पीसी चा वापर शिक्षणासाठी केल्याने मुलांना भविष्यात कसा फायदा होतो

 

भविष्यात मुलांना यशस्वी होण्यामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे. लहानपणापासूनच मुलांना शिकण्यासाठी पीसी चा वापर करायला शिकवले तर त्यांच्या मूलभूत संकल्पना अत्यंत दृढ होतील. अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त त्यांना इतरही अनेक महत्वाची कौशल्ये शिकावयास मिळतील जी त्यांना पुढील आयुष्यात उपयुक्त ठरतील. [1] 

1. स्वतंत्रपणे शिकण्यात पुढाकार

संशोधन करणे, माहिती जमविणे असो किंवा प्रोजेक्ट बनविणे असो, शिक्षणासाठी पीसी चा वापर केल्यास विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर स्वतःच नियंत्रण ठेवू शकतात. स्वतःहून शिकण्याची सवय मुलांना केवळ शाळेत चांगले गुण मिळविण्यासाठीच उपयोगी पडत नाही तर भविष्यात कोणतेही काम करताना सुद्धा उपयुक्त ठरते कारण त्यामुळे त्यांच्यात मला हे करणे शक्य आहे असा आत्मविश्वास निर्माण झालेला असतो.  

2. झपाट्याने बदलणा-या तंत्रज्ञानाबद्दल आत्मविश्वास

तुमच्या पाल्याने भविष्यात व्यवसायासाठी कोणतेही क्षेत्र निवडले तरी कंप्यूटर साक्षरता आणि स्वतःमध्ये परिस्थितीनुरूप बदल घडवून आणायची तयारी या गोष्टींची गरज भासणारच. जी मुले लहानपणापासूनच अभ्यासासाठी शाळेत आणि घरी कंप्यूटर चा वापर करतात ती भविष्यातल्या कामाची पूर्वतयारी करत असतात. "प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट" या जुन्या म्हणीनुसार येथेही ते पडताळायला मिळते कारण पीसी चा वापर आणि तंत्रज्ञानाबद्दल माहिती या दोन्हीबद्दल मुलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो.

3. गांभिर्याने विचार करण्याचे कौशल्य वाढीस लागते

पीसीचा वापर केल्याने विविध तंत्रे आणि ॲक्टिविटीज च्या सहाय्याने शिकण्याची क्षमता वाढते आणि मुले प्रत्येक प्रश्नाचा गांभिर्याने सखोल विचार करण्यास शिकतात. उदाहरणार्थ - डिजिटल लेड पीअर रिव्ह्यू मधील ॲक्टिविटीज विद्यार्थ्यांना एकाच प्रश्नाचा वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास शिकवतात. तसेच ऑनलाइन डिस्कशन फोरम मध्ये त्यांची विश्लेषणात्मक कौशल्ये वाढीस लागतात आणि ते स्वतःची मते मांडण्यास शिकतात. त्याशिवाय वर्गात घेतल्या जाणा-या डिजिटल स्टोरी टेलिंग मुळे विषयाचा सर्व बाजूंनी विचार करून शिकत असलेल्या विषयाचे मूल्यांकन करण्याची सवय लागते.

4. यशस्वी सहकार्य

वर्गात टीमवर्क जरी नेहमीच होत असले तरी पीसी चा वापर केल्याने त्यांच्यातील सहकार्य वाढायला मदत मिळते. पीसी मुळे अनेक स्त्रोत आणि साधने लगेचच उपलब्ध होतात. उदाहरणार्थ - Wikispaces Classroom चा वापर करून विद्यार्थी एकमेकांनी केलेल्या कामाचा संदर्भ घेऊन सर्वांचे काम एकत्रितपणे ड्राइव्ह वर अपलोड करू शकतात, किंवा Makerspace मध्ये आपल्या कल्पनांना मूर्त स्वरूप देऊ शकतात. या गोष्टींमुळे त्यांना एकमेकांना सहकार्य करून काम कसे पूर्ण करावे ते शिकायला मिळते. या कौशल्याचा त्यांना मोठेपणी खूप फायदा होतो.

पीसी चा वापर शिक्षणासाठी केल्याने मुलांपुढे संधींचे एक नविन विश्व खुले होते आणि त्यांना तंत्रज्ञानावर आधारित जगात आत्मविश्वासाने जगायला मदत होते.

उद्याच्या हायपर कनेक्टेड जगात यशस्वी होण्यासाठी तुम्ही तुमच्या पाल्याला कसे तयार करत आहात?