तुमच्या प्रकल्पासाठी 10 पैकी 10 गुण कसे मिळवावेत !

तुमच्या शालेय प्रकल्पांमध्ये पैकी च्या पैकी गुण कसे मिळवावेत असा प्रश्न तुम्हाला नेहमी पडतो का? तुमचा प्रकल्प सर्वांमध्ये उठून दिसावा असे तुम्हाला वाटते का? याचे उत्तर होय असे असेल तर, आम्ही तुम्हाला एक गुप्त सूत्र सांगू शकतो - तंत्रज्ञान !

शाळांमधील तंत्रज्ञान हे कंप्युटर वर्गापुरतेच मर्यादित न राहता ते विकसित होऊन शिक्षणाचे अष्टपैलू साधन बनले आहे. तुम्ही संकल्पना कश्या प्रकारे समजावून सांगता आणि प्रकल्प कसा पूर्ण करता हे आता पूर्णपणे तंत्रज्ञानाच्या वापरावर अवलंबून असते. तसेच चांगली गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर केल्याने तुम्हाला तुमच्या प्रकल्पासाठी आधिक चांगले गुण मिळू शकतात.

प्रकल्पामध्ये चांगले गुण मिळविण्याचे कोणते मार्ग आहेत?

1. चांगली नक्कल आणि प्रतिकृती

 

नादकाट्याचा (ट्यूनिंग फोर्क) वापर करून आपण स्पंदनांमुळे निर्माण होणारा ध्वनी जरी सप्रमाण सिद्ध करू शकत असलो, तरी उत्क्रांती म्हणजे काय, विविध परिस्थितींमध्ये पदार्थाचे रेणू कसे वर्तन करतात किंवा दोन ठराविक रसायने एकत्र मिसळणे धोकादायक का असते हे प्रयोगाने सिद्ध करणे कठीण असते. परंतु, ऑनलाइन उपलब्ध असलेल्या नकला आणि प्रतिकृतींच्या मदतीने ते सहजपणे सिद्ध करता येते. अत्यंत जटील अश्या वैज्ञानिक संकल्पना सहजतेने समजावण्यासाठी या लेखातील नकला आणि प्रतिकृतींचा वापर करा. दिलेल्या विषयावरील तुमचे ज्ञान सर्वांपर्यंत सहजतेने पोहचविण्यासाठी त्यांचा वापर करा आणि तुमचा प्रकल्प रूबाबात सादर करा.

2. कथाकथन आणि मल्टीमिडिया

एखादी संकल्पना समजावून सांगायची असल्यास त्या संकल्पनेभोवती एखादी कथा विणल्यास ती अतिशय सुंदर रीतीने समजावता येते. दृक-श्राव्य साधनांचा वापर करून सांगितली गेलेली कथा ही तुमचा प्रकल्प सर्वांमध्ये उठून दिसण्यासाठी नक्कीच मदत करते. हे करताना कधी कधी पाठ्यपुस्तकात उल्लेख न केलेल्या गोष्टी देखिल तुम्हाला शिकण्यास मिळू शकतात आणि मनोरंजक पद्धतीने अभ्यास होऊ शकतो.

खेमानी स्कूल, उल्हासनगर, महाराष्ट्र च्या प्राचार्या आणि विद्याशाखेच्या ज्येष्ठ सदस्या मोनिका सेवानी म्हणतात, "तुम्ही गोळा केलेली सर्व माहिती कथाकथनाचा मार्ग अनुसरून सर्वांपर्यंत पोहचविल्यामुळे तुम्हाला प्रकल्पासाठी 10 पैकी 10 गुण देण्यात येतील"

3. तुमचे सादरीकरण संस्मरणीय बनवा

 

शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या सादरीकरणाच्या कौशल्याने पारखत असतात. शिक्षणातील पीसी कथाकथनाच्या विजेत्या आझना नैम म्हणतात, "इतर कौशल्यांइतकेच सॉफ्ट स्किल्स ना देखिल महत्व असते आणि एम एस पॉवरपॉइंटच्या मूल्यांकनांचा वापर करून विद्यार्थी त्यांची सादरीकरणाची कौशल्ये पारखून घेऊ शकतात. त्यांना केवळ एक पीसी आणि चांगले इंटरनेट कनेक्शन यांची आवश्यकता असेल. तेवढे मिळाल्यावर ते अत्यंत संस्मरणीय असे सादरीकरण तयार करू शकतात."

विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या मदतीने कथाकथनाची कला शिकू शकतात आणि त्याच वेळी संबंधित विषयांवर बोलू ही शकतात.

तुम्ही जे काही शिकला आहात ते तुमच्या शिक्षक आणि वर्गसोबत्यांना दाखविण्यासाठी तुम्ही चित्रे आणि लिखाण असलेले एक सुंदर सादरीकरण तयार करू शकता.

कागद आणि पेन यांच्या सहाय्याने तयार केलेल्या प्रकल्पांच्या ऐवजी आजचे कंप्युटर्स आपल्याला आपण जे काही शिकलो आहोत ते अधिक चांगल्या आणि मनोरंजक पद्धतीने दर्शविण्यास मदत करतात. आपल्याकडे असलेली माहिती केवळ प्रदर्शित करण्याऐवजी पीसी आपल्याला आपले ज्ञान वेगळ्या पद्धतीने वापरून प्रकल्पामध्ये केवळ चांगले गुण मिळविण्यासाठीच नाही तर अधिक परिणामकारक आणि मनोरंजक रीतीने शिकण्यासाठी मदत करतात.