तुमच्या सुट्टीचा जास्तीत जास्त वापर कसा करून घ्याल

 

सुट्टी म्हणजे आनंद आणि स्वातंत्र्य - पण आता सुट्टीत तुम्हाला केवळ मैदान किंवा प्ले स्टेशन इतक्या पुरतेच मर्यादित रहायची गरज नाही. तुमच्या पीसी वर उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून तुमच्यातील सर्जनसीलता जागृत ठेवा. नवनविन गोष्टी शिका आणि मजा करण्याबरोबरच तुमच्या मित्रपरिवारात आघाडीवर रहा.

1. यूट्यूब च्या सामर्थ्याचा वापर करा

यूट्यूब वर स्वतःचे चॅनल सुरू करून तुमची प्रतिभा जगासमोर सादर करा. त्याचबरोबर इतर लोकांकडून नविन कौशल्ये शिका. SciShow सारख्या चॅनल्स वर पाहून तुम्ही सुरक्षिततेचे भान राखून घरात लहान लहान प्रयोग देखिल करू शकता. घरात आइसक्रीम कसे बनवायचे किंवा खेळण्यासाठी फ्लफी स्लाइम (फुगलेला चिकट स्त्राव) कसा बनवावा ते दाखवणारे मजेशीर व्हिडिओज् या चॅनल वर उपलब्ध असतात.

2. नविन कौशल्य शिका

तुमच्या पीसी वरील अडोब फोटोशॉप, पॉवरपॉइंट, एक्सेल सारख्या नविन सॉफ्टवेयर्स चा अभ्यास करा किंवा Codeacademy सारख्या वेबसाइट्स वरून कोडिंग शिका. या वेबसाइट्सवर नवशिक्यांसाठी जावास्क्रीप्ट, वेब डेवलपमेंट सारखे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध असतात. ही कौशल्ये शिकण्याने केवळ तात्पुरते मनोरंजन होते असे नाही तर भविष्यातील तुमच्या कारकीर्दीसाठी देखिल ती उपयोगी ठरतात.

3. वाचा आणि संशोधन करा

तुमच्या आवडीच्या विषयांवरील जास्त ज्ञान मिळविण्याची तुम्हाला इच्छा आहे का? तर मग तुमच्या सुट्टीचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी Wikipedia, Quora, National Geographic Kids आणि How Stuff Works सारख्या साइट्स पहा. या वेबसाइट्स वर विज्ञान, इतिहास, कला, संस्कृती इत्यादी अनेक विषयांवरील अफाट माहिती उपलब्ध असते.

4. तुमच्या "भाषेचा" अभ्यास करा

www.vocabulary.com चा वापर करून तुमची शब्दसंपदा वाढविणे किंवा नविन भाषा शिकणे याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होऊ शकतो. संशोधनाद्वारे हे सिद्ध झाले आहे की नविन भाषा शिकल्याने आपली आकलनशक्ती वाढते, शैक्षणिक प्रगती होते आणि मेंदू देखिल तल्लख होतो. संवादात्मक पद्धतीने भाषा शिकण्यासाठी www.duolingo.com ची मदत घ्या.

5. इ-लर्निंग चा प्रयत्न करून पहा

आपण नेहमी, उन्हाळ्याची सुट्टी ही आराम करण्यासाठी असते असाच विचार करतो. पण दिवसातील एक तास मोकळा काढून, त्याच सुट्टीचा वापर तुम्ही जर पीसी वर एखादा इ-लर्निंग कोर्स करण्यासाठी केला, तर वर्गातील इतर मुलांच्या पुढे जाऊ शकाल. मूलभूत संकल्पना जर समजून घेतल्या, तर वर्गात शिकविल्या जाणा-याजटील संकल्पना तुम्ही सहजतेने शिकू शकाल. प्रयत्न करून तर पहा, फरक तुम्हालाच जाणवू लागेल.

तुमच्या स्वतःच्या सवडीने नविन कौशल्ये शिकण्यासाठी सुट्टीचा काळ हा अत्यंत उपयुक्त ठरतो. नविन गोष्टी शिकल्याने तुम्ही पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी नीट तयार असा. एकदा शाळा सुरू झाली की मग तुम्ही आफ्टर- स्कूल- क्लब द्वारे तुमची कौशल्ये आणखी विकसित करू शकता.