तुमच्या पीसी ची स्टोरेज (साठविण्याची क्षमता) कशी सुसंघटित करावी

 

तुमच्या पीसी वर उपलब्ध असलेली मोकळी जागा कशी वाढवावी याबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का किंवा तुमच्या शाळेतून मिळालेल्या अभ्यासासाठी जास्त जागा मोकळी लागेल असे तुम्हाला वाटते का? तसे असेल तर पुढे दिलेल्या पाच गोष्टी करा. त्याने तुमचा प्रश्न सुटेल आणि तुम्हाला भरपूर मोकळी जागा मिळेल.

1. धूळ काढून टाका

तुमच्या पीसी वर बसलेली धूळ तुमच्या पीसीचे भरपूर नुकसान करू शकते. एखादे मालवेअर जसे तुमच्या पीसी साठी त्रासदायक ठरू शकते तसेच पीसी च्या आत शिरलेली धूळ तुमच्या पीसीच्या हार्डवेअरचे आयुष्य कमी करू शकते. एखादे कापड आणि स्वच्छता द्रावण किंवा स्टिकी नोट वापरून तुम्ही कीबोर्ड, माऊस, मॉनिटर आणि इतर भाग स्वच्छ करू शकता. स्वच्छतेस सुरूवात करण्यापूर्वी सर्व गोष्टी स्विच ऑफ असल्याची खात्री करून घ्या.

2. तुमच्या हार्ड ड्राइव्ज मोकळ्या करा

आपण दररोज अनेक फाइल्स डाऊनलोड करतो. परंतु त्या सगळ्यांची आपल्याला कायम गरज असतेच असे नाही. तुमचे सर्व फोल्डर्स तपासा. ज्या फाइल्सच्या प्रती तयार झालेल्या असतील, ज्या फाइल्स नको असतील किंवा स्पॅम असतील त्या डिलिट करा. हे सर्व झाल्यावर मोकळी झालेली जागा पाहून तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल.

3. तुमच्या फाइल्सची पुनर्रचना करा

डिस्क डिफ्रॅगमेंटेशन बद्दल तुम्ही ऐकले आहे का? ऐकायला जरी हे क्लिष्ट वाटत असले, तरी त्यात काही विशेष नाही. यात, तुमच्या पीसी मधील इकडे तिकडे पसरलेल्या फाइल्सनां नीट, क्रमवार एका ठिकाणी लावून ठेवले जाते. यामुळे तुमच्या हार्डडिस्क मधील जागा रिकामी होऊन तुमचा पीसी नीट वेगाने काम करू लागतो.

4. तुमचा इनबॉक्स मोकळा करा

केवळ तुमच्या पीसी च्या स्टोरेज ला रिकामे केल्याने तुमचे काम पूर्ण होत नाही. तुमच्या इनबॉक्स मधील स्पॅम किंवा नको असलेल्या इमेल्स देखिल काढून टाका. तसेच स्पॅम मध्ये न जाता इतर फोल्डर मध्ये राहिलेल्या बिनमहत्वाच्या इमेल्स देखिल काढून टाका. मग तुमचा इनबॉक्स मोकळा होईल आणि बरीचशी जागा स्टोरेज साठी वापरता येईल.

5. न वापरले जाणारे प्रोग्राम्स काढून टाका

तुम्हाला ज्या गेष्टींची गरज नाही त्या अनइन्स्टॉल करण्याचा (काढून टाकण्याचा) सोपा मार्ग म्हणजे कंट्रोल पॅनल. कंट्रोल पॅनल मधील 'ॲड ऑर रिमूव प्रोग्राम्स' विभागात जा, तुम्हाला नको असलेली सॉफ्टवेअर्स शोधा आणि काढून टाका. तुमच्या पीसी मधली बरीचशी जागा रिकामी होईल.

आता स्टोरेज स्पेस (साठवणूकीची जागा) नीट हाताळल्यानंतर, तुमच्या कंप्युटर च्या आत काय आहे ते शिकायची वेळ आली आहे !