घोकंपट्टीचा तुमच्या पाल्याच्या कल्पनाशक्तीवर होणारा विपरित परिणाम

बहुतांशी लोकांचे असे मत असते की जितक्या जास्त वेळा एखाद्या गोष्टीची उजळणी केली जाते तितका त्या गोष्टीचा अर्थ पटकन समजतो. शिक्षणाच्या या पद्धतीला "घोकंपट्टी" असे म्हटले जाते. अनिता अकाई, हॅमिल्टन मधील मॅक मास्टर विश्वविद्यालयातील आरोग्य विज्ञान शिक्षण विभागातील मास्टर्स ची पदवी असलेल्या विद्यार्थिनी म्हणतात की, "पाठांतर केल्याने शिक्षण सोपे होते हे सिद्ध करण्यासाठी काही पुरावा नाही. शिक्षणातील ही एक प्रकारची पळवाट आहे." [1]

दुस-या बाजूला संवादात्मक शिक्षण पद्धती आहे. एक असे तंत्र जे विद्यार्थ्यांना पाठात गुंतवून ठेवते, संकल्पना समजून घेण्यास मदत करते आणि नंतर शिकलेल्या गोष्टींना दैनंदिन जीवनात कसे वापरावे ते शिकवते.

दोन्ही शिक्षण पद्धतींचे स्वतःचे असे काही फायदे आहेत, परंतु या लेखात घोकंपट्टीने मुलांच्या कल्पनाशक्तीवर होणारा विपरित परिणाम या बद्दल माहिती देण्यात आली आहे.

तर, घोकंपट्टीमुळे पाल्याच्या सृजनात्मक विचार करण्याची कौशल्ये / कल्पनाशक्ती वर कसा विपरित परिणाम होतो?

कल्पनाशक्ती म्हणजे, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधताना नविन, अभिनव, एकमेवाद्वितिय अशी कल्पना वापरणे. यात डायवर्जंट थिंकिंग म्हणजे पर्यायी विचारपद्धती म्हणजेच एका प्रश्नाची अनेक उत्तरे शोधणे याचा वापर केला जातो. याच्या विरूद्ध कन्वर्जंट थिंकिंग म्हणजे नेमून दिलेली विचारपद्धती असते, यात एका प्रश्नाचे एकच बरोबर उत्तर येऊ शकते. घोकंपट्टी मध्ये नेमून दिलेल्या विचारपद्धतीचा वापर करण्यावर भर दिलेला असतो. जेव्हा केवळ त्याच शिक्षणपद्धतीचा वापर केला जातो तेव्हा मुलांच्या पर्यायी विचारपद्धतीच्या विकासाकडे दुर्लक्ष होते. परिणामी कल्पनाशक्तीसाठी ते मारक ठरते. [2]

शाळेत बहुसंख्य प्रकल्प आणि मुल्यांकनांमध्ये मुलांच्या प्रश्न सोडविण्याचा वेग वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. प्रश्नाचे पर्यायी किंवा अधिक कल्पक उत्तर शोधण्यापेक्षा जलद गतीने प्रश्न सोडविण्यावर भर दिला जातो.

याच पद्धतीने घोकंपट्टीमध्ये हे दर्शविले जाते की प्रत्येक प्रश्नाचे एकच "बरोबर" उत्तर असते आणि ते लवकरात लवकर मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. याचा परिणाम मुलांच्या भावी काळावर होतो. त्यांची विचार करून नविन पर्याय शोधण्याची प्रवृत्ती कमी होते.

दुसरा महत्वाचा विपरित परिणाम म्हणजे घोकंपट्टीमुळे मुलांची त्या विषयातील आवड संपते. ठराविक गोष्टींमध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी वापरल्या जाणा-या पद्धतीचे वर्णन करण्यासाठी शिक्षणतज्ञ ड्रिल अँड किल हा वाक्प्रचार वापरतात.

1. शरीरातील स्नायू किंवा हाडांची सूची
2. गुणाकार सारणी
3. मूलद्रव्यांची आवर्तसारणी

बहुसंख्य शिक्षणतज्ञ ड्रिल अँड किल पद्धतीला टाळतात कारण यामुळे संकल्पनात्मक, सखोल ज्ञान न मिळवता लक्षात ठेवण्याची प्रवृत्ती किंवा घोकंपट्टीची सवय वाढते. त्याचबरोबर मुले अभ्यासाला कंटाळतात व त्यांची त्या विषयातील आवड संपत जाते. [3]

या लेखात घोकंपट्टीच्या कल्पनाशक्तीवर होणा-या विपरित परिणामांविषयी थोडक्यात माहिती दिलेली असली तरी हे मोठ्या हिमखंडाचे केवळ वरचे टोक आहे. खाली दिलेल्या व्हिडिओ मध्ये दाखविल्याप्रमाणे घोकंपट्टीमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीवर विपरित परिणाम होतो कारण यात समजून घेण्यापेक्षा माहिती करून घेण्यावर भर दिला जातो.

आकलनशक्ती सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार असे दिसून येते की देशभरातील शाळांपैकी जवळपास 80% शाळांचे मुख्याध्यापक हे शिक्षणाच्या खालावलेल्या दर्जासाठी घोकंपट्टीला जबाबदार मानतात. पालक म्हणून तुमची जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या पाल्याला विविध चर्चासत्रे, ऑनलाइन पाठ आणि संवादात्मक शिक्षण यात सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावे जो घोकंपट्टीच्या ऐवजी शिक्षणाचा एक उत्तम पर्याय मानला जातो.