डिजिटल पालक कसे बनावे

डिजिटल युगाच्या आगमन झाले आहे त्यामुळे या युगात तुमच्या पाल्याच्या सर्वांगिण विकासासाठी तुम्ही देखिल डिजिटल पालक बनणे आता आवश्यक बनले आहे. मुलांच्या आयुष्याचा बहुतांश भाग हा कोणत्या ना कोणत्या रूपातल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात व्यतीत होणार आहे, याच कल्पनेने "डिजिटल पालक" ही संकल्पना जन्मास घातली आहे. डिजिटल पालक म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतःच्या पाल्याला वेगवान अश्या तांत्रिक जगात आत्मविश्वासाने वावरण्यास सक्षम बनवते. याने मुले त्यांच्या दैनंदिन जीवनात सहज आणि कुशलतेने तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात याची आपल्याला खात्री पटते.


आता तुम्हाला डिजिटल पालक म्हणजे काय ते समजले आहेच, चला तर मग तुम्ही डिजिटल पालक कसे बनू शकाल ते पाहूया.

1. डिजिटल स्फिअर बद्दल जाणून घ्या

डिजिटल पालक बनण्यामधील सर्वात पहिली पायरी म्हणजे तंत्रज्ञानातील सुधारणांबद्दल स्वतः माहिती करून घेऊन ती माहिती कायम अद्ययावत ठेवणे जेणेकरून तुमच्या मुलांना तुम्ही डिजिटल स्पेस मध्ये कसे वावरावे हे शिकवू शकाल. द हिंदू मधील एका लेखानुसार असे आढळून आले आहे की पालकांना स्वतःला डिजिटल गोष्टींबद्दल पुरेसे ज्ञान नसल्यामुळे ते त्यांच्या मुलांवर नियंत्रण ठेऊ शकत नाहीत.[1] अश्या परिस्थितीत, तुम्हाला स्वतःला तांत्रिक घडामोडींबद्दल माहिती असणे अत्यंत महत्वाचे ठरते.

2. तुमच्या मुलांवर असे संस्कार करा जे  त्यांना ऑफलाइन तसेच ऑनलाइन देखिल उपयोगी पडतील.

तुम्हाला योग्य वाटेल अश्या पद्धतीने कंप्युटरच्या होणा-या वापरावर लक्ष ठेवले पाहिजे. तुमच्या उपकरणांवर तुम्हाला पेरेन्टल ॲक्सेस कंट्रोल मिळवून देणारी असंख्य सॉफ्टवेयर्स उपलब्ध आहेत ज्यांचा वापर करून तुम्हाला यावर लक्ष ठेवता येते कि तुमची मुले नक्की केव्हा आणि कशासाठी कंप्युटर वापरत आहेत. तुमचा कंप्युटर आणि Wi-Fi यांना नेहमी पासवर्ड ने सुरक्षित करून ठेवा ज्यायोगे तुम्हाला कंप्युटरच्या वापरावर नियंत्रण ठेवणे सोपे जाइल. तसेच, तुमचा पीसी घरातल्या दर्शनी भागात ठेवा म्हणजे तुमचा पाल्य तुमच्या नकळत त्याचा वापर करू शकणार नाही.[2]

3. मुलांच्या एकांताचे उल्लंघन होऊ न देता कंप्युटर वर ते काय करत आहेत यावर सतत लक्ष ठेवणे

तुम्हाला योग्य वाटेल अश्या पद्धतीने कंप्युटरच्या होणा-या वापरावर लक्ष ठेवले पाहिजे. तुमच्या उपकरणांवर तुम्हाला पेरेन्टल ॲक्सेस कंट्रोल मिळवून देणारी असंख्य सॉफ्टवेयर्स उपलब्ध आहेत ज्यांचा वापर करून तुम्हाला यावर लक्ष ठेवता येते कि तुमची मुले नक्की केव्हा आणि कशासाठी कंप्युटर वापरत आहेत. तुमचा कंप्युटर आणि Wi-Fi यांना नेहमी पासवर्ड ने सुरक्षित करून ठेवा ज्यायोगे तुम्हाला कंप्युटरच्या वापरावर नियंत्रण ठेवणे सोपे जाइल. तसेच, तुमचा पीसी घरातल्या दर्शनी भागात ठेवा म्हणजे तुमचा पाल्य तुमच्या नकळत त्याचा वापर करू शकणार नाही.

डिजिटल स्पेस चा वापर करून पालक आपल्या मुलांसोबत उत्तम प्रकारे शिकू आणि खेळू शकतात व त्यांच्यातील नाते अधिक दृढ करू शकतात. तुम्ही कंप्युटरचा वापर करण्यास शिकण्याने तुमच्या मुलांसाठी देखिल ते अतिशय फायदेशीर ठरते. डिजिटल पालकत्व ही एक अशी प्रणाली आहे जी तुमच्या मुलांना ऑफलाइन तसेच ऑनलाइन देखिल एक सुजाण नागरिक बनण्यास मदत करू शकते.