टेक-सॅव्ही मुलांना कसे वाढवावे?

“IT+IT=IT

Indian talent +Information technology = India tomorrow”

(भारतीय बुद्धिमत्ता + माहिती तंत्रज्ञान = उद्याचा भारत)

-नरेंद्र मोदी

 

हल्लीच्या युगात, वैयक्तिक वागणुकीपेक्षा तुम्ही तांत्रिक दृष्ट्या किती प्रगत आहात, यावरून तुमचे सामाजिक विश्व ठरवले जाते. बहुतांश मुले खूप स्मार्ट असतात, बारकाईने निरीक्षण करणारी असतात आणि तंत्रज्ञानातील नवनवीन बदल ते झपाट्याने स्वीकारतात.

या तंत्रज्ञानाचा मुले प्रभावीपणे आणि योग्य  रीतीन वापर करत आहेत हे जाणून घेऊन उत्तम टेक्नो-सॅव्ही मुलाला मोठं करताना पालकांनी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

टेक्नॉलॉजी संबंधित चर्चांमध्ये मुलांना सहभागी करून घेणे - तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीविषयी तसेच त्याच्या फायद्याविषयी तुमच्या मुलांशी मोकळेपणाने चर्चा करा. पीसीविषयी त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण होईल यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या, मुले ऑनलाईन काय काय सर्च करतात ते समजून घ्या विशेषत: समाज माध्यमे म्हणजेच सोशल मीडिया कशाप्रकारे हाताळत आहेत, ते विश्वासाने जाणून घ्या. मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होईल अशाप्रकारे त्याचे फायदे तोटे त्यांना समजावून सांगा.

शैक्षणिक क्षेत्रात तंत्रज्ञान / टेक्नॉलॉजी च्या माध्यमातून सहभाग - जगभरातील 5-24 वर्षे या वयोगटाचा विचार करता भारतात या वयोगाटातील लोकसंख्या सर्वाधिक आहे. परिणामी शिक्षण क्षेत्रातील संधी सुद्धा सर्वाधिक आहेत (ibef.org- July 2019). विद्यार्थ्यांना त्यांच्या माध्यामिक, उच्च माध्यमिक शिक्षणातून अधिकाधिक तंत्रज्ञानयुक्त शैक्षणिक अनुभव मिळावेत, अशी अपेक्षा आहे. तपशील किंवा कंटेण्टचा महासागर, शैक्षणिक व्हीडिओज,  रियल टाईम ट्यूटरद्वारे शिक्षण, वगैरे गोष्टी सहज उपलब्ध आहेत आणि त्यामुळे शिक्षणाच्या पद्धतीमध्ये विलक्षण बदल आणि किमया घडून आलेली दिसते. पूर्वीच्या काळी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी वेगवेगळ्या शिक्षकांकडे जावे लागत असे, मात्र रियल टाईम ट्यूटरद्वारे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना एकाच जागी बसून अथपासून इतिपर्यंत शिक्षण घेता येते. 

टेक्नॉलॉजीला तुमचा साथीदार समजा - एखाद्या टेक-सॅव्ही मुलाने अतिशय इंटरेस्ट/रस घेऊन गॅजेट/उपकरणाविषयी संपूर्ण माहिती घेतली, तर त्या गॅजेटशी त्यांची मैत्री व्हायला वेळ लागत नाही. त्याचे अनेक फायदे आहेत. पीसी म्हणजे नुसते यंत्र नाही, त्याहूनही खूप काही देणारे एक वरदान आहे. ते शिक्षण किंवा ज्ञान मिळवण्याचे एक माध्यम आहे, करमणुकीचा खजिना आहे, झकास स्टोरी टेलर (कथाकथनकार) आहे आणि खूप काही!

समतोल साधा - टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञानावर प्रमाणापेक्षा जास्त काळ अवलंबून राहिलात, तर त्याचे दुष्परिणामही दिसतात. सगळ्याच माहितीमध्ये तथ्य आणि सत्यता असेल असं सांगता येत नाही. मात्र मुलांना माहिती मिळवण्यासाठी तो एक चांगला पर्याय आहे, असं आपण म्हणू शकतो. मुले त्यांच्या पालकांचे अनुकरण करतात. त्यामुळे मुलांबरोबर प्रत्यक्ष वेळ घालवणे, त्यांच्याशी संवाद साधणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. पीसी आणि मुलांना द्यायचा वेळ यात समतोल राखण्याचा प्रयत्न करा.

लक्षात ठेवा, आजच्या काळात पीसी/ संगणक ही शिक्षणाची गरज आहे. - पालक म्हणून आपण हा बदल स्वीकारायला हवा आणि तुम्ही सुद्धा मुलांबरोबर या प्रक्रियेत सहभागी व्हा