मुले कंप्यूटर लॅब मध्ये असताना त्यांच्या इंटरनेटच्या सुरक्षित वापरासाठी काय करावे

इंटरनेट हे शिक्षण आणि माहितीसाठी बनविले गेलेले एक अतिशय प्रभावी असे साधन आहे. ज्ञात जगातील प्रत्येक विषयावरील डेटा आणि माहितीच्या गुप्तधनाचा हा पेटारा आहे. परंतु त्याच वेळी मुलांना आक्षेपार्ह मजकूर देखिल सहजगत्या उपलब्ध होऊ शकतो. म्हणूनच मुलांना अशी माहिती मिळविण्यापासून थांबविण्यासाठी शाळेत काही उपाययोजना आखणे आवश्यक ठरते. [1]

ते कसे करता येईल याबद्दलची माहिती :

 

1. प्रौढांसाठी असलेला मजकूर असलेल्या वेबसाईट्स ब्लॉक करणे

जुगार, मादक पदार्थ, हत्यारे इत्यादी मुलांनी पाहू नयेत अश्या गोष्टींच्या वर्णनांनी भरलेल्या अगणित साइट्स इंटरनेटवर अस्तित्वात आहेत. लहान मुलांकडून, इतर मजकूर बघत असताना (बहुतांश वेळी न समजून घेता फोटो किंवा लिंक्स वर क्लिक केल्याने) चुकून अश्या साइट्स ओपन होऊ शकतात तर मोठी मुले जाणीवपूर्वक त्या साइट्स शोधत असू शकतात. याच कारणामुळे शाळांमधील कंप्यूटर्स वर प्रौढ मजकूर असलेल्या वेबसाइट्स ब्लॉक करणे गरजेचे असते.


2. VPNs म्हणजेच थर्ड पार्टी फाइल शेअरिंग ब्लॉक करून डाउनलोड्स टाळणे

VPN (वर्चुअल प्रायवेट नेटवर्क) हे लोकांना अंतर्गत बोगदा तयार करून त्याद्वारे लावले गेलेले सुरक्षा निर्बंध टाळण्यास मदत करते. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंटरनेट वरील आक्षेपार्ह विभाग हाताळणे किंवा बेकायदेशीर मजकूर डाऊनलोड करण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी नेट नॅनी, नॉर्टन फॅमिली किंवा K9 सारख्या वेब संरक्षक सॉफ्टवेयर्सचा वापर करावा.

3. फाइल्सच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याकरिता ॲक्सेस फिल्टर्स चा वापर


वापरकर्ते सिस्टमवर काय करू शकतात आणि काय नाही हे ॲक्सेस कंट्रोल लिस्ट (ACL) ठरविते. इंटरनेट वरून विद्यार्थ्यांना आक्षेपार्ह मजकूर डाऊनलोड करता येऊ नये यासाठी ACL मध्ये सुधारणा कराव्या लागतात. त्यासाठी फाइल ॲक्सेस फिल्टर्स असलेल्या विविध ऑनलाइन सेवांचा वापर करावा. इतर फाइल्स वापरण्यास उपलब्ध ठेवून तुम्ही निवडलेल्या ठराविक फाइल्सना हे फिल्टर्स लागू करता येतात.[3].

शिक्षक आणि शालेय प्रशासकांनी मिळून विद्यार्थ्यांच्या शालेय वापरासाठी कोणत्या वेबसाइट्स उपयुक्त आहेत हे ठरविणे आणि त्यानुसार निर्णय घेणे सर्वात जास्त महत्वाचे असते. इंटरनेट ॲक्सेसला फिल्टर लागू करत असताना, विद्यार्थ्यांना त्यांच्याशी संबंधित अशी माहिती मिळत राहावी याची काळजी घेणे देखिल गरजेचे असते. यासाठी अनेक AIO डेस्कटॉप्स मध्ये McAfee च्या सुरक्षा सेवा अंतर्भूत केलेल्या असतात. चला तर मग, या मांडणीच्या आधारे विद्यार्थ्यांच्या शालेय वापरासाठी इंटरनेट सुरक्षित बनवूया.