तुम्ही तुमच्या मुलाला इ-शिक्षणाचा बदल स्वीकारण्यासाठी कशी मदत करु शकता

 

सध्या शिक्षणपद्धतीत होत असलेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी इ-शिक्षणाशी जुळवून घेतलं पाहिजे. शैक्षणिक आणि परस्पर-संवादी संगणक-शिक्षणाच्या माध्यमातून तुमच्या मुलाच्या विकासामध्ये सक्रीय सहभागी व्हायची हीच वेळ आहे. तुमच्या मुलांसाठी ऑनलाईन वर्ग कसे परिणामकारक करता येतील हे शिकण्यापूर्वी, आम्हीला इथे इ-शिक्षणाविषयी काही गैरसमज दूर करायचे आहेत.

 

-ही शिक्षणाची परिणामकारक पद्धत नाही

शिक्षकांना मुलांना ज्ञान देण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. त्यामुळे शिक्षकांच्या प्राविण्यात बदल होत नाही.

 

-हे परिणामकारक नसेल

इथे मुलांना शिक्षणात गुंतवण्यासाठी शिक्षकांकडे कितीतरी अधिक साधनं असतील, त्यामुळे शिक्षणाची परिणामकारकता वाढेल.

 

-यात परस्पर संवाद नसेल

परीक्षण, ऑनलाईन प्रश्नमंजुषा, मतदान आणि दृक्-श्राव्य माध्यमांच्या वापरामुळे, ऑनलाईन शिक्षण, जरी अधिक नसलं, तरी प्रत्यक्ष शिक्षणाएवढंच सुरस आणि परस्पर-संवादी असतं.



पालक म्हणून शिक्षणप्रक्रियेतल्या मोकळ्या जागा भरण्यासाठी आणि तुमच्या मुलाच्या शिक्षणात सक्रीय सहभागी होण्यासाठी तुम्ही हे करु शकता:

 

  • तुमच्या मुलासाठी कमीत कमी व्यवधानं असलेली एक ठराविक अभ्यासाची जागा निश्चित करा.
  • तुमच्या मुलाने शाळेत जे वेळापत्रक पाळलं, तेच कायम राहील याची खातरजमा करा.
  • तुमचं वेळापत्रक त्याच्याशी जुळवून घ्या, जेणेकरुन मधल्या मोकळ्या वेळेत तुम्ही त्यांना वेळ देऊ शकाल.
  • स्वाध्याय आणि गृहपाठाचे प्रिंट आऊटस् काढून त्यांचा स्क्रीन-कालावधी मर्यादित ठेवा.
  • तुमच्या मुलाने स्वाध्याय नीट पूर्ण केले आहेत, याची खातरजमा करण्यासाठी इतर पालक आणि शिक्षकांशी समन्वय साधा.

 

‘डेल फॉर एज्युकेशन’ च्या माध्यमातून घरी आदर्श ऑनलाईन शिक्षणाचं वातावरण निर्माण करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही वेबिनार सुरु केले आहेत. त्यात तुम्ही ऑनलाईन शिक्षण, सामाजिक-आर्थिक कौशल्य-विकास, शिक्षणाचा अवकाश निर्माण करणं, शिक्षक आणि शाळांसह काम करणं आणि घरी घेतल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा वाढवणं- या सगळ्यातल्या तुमच्या नेमक्या भूमिकेविषयी जाणून घेऊ शकता.

 

चला, आपण सगळे एकत्रितपणे शिक्षणाच्या या नव्या पर्वाशी जुळवून घेऊया आणि मोकळ्या मनाने शिक्षणाच्या भवितव्याचं स्वागत करुया. हे अगदी इथे क्लिक करण्याएवढं सोपं आहे.