परीक्षेच्या वेळी येणारा ताण कसा कमी करावा?

 

जेव्हा परीक्षेच्या अभ्यासाने तुम्ही चिंतातूर झालेले असता, तेव्हा तुमच्यावर खूप ताण येऊ शकतो. पण ह्या ताणाने तुमच्या गुणांवर प्रतिकूल परिणाम करण्याआधीच ह्या ताणाला दूर करण्यासाठी सज्ज व्हा आणि तुमची अभ्यास-प्रक्रिया आनंदादायी करा. पीसी म्हणजे कॉम्प्युटर तुम्हाला कशी मदत करतो, ते बघूया:

१. वेळ हेच त्रिवार सत्य आहे

परीक्षेच्या अगदी आदल्या दिवशी तुम्हाला अभ्यासाच्या शंका सतावणे, यासारखी दुसरी वाईट गोष्ट नाही. म्हणूनच तुमच्या पहिल्या पेपरच्या किमान महिनाभर आधी अभ्यास सुरू करणे हे कधीही फायदेशीर ठरते. त्यांनतर तुम्ही जितकी अधिकवेळा उजळणी कराल शिवाय प्रश्नपत्रिका सोडवायचा सराव कराल, तेवढे तुम्ही परीक्षेच्या त्या दिवसासाठी जय्यत तयार असाल.

२. नियोजनाचे सामर्थ्य

चांगला नियोजक होणे ही काही सहज होण्यासारखी गोष्ट नाही. ते प्रत्येकाकडे मुळातच असेल असंही नाही आणि सुरवातीला तर त्याची भीतीच वाटते. पण गुगल कॅलेंडर सारख्या टूलची मदत घेतली तर, तुम्हाला अगदी व्यवस्थित दिशा मिळू शकते, एखादा धडा पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागू शकतो ह्याचा अचूक अंदाज येऊ शकतो, तुम्ही अवघड विषयांना अधिक प्राधान्य देऊ शकता आणि इतकंच नाही तर मध्ये मध्ये जरा विश्रांती सुद्धा घेऊ शकता!

३. थोडी विश्रांती सुद्धा उपयुक्त असू शकते.

समजा, तुम्ही एका क्षणाचीही-विश्रांती न घेता सकाळभर अभ्यास केला आहे. त्यामुळे एकतर तुम्ही खूप दमून जाल, कंटाळून जाल किंवा या दोन्ही गोष्टींमुळे पुढे दिवसभर तुम्ही काहीच अभ्यास करू शकणार नाही. अशी स्थिती टाळण्यासाठी, तुम्ही टप्प्याटप्प्याने पण गतीने, पूर्ण लक्ष एकवटून एक तासभर व्यवस्थित अभ्यास करू शकता आणि नंतर साधारण १५ मिनिटे एखादा खेळ खेळू शकता.

४. बोलून मोकळे व्हा.

एखादी समस्या बोलून दाखवल्यामुळे अर्धी हलकी होते, असं म्हणतात. मुले, त्यांच्या वर्गमित्रांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी संवाद साधण्याकरिता तसेच मोठ्या वर्गातील मुलांकडून त्याच्या समस्या सोडवून घेण्याकरिता आणि तणावाचे, चिंतेचे विचार मनातून घालवण्याकरिता सोशल मिडीया नेटवर्कवर त्यांचा एखादा ग्रूप बनवू शकतात किंवा विकिस्पेस क्लासरूम जॉईन करू शकतात.

५. मोकळे मन म्हणजे निग्रही मन

जेव्हा आपण प्रचंड ताणाखाली असतो, तेव्हा आपण अति -विचार करतो आणि स्वतःचाच गोंधळ उडून जातो. माईंड मॅपिंग एखाद्याच्या डोक्यातील विचारांचे दृष्यरूपात मांडणी करते आणि त्यातूनच उपयुक्त कल्पना/युक्त्या आकार घेतात. शिवाय अवघड आणि गुंतागुंतीच्या विषयाचे रुपांतर सुलभ रीतीने आकलन होईल अशा लहान लहान गटात रुपांतर होते.
ऐन परीक्षेच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा काळात तुमच्यावरचा ताण कमी व्हावा ह्यासाठी तर पीसी मदत करतोच शिवाय पूर्ण वर्षभर पीसी तुम्हाला अनेक प्रकारे उपयुक्त ठरतो. प्रकल्पासाठी संशोधन करण्यापासून ते निबंध लेखनापर्यंत सर्व गोष्टींसाठी पीसी म्हणजेच कॉम्प्युटर तुम्हाला माहितीच्या जगाची खिडकी खुली करून देतो. ज्या खिडकीतून पाहिल्यावर अभ्यास हा ताण न वाटता इंटरेस्टिंग आणि मजेदार वाटतो. शिवाय त्यामुळे प्रकल्पात तुम्हाला पैकीच्या पैकी (१०/१०) गुण मिळण्याची शक्यताही वाढते.