शाळेतील विषय-सादरीकरणे (प्रेझेन्टेशन) अधिक आकर्षक कशी करावीत?

वर्गात एखाद्या विषयावर प्रेझेन्टेशन करायचं म्हटलं की दडपण येतं, पण तसं दडपण यायची काही गरज नाही. योग्य नियोजन आणि एका चांगल्या कॉम्प्युटरवर छान तयारीनिशी तुम्ही हे चित्र अगदी बदलू शकता. जर आता थोड्याच दिवसात तुम्हाला शाळेत एखादे प्रेझेन्टेशन (सादरीकरण) करायचे असेल, तर आम्ही आलो आहोत तुमच्या मदतीसाठी, चला आपण एकत्रितपणे यावर मस्त मार्ग शोधून काढूया.
तुमच्यासाठी या काही छोट्या छोट्या आणि साध्या टिप्स आहेत यांचा उपयोग केलात तर तुमचे प्रेझेन्टेशन (सादरीकरण) सगळ्या वर्गाला आवडेल!

१. नेहमी मुद्देसूद बोला

प्रेझेन्टेशन (सादरीकरण) सुरू करण्याआधी स्वत:ला विचारा, “जर मी फक्त तीनच गोष्टी लक्षात ठेवू शकत असेन, तर मी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात?’’

ह्या सवयीमुळे आपल्याला हवे तेवढे नेमके टेक्स्ट ठेवता येते आणि अनावश्यक भाग गाळता येतो. तुमच्या शिक्षकांना तुमच्या सादरीकरणामध्ये जो भाग अपेक्षित आहे, त्या प्रत्येक गोष्टीची चेकलिस्ट तयार करा.

२. चित्रांच्या मदतीने तुमचे सादरीकरण अधिक बोलते करा.

आपण वापरत असलेली ९०% माहिती ही दृश्य-स्वरूपात आहे. फोटोग्राफ्स (छायाचित्रे), डायग्राम्स (आकृत्या), चार्ट्स (तक्ते), मॅप्स (नकाशे) आणि चित्रे (ड्रॉइंग्ज) – हे सर्व घटक तुमचा मुद्दा पुढे नेण्यास मदत करतात आणि तुम्ही जेव्हा तुमचे प्रेझेन्टेशन करता, तेव्हा इतरांना त्यात रस (इंटरेस्ट) वाटतो. तुम्ही वापरत असलेले व्हिज्युअल (दृश्य) तुमच्या मुद्द्याला आधार देणारे असावे तसेच एका स्लाईडमध्ये एकाहून अधिक चित्रे वापरणे टाळा जेणेकरून स्लाईड सुटसुटीत आणि संक्षिप्त दिसेल.

३. टेम्प्लेट्सचा उपयोग करून पाहा.

मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट, गुगल स्लाईड्स, प्रेझी आणि पीसी प्रेझेन्टेशनच्या इतर टूल्समधून तुम्ही तुम्हाला हव्या तशा अनेक प्रकारच्या टेम्प्लेट्स निवडू शकता. शिवाय त्यांच्या मूळ स्वरूपात फेरफार करण्याची सोय (कस्टमायझेबल) देखील असते. तुमचे प्रेझेन्टेशन सर्वोत्तम व्हावे यासाठी तुमच्या पसंतीनुसार फॉन्ट, स्लाईड ट्रांझिशन्स, अॅनिमेशन साउंड्स आणि पूर्ण बॅकड्रॉप किंवा पार्श्वभूमीसाठी सेक्शन हेडर्स तुम्ही निवडू शकता.

४. सरावाने मनुष्य उत्कृष्ट बनतो.

उत्तम सादरीकरण हे संवादाने अधिक खुलते. दोन्ही बाजूंनी संवाद घडला तर तुम्ही (किंवा तुमचा ग्रूप) सगळ्यांच्या अधिक लक्षात राहाल आणि त्यामुळे चर्चा रंगत जाते. अशा प्रकारच्या प्रयत्नांचे तुमच्या शिक्षकांकडून अधिक कौतुक केले जाते. सादरीकरण करताना सर्वांसमोर बोलण्याचा आत्मविश्वास मिळवायचा असेल, तर घरात तुमच्या पालकांसमोर आणि मित्र-मैत्रिणींसमोर सादरीकरणाचा चांगला सराव करा तसेच त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांचा उपयोग करून तुमचे सादरीकरण उत्तम करण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, प्रत्येक सरावानंतर, तुम्हाला तुमचा प्रत्येक मुद्दा अधिक स्पष्ट आणि वेगाने मांडता येईल.
थोडक्यात सांगायचं तर, योग्य माहिती तसेच डिझाईनसह थोडा सादरीकरणाचा सराव यामुळे तुम्ही शाळेत एक उत्तम सादरीकरण देऊ शकता.
हा लेख तुम्हाला उपयुक्त वाटला का? शाळेसाठी तुम्हाला अशाच छान टिप्स हव्या असतील तर, तुमच्या प्रोजेक्ट किंवा प्रकल्पात १०/१० गुण कसे मिळवायचे, हा लेख तुम्ही वाचू शकता.