तुमच्या पाल्याला पीसी च्या मदतीने नवीन भाषा कशी शिकवावी

 

शाळेत कदाचित अनिवार्य असेलही परंतु, नवीन भाषा शिकण्याने तुमच्या पाल्याला भविष्यात काम करताना खूपच मदत मिळते. घरी बोलली न जाणारी भाषा तुमचा पाल्य शिकतो यातून तो येणा-या अडचणींवर सहज मात करू शकतो हे सिद्ध होते.

पीसी चा वापर करून घरातच नवीन भाषा शिकणे हे तुमच्या पाल्यासाठी खूप सोपे ठरते. खरं तर, काही अंशी ही प्रक्रिया वेगात देखिल होते. 24/7 शैक्षणिक स्त्रोत उपलब्ध असल्याने तुमच्या पाल्य त्याच्या गतीने आणि इच्छेनुसार भाषेवर प्रभुत्व मिळवू शकतो. शाळेत किंवा ट्यूशन्स मध्ये शिकण्यापेक्षा या प्रकारे अधिक जलद गतीने शिकता येते कारण काहीतरी नवीन शिकत असताना त्याची आवड निर्माण होणे महत्वाचे असते. पीसी चा वापर करून तुमचा पाल्य आनंदाने नवीन भाषा शिकू शकतो.

पीसी ची मदत कशी होते ते पुढे दिले आहे

 

1. व्याकरण शिका

तुमच्या पाल्याच्या भाषा शिकण्याच्या प्रवासातील पहिला महत्वाचा टप्पा म्हणजे व्याकरण शिकणे. आपल्या देशात शिकविल्या जाणा-या पुढील प्रादेशिक भाषा शिकण्यासाठी लागणारे दृकश्राव्य स्त्रोत उपलब्ध होण्यासाठी Mylangauge ही एक उत्तम जागा आहे.

1. गुजराती
2. कन्नड
3. तेलगू
4. बंगाली
5. हिंदी
6. मल्याळम
7. मराठी
8. पंजाबी
9. तामिळ

कित्येक बोर्ड त्यांच्या अभ्यासक्रमात मौखिक किंवा वक्तृत्व चाचण्यांचा देखिल समावेश करतात. एकदा तुमच्या पाल्याला त्या भाषेचे व्याकरण, भाषेतील महत्वाचे शब्द, वाक्प्रचार नीट समजले की सरावाने संभाषण सहज जमते.

 

2. भाषेत जिवंतपणा येताना पहा

आपण शिकत असलेली भाषा बोलता आली की समजावे अर्धे काम संपले आहे! शिकत असलेल्या भोषेत बोलले की त्या भाषेशी आपला वैयक्तिक संबंध प्रस्थापित होतो. YouTube, Voot, Hotstar, Netflix आणि अन्य स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्स वर वयाच्या अनुरूप उपशीर्षके असलेले सिनेमा आणि टीवी शो उपलब्ध असतात, ज्यांचा वापर तुमच्या पाल्याला उच्चार, भाषेच्या विशिष्ट लकबी आणि नवीन शब्द शिकण्यासाठी करता येऊ शकतो. याचा फायदा म्हणजे तुमचा पाल्याचे मनोरंजन होता होता शिक्षण देखिल होते. एकदा भाषेशी नीट ओळख झाली की त्याचा दीर्घकालीन फायदा होतो.

 

3. फ्लॅश कार्ड चे मित्र बना

शब्दसंग्रह वाढविण्यासाठी फ्लॅशकार्ड्स हा एक उत्तम मार्ग आहे. त्यांचा वापर करून मनोरंजक आणि स्पर्धात्मकरित्या तुम्हाला भाषेवर प्रभुत्व मिळविता येते. आपल्या मुख्य प्रादेशिक भाषांसाठी 101 Languages हा एक उत्तम पीसी स्त्रोत आहे.

1. हिंदी
2. बंगाली
3. तेलगू
4. तामिळ
5. मराठी
6. गुजराती

सर्व बोर्ड्स च्या दूसरी किंवा तिसरी भाषा शिकण्याच्या दृष्टीने ही वेबसाइट चांगली आहे.

डिजिटल पालक होण्यातील सर्वोत्तम गोष्ट म्हणजे, तुम्ही तुमच्या पाल्याच्या येणा-या शैक्षणिक वर्षांसाठी यशाचा मार्ग तयार करत असता!