तुमच्या पाल्यासाठी योग्य शाळा कशी निवडावी

 

प्रत्येक पालकाची अशी इच्छा असते की आपल्या पाल्याला जगातील सर्वात उत्तम गोष्टी मिळाव्यात. यात पाल्याच्या शाळेचा देखिल समावेश होतो. आयुष्याची महत्वाची संस्कारक्षम वर्षे पाल्य ज्या शाळेत घालवणार ती शाळा नक्कीच उत्तम असली पाहिजे. पालक म्हणून तुम्ही घेतलेला हा सर्वात महत्वाचा निर्णय असणार असतो.

पुढे दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या पाल्यासाठी योग्य शाळा निवडू शकाल.

1. जागा निश्चिती करा

तुमच्या पाल्याने शाळेत ये जा करण्यात खूप वेळ वाया घालवून, प्रवासाने दमून घरी आल्यावर त्याच्यात खेळण्याची किंवा अभ्यासाची ताकद राहिली नाही हे पहाण्यास कोणालाच बरे वाटणार नाही. म्हणूनच शाळा अशी निवडावी जी तुमच्या घरापासून जास्तीत जास्त तासाभराच्या अंतरावर असेल आणि शाळेचा परिसर सुरक्षित असेल.

2. त्या शाळेची कीर्ती तपासा

तुमचे नातेवाईक, इतर पालक, सहकारी, शेजारी या सर्वांशी बोला, त्यांचे त्या शाळेबद्दलचे मत विचारा तसेच क्वोरा वर देखिल चर्चा करा. गूगल वरील परीक्षणे वाचा आणि मगच शाळा नक्की करा.

3. अभ्यासक्रम विचारपूर्वक निवडा

आयसीएसई, सीबीएसई, आयबी की स्टेट बोर्ड? 

तुम्हाला जे बोर्ड निवडायचे आहे, त्याची शाळा तुमच्या परिसरात आहे का आणि त्या शाळेत 12 वी पर्यंत शिकण्याची व्यवस्था आहे का ते तपासा. जेणेकरून तुमचा पाल्य संपूर्ण शालेय शिक्षण एकाच शाळेत पूर्ण करू शकेल. तुमच्या पाल्याला शाळेत घालण्यापूर्वी प्रत्येक बोर्डच्या बद्दल उपलब्ध असलेली माहिती वाचा.

4. नॉट विदाऊट माय पीसी (माझ्या पीसी शिवाय नाही)

तुमच्या पाल्याची नक्कीच अशी मागणी असणार, म्हणूनच अशी शाळा निवडा ज्यात उत्तम सुविधा असलेली कंप्युटरची खोली आहे किंवा तुमच्या पाल्याला स्वतःचा पीसी शाळेत नेण्याची मुभा आहे. तसेच, शाळेतील शिक्षक जितके तंत्रज्ञान निपूण असतील तितके जास्त चांगले. कारकीर्दीला सुरूवात करण्यापूर्वी तुमच्या पाल्याला कंप्युटर कसा वापरावा याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.  

5. अभ्यासेतर उपक्रम महत्वाचे असतात

आपल्याला जसे सतत काम करून कंटाळा आल्यावर मनोरंजनासाठी दूसरे काहीतरी करावेसे वाटते, तसेच तुमच्या पाल्याला देखिल सतत अभ्यास करून दमायला होते. त्यावेळेस शालेय अभ्यासाव्यतिरिक्त असलेले उपक्रम करण्यास मिळाले, तर पाल्याला अभ्यासातून मोकळीक तर मिळेलच पण त्याचबरोबर त्याच्यात सामाजिक कौशल्ये देखिल विकसित होतील. शाळेत जितके विविध उपक्रम राबविले जातील, तितके तुमच्या पाल्यासाठी चांगले ठरतील.

योग्य शाळा निवडणे अत्यंत महत्वाचे असते.