एक शिक्षक म्हणून लिंक्डइन ला ऑप्टिमाइज (अनुकूल) कसे करावे

 

लिंक्डइन मुळे तुम्ही जगभरातील लोकांशी सहजतेने संपर्क साधू शकता त्यामुळे ते तुमच्यासाठी महत्वाचे टूल ठरते. लिंक्डइन वापरण्यास सुरूवात करण्यापूर्वी तुम्हाला तुमचे प्रोफाइल अनुकूल करावे लागते जेणेकरून तुम्ही योग्य दिशेने जात आहात याची तुम्हाला खात्री होईल.

 

1. हेडशॉट अपलोड करा

तुमच्या लिंक्डइन प्रोफाइलसाठी तुमचा व्यावसायिक हेडशॉट वापरा. असे दिसून आले आहे की ज्यांचा प्रोफाइल फोटो असतो त्यांचे अकाउंट प्रोफाइल फोटो नसलेल्या लोकांपेक्षा किंवा ग्रुप फोटो असलेल्यांपेक्षा 14 पट जास्त वेळा पाहिले जाते.

 

2. हेडलाइन

होय, तुमच्या हेडलाइन ने खूप फरक पडतो! चित्तवेधक हेडलाइन असेल तर तुमच्यासारखे प्रोफाइल शोधणाऱ्या लोकांकडून तुम्हाला खूप प्रतिसाद मिळतो. लिंक्डइन वर तुमच्या नावाच्या बाजूलाच ती हेडलाइन दिसते त्यामुळे योग्य लोकांचे लक्ष वेधले जाण्याचा तो चांगला मार्ग आहे.

 

3. सारांश

तुमच्या हेडलाइनने योग्य लोकांना वेधून घेतले आहे. आता त्यांना वाचनात गुंतवण्यासाठी तुमची गोष्ट तयार करा आणि जे महत्वाचे आहे ते दाखवा. तुमची महत्वाची कौशल्ये आणि तुम्ही संपादन केलेले ज्ञान हाइलाइट करा ज्यामुळे लोकांना तुम्ही खरे कसे आहात ते समजून येईल.

 

4. अनुभव

तुम्ही नोकरी करत असलेल्या आधीच्या किमान दोन पदांचा समावेश करणे महत्वाचे असते. त्याचबरोबर जर तुम्ही काम शोधत असाल तर ज्याप्रकारचे नविन काम शोधत आहात ते सुद्धा हाइलाइट केले पाहिजे त्याने लोकांना तुम्ही भविष्यात कोणत्या दिशेने जाणार ते समजते.  

 

5. शिफारस

तुमची शिफारस करण्यासाठी एखाद-दोन लोकांना इन्वाइट करा ज्यामुळे तुमच्या प्रोफाइलचे मूल्य वाढेल. शिफारसींमुळे लोकांचा तुमच्यावरील विश्वास दिसून येतो त्यामुळे लोकांना तुमची जी कौशल्ये कळावीत असे तुम्हाला वाटत असेल त्यांना शिफारसीमध्ये महत्व द्या.

 

6. बोनस – नियमितपणे अपडेट करत रहा!

लिंक्डइनचा तुम्हाला योग्य तितका फायदा व्हावा असे जर तुम्हाला वाटत असेल, तर इतर सोशल मिडिया चॅनल्स प्रमाणेच ते नियमित वापरत रहा. शैक्षणिक पोस्ट शेअर करा, लेखांवर तुमची मते द्या, सहकारी आणि टीम मधील सदस्यांना अभिनंदनपर नोट पाठवा, जेव्हा कधी तुम्ही काही नविन साध्य कराल तेव्हा तुमचे प्रोफाइल अपडेट करा आणि तुम्हाला आलेल्या मेसेजेसनां नियमितपणे वेळेवर उत्तरे द्या. शिक्षणाच्या क्षेत्रात काय घडत आहे यावर लक्ष ठेवणे महत्वाचे असते.

 

चला तर मग, तुमची शिकवण्याची कौशल्ये विकसित करत असतानाच लिंक्डइनचा देखिल पुरेपुर वापर करून घ्या!