पीसीच्या सहाय्याने ग्रुप वर्किंगमध्ये कसा अमूलाग्र बदल कराल

 

ग्रुप वर्कचा (एकत्रित काम) मुलांना फायदा होण्यासाठी थोडे प्रयत्न करण्यची गरज असते. त्यात पीसीचा समावेश करा आणि त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांसाठी देखील जीवन थोडे सुलभ होते. पीसीचा उपयोग करून तुम्ही ग्रुप वर्क मध्ये कसा बदल करू शकता ते पहाः

१) तुम्ही सर्व काही एकाच ठिकाणी ठेवू शकता.

अगदी असाईनमेन्ट, उपयुक्त वेबसाईटस, वाचनाचे साहित्य पासून ते मागील प्रकल्प या गोष्टी तुम्ही विद्यार्थ्यांच्या संदर्भासाठी ठेवू शकता - पीसीच्या सहाय्याने तुम्ही तुमची सर्व आवश्यक माहिती एका ठिकाणी ठेवू शकता. ती विद्यार्थ्यांना ई-मेलने पाठविता येते, गुगल ड्राईव्हवर किंवा तुमच्या स्वतःच्या विकीस्पेसेस क्लासरूममध्ये त्यात सुधारणा करता येते, त्यामुळे तुमच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळते. विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींचा शोधाशोध करावा लागत नाही त्यामुळे ह्याचा खूप फायदा होतो आणि ते प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी ते थेट कामाला सुरूवात करू शकतात.

२) लहान लहान गोष्टींवर लक्ष ठेवणे शक्य होते

अनेक वेळा, एखादे काम करताना शेवटच्या क्षणी विद्यार्थ्यांवर खूप गोष्टी येऊन पडतात आणि त्यामुळे त्यांचा ताण वाढतो. मोठ्या कामाची लहान लहान गोष्टींमध्ये विभागणी केल्यास आणि नियमितपणे प्रत्येक टप्यावर लक्ष ठेवल्यास (मग ती कितीली लहान असो) तुम्ही ग्रुप वर्कचा फायदा करून घेऊ शकता.
तुम्ही खालील गोष्टी करून प्रगतीवर लक्ष ठेवू शकताः
१. प्रत्येक गटाबरोबर वर्गात तपशिलवार चर्चा करणे.
२. वर्गातील थोडा वेळ मिटिंगसाठी राखून ठेवून ग्रुप मिटिंगमध्ये सहभागी होणे.
३. तुम्ही वापरत असलेल्या क्लाऊड सर्व्हिसमध्ये नियमितपणे काय होत आहे हे तपासून पाहणे.
४. गटातील प्रत्येक सदस्याने केलेल्या प्रगतीच्या नियमित ताज्या माहितीसह, पाठ पूर्ण झाला की तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला तो ई-मेलने पाठविण्यास सांगणे.

३) विद्यार्थ्यांना स्वतःचे मूल्यमापन करण्यास सांगणे

प्रथमदर्शनी ह्यात थोडी जोखीम वाटते परंतु संपूर्ण गटात कोणी सर्वात जास्त किंवा कमी योगदान दिले याचे तुम्हाला मूल्यमापन करता येते त्यामुळे हे करणे योग्य ठरते. सर्वे मंकी आणि गुगल फॉर्म यासारख्या स्त्रोतांमुळे तुम्हाला अंतिम प्रोजेक्टसाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या योगदानाचा तपशिलवार आढावा घेण्यासाठी थेट आणि असंख्य प्रश्न विचारता येतात.

इतरांबरोबर एकत्रितपणे काम करणे ही अशी गोष्ट असते ज्याकडे मोठे आणि तत्सम विद्यार्थी दुर्लक्ष करू शकत नाहीत, आणि ग्रुप वर्क हे असे कौशल्य आहे हे शिकविता आणि शिकता येते. तुम्ही ठराविक विषयासाठी खास असलेल्या पीसी लर्निंग रिसोर्सेस सोबत जितके अधिक प्रोजेक्टस द्याल तितके तुमचे विद्यार्थी इतरांबरोबर काम करण्यास आणि पीसीचा उपयोग करण्यास अधिक शिकतील!