विद्यार्थ्यांसाठी चांगला लॅपटॉप कसा निवडावा

 

तुम्ही स्वतःसाठी जेव्हा लॅपटॉप निवडता तेव्हा जे निकष लावता त्यापेक्षा वेगळे निकष तुम्हाला तुमच्या मुलांसाठी लॅपटॉप निवडताना वापरावे लागतील. तुमच्या पाल्याला घेतलेल्या वस्तूचा जास्तीत जास्त वापर करता यावा यासाठी तो लॅपटॉप विकत घेताना नीट पूर्ण विचार करूनच विकत घ्यावा.

विद्यार्थ्यांसाठी सुयोग्य असा लॅपटॉप निवडण्यासाठी मार्गदर्शक. [1]

1.कोणत्या कामासाठी घ्यायचा आहे त्याचा विचार करा

लॅपटॉप विकत घेण्यापूर्वी तो नक्की कशासाठी विकत घ्यायचा आहे ते ठरविणे अत्यंत महत्वाचे असते. त्याचा कार किती असावा ज्यायोगे तुमचा पाल्य तो सहजतेने हाताळू शकेल ते ठरवा. काही ठराविक मॉडेल्स निवडून तुमच्या पाल्याला त्यांना हाताळू द्यावे मगच जो सर्वात जास्त सोयीस्कर असेल तो लॅपटॉप घ्यावा. नविन गॅजेट तुमचा पाल्य सहजतेने हाताळू शकणे महत्वाचे असते.

2. वैशिष्ट्ये

तुमच्या पाल्याने त्या लॅपटॉपवर काय काम करणे अपेक्षित आहे त्याचा विचार करा. त्याला ग्राफिक्स आणि डिझाइन्स करायचे आहेत की साधे वर्ड प्रोसेसिंग करायचे आहे ते बघा. तुमच्या पाल्याच्या शाळेत कोणते सॉफ्टवेयर प्रोग्राम्स वापरायला सांगतात ते विचारा आणि त्यासाठी योग्य असा लॅपटॉप निवडा.

3तुम्हाला टचस्क्रीन असलेला लॅपटॉप हवा आहे का ते ठरवा

तुमचा पाल्य लॅपटॉप नक्की कशासाठी वापरणार आहे त्यावरून तुम्हाला हे ठरवता येईल की टचस्क्रीन ची गरज आहे की नाही. टचस्क्रीन असणे जरी अत्यावश्यक नसले तरी ते घेतल्याने तुम्हाला काही फायदे होऊ शकतात. तुम्ही जर शिक्षणाबरोबरच लॅपटॉप चा वापर कौटुंबिक मनोरंजनासाठी करणार असाल तर तुम्हाला टचस्क्रीन असल्याने फायदाच होईल.

4. टिकाऊपणा

लॅपटॉप निवडताना असा निवडा जो मजबूत आणि टिकाऊ असेल, मुलांनी वापरताना त्यावर काही सांडले किंवा तो पडला तरी नीट चालू राहू शकेल. डेल चे असे काही लॅपटॉप्स आहेत जे मुलांनी वापरण्यासाठी अतिशय योग्य आहेत. ते टिकाऊ तर आहेतच शिवाय कोणत्याही परिस्थितीत ते नीट चालू रहातात.

5. पोर्टेबिलिटी

जर तुमचा पाल्य लॅपटॉप शाळेत नेणार असेल, तर तो सहज उचलून नेता येईल असा असावा आणि त्याची बॅटरी ची क्षमता देखिल चांगली असावी. एकदा चार्ज केल्यावर तो खूप वेळ पर्यंत नीट चालला पाहिजे म्हणजे शाळेत अभ्यास किंवा एखादी महत्वाची असाइनमेंट करत असताना मध्येच बंद पडायची भिती नसते. परंतु तुमचा पाल्य लॅपटॉप जर फक्त घरी वापरणार असेल तर, बॅटरी लाइफ फारशी चांगली नसली तरी चालू शकेल, त्या बदल्यात चांगली तांत्रिक वैशिष्ट्ये असलेला लॅपटॉप विकत घ्या.

जर तुम्ही तुमच्या पाल्यासाठी कंप्यूटर विकत घ्यायचा विचार करत असाल परंतु तुमच्या मनात काही शंका असतील तर, तुमच्यासाठी सुयोग्य पी सी निवडण्यासाठी आमच्या प्रश्नावली चा वापर करा. [2]