तुमच्या पाल्यातील शास्त्रज्ञ कसा जागृत करावा

 

विद्यार्थी दोन प्रकारचे असतात - पहिला प्रकार म्हणजे विज्ञानाचा तास म्हणताच आनंदाने उड्या मारू लागणारे विद्यार्थी, परंतु दूस-या प्रकारच्या विद्यार्थ्यांना तो विषय फारसा आवडत नाही. तुमच्या मुलांच्या अंतर्मनात दडलेली उत्सुकता जागृत करण्यात, पीसी ची फार मदत होते. यात केवळ विज्ञानच नाही तर इतर विषयांच्या बाबतीतल्या उत्सुकतेचा देखिल समावेश होतो. पाहिजे त्या माहितीची त्वरित उपलब्धता आणि संवादात्मकता यांचा वापर करून पीसी तुमच्या पाल्यात दडलेला शास्त्रज्ञ जागृत करू शकतो.

1. नासा किड्स क्लब च्या बरोबर अंतरीक्षातील साहसी मोहीमेवर जा

स्पेस एक्सप्लोरेशन चा (अंतरिक्ष मोहीमेचा) विचार करताच आठवणारी पहिली गोष्ट म्हणजे NASA. NASA च्या किड्स क्लब मध्ये संवादात्मक आणि शैक्षणिक खेळ, चित्तवेधक चित्रे, सध्या चालू असलेल्या प्रकल्पांबद्दलची माहिती आणि इतर साध्यासाध्या गोष्टींच्या मदतीने अंतरीक्षाशी संबंधित सर्वच गोष्टींना एक वेगळे वळण देऊन मनोरंजक केले आहे. [1] वापरली गेलेली भाषा ही समजण्यास अत्यंत सोपी असून, कार्टून्सच्या मदतीने आकर्षक बनवली आहे. त्यामुळे मुले अजिबात न कंटाळता पुढे पुढे शिकत रहातात.

2. सेल क्राफ्टच्या मदतीने खेळ बनवा

कधी कधी वर्गात शिकवली गेलेली संकल्पना संपूर्णपणे समजणे कठीण असते. अशा वेळी वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित खेळ खेळल्याने तुमच्या पाल्याला ती संकल्पना समजण्यास मदत होते. असाच एक खेळ आहे सेल क्राफ्ट. यामध्ये कला आणि संवादात्मक खेळांच्या सहाय्याने पेशींची कार्ये मूर्त स्वरूपात आणली जातात. [2] या खेळात, खेळाडू एक पेशी बनतो आणि विषाणूने त्या पेशीवर हल्ला करून तीला संपवण्याच्या आधी तो त्या विषाणूला मारतो. अशा खेळांमुळेच मुलांना त्या विषयाचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा निर्माण होते.

3. सायन्स किड्स च्या सोबतीने विज्ञानातील प्रयोग शिका

विज्ञान शिकण्यातील महत्वाचा भाग म्हणजे प्रयोग बघणे आणि स्वतः करणे. सायन्स किड्स च्या मदतीने तुमच्याकडे साहित्य उपलब्ध नसताना देखिल तुम्ही पीसी वर प्रयोग पाहू शकता. [3] मुलांना केवळ प्रयोगाचा विषय निवडायचा असतो. मग त्यांना पाहिजे तितक्या वेळेस ती ते प्रयोग पाहू शकतात, शिकू शकतात आणि त्याबद्दल वाचन करून दीर्घकाळ पर्यंत त्या शिकलेल्या नविन संकल्पना लक्षात ठेवू शकतात.

मुलांमधील शास्त्रज्ञ जागृत करण्याची वेळ येते तेव्हा मुलांनी प्रत्यक्ष केल्या गेलेल्या गोष्टींची फार मदत होते. आणि मेकरस्पेसचे प्रकल्प अगदी तेच कार्य करतात. सर्व वयोगटातील मुलांच्या विभिन्न आवडींप्रमाणे पीसी वर त्या विषयांची माहिती त्वरित उपलब्ध होते त्यामुळे तुमची मुले विज्ञानजगतात नेहमीच आघाडीवर रहातात.