कार्यपद्धती, सृजनशीलता एवढेच काय पण आपली शिकण्याची पद्धत देखिल पी सी ने बदलून टाकली आहे. आजकाल जवळपास प्रत्येक कार्यालयात तर पीसी दिसून येतातच पण कित्येक शाळांमध्येही शिक्षणाचे एक प्रभावी साधन म्हणून कंप्यूटर्स चा वापर केला जातो. शिक्षणाच्या पारंपारिक पद्धतीपेक्षा कंप्यूटर वर आधारित शिक्षणाचे अनेक फायदे दिसून येतात ते म्हणजे, परस्पर संवादकौशल्य, अनुकृती यांच्यामध्ये झालेली वाढ, अधिक व्यापक प्रमाणावर स्त्रोतांची उपलब्धता आणि विषयाचे सखोल ज्ञान. केवळ शाळेतच नाही तर घरी देखिल कंप्यूटर अभ्यासाचे साधन म्हणून खूप फायदेशीर ठरतो.

1. स्त्रोत

पीसी वर आधारित शिक्षणात विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानावर अवलंबून रहायची गरज नसते. शाळेसाठी वापरल्या जाणा-या कंप्यूटर्स मध्ये सुलभ शिक्षणासाठी विविध शैक्षणिक सॉफ्टवेयर्स आणि प्रोग्राम्स उपलब्ध असतात. त्याचबरोबर इंटरनेटच्या वापराने विद्यार्थ्यांना शाळेत तसेच घरी देखिल अनेक शैक्षणिक साधने उपलब्ध होऊ शकतात.

2. सहज उजळणी करता येते

शिकण्यासाठी जेव्हा कंप्यूटर चा वापर केला जातो, तेव्हा विद्यार्थ्यांवर धडा एकदाच शिकून मग वारंवार त्याची उजळणी करायचे बंधन नसते. विद्यार्थी संकल्पना नीट समजून घेण्यासाठी पाहिजे तितक्या वेळा तो धडा शिकू शकतात. याचा फायदा म्हणजे पाठाची मूळ संकल्पना पुन्हा पुन्हा नीट समजून घेतल्याने अभ्यास सोपा वाटू लागतो.

3. सुरक्षितता

कंप्यूटर वर उपलब्ध असलेल्या अनुकृतींमुळे विद्यार्थी त्यांच्या जागेवर बसून सुरक्षितपणे विज्ञानातील संकल्पना नीट समजून घेऊ शकतात. उदाहरणार्थ - विद्यार्थी आभासी प्रात्यक्षिके करून रसायनांची एकमेकांशी होणारी प्रतिक्रिया शिकू शकतात. केवळ तितकेच नाही तर, अनुकृतींमुळे विद्यार्थी परत परत तेच आभासी प्रयोग करून त्यांचे ज्ञान बळकट करू शकतात.

4. सखोल अभ्यास

संशोधनाने हे सिद्ध केले आहे की, पीसी चा वापर अभ्यासासाठी केल्यास विद्यार्थ्यांना विषयाचे सखोल ज्ञान मिळून त्यांना सर्व संकल्पना नीट समजतात. नंतर विद्यार्थी ते शिक्षण अभिसारी आणि अपसारी दोन्ही प्रकारची विचार कौशल्ये दाखविण्यासाठी बाह्य जगात वापरतात.[1]

शाळेत आणि घरी वापरले जाणारे कंप्यूटर्स हे मुलांसाठी अत्यंत महत्वाचे शैक्षणिक साधन ठरतात. वर दिलेल्या फायद्यांसोबतच ते विद्यार्थ्यांना माहितीच्या जगाशी जोडण्याचे काम करतात. तसेच कंप्यूटर्सचा वापर संवादात्मक शिक्षणासाठी देखिल केला जाऊ शकतो ज्याने विद्यार्थ्यांना अभ्यास समजणे सोपे जाते.[2]

आजच घरी पीसी आणा आणि शिक्षणाच्या नविन प्रवाहाचा आरंभ करा.