हायब्रीड आणि ब्लेंडेड अध्ययन

दोन वर्षांपूर्वी शिक्षण फक्त शाळेतील वर्गापुरतेच मर्यादित होते. पण 2020 पासून, महामारीमुळे शिक्षण आता व्हर्च्युअल वर्गांमध्ये स्थलांतरीत झाले आहे. लॉकडाऊन्स शिथील करण्यात आल्यानंतर आणि अॅक्टीव्ह केसेसची संख्या कमी झालेली असताना, आपण हायब्रीड आणि ब्लेंडेड अध्ययन मॉडेल्सकडे परत जाण्याचा प्रयत्न केला.   

हायब्रीड आणि ब्लेंडेड अध्ययनाचा अर्थ एकच आहे असा गैरसमज बऱ्याचदा होतो. जरी त्या दोन्हींमध्ये समान घटक असले तरीही उदा. ऑनलाईन आणि प्रत्यक्ष वर्ग, तरीही या दोन्हींमध्ये खूप फरक आहे. या दोन्हीतील फरक तुम्हाला समजायला मदत होण्यासाठी इथे काही मुद्दे दिलेले आहेत:

  • हायब्रीड अध्ययनात काही विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात उपस्थित असतात, तर उरलेले शिक्षणासाठी PC वापरतात. शिक्षक किंवा प्रशिक्षक ऑनलाईन शिकणाऱ्यांना आणि वर्गात शिकणाऱ्यांना एकाच वेळी शिकवण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सारखे तंत्रज्ञान वापरतात.
  • ब्लेंडेड अध्ययन म्हणजे जेव्हा प्रशिक्षक किंवा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही संसाधनांचा एकत्रित उपयोग करतो. काही उपक्रम PC वरून शिक्षणाद्वारे  केले जातात तर काही प्रत्यक्ष वर्गात केले जातात.
  • हायब्रीड अध्ययनामध्ये, PC च्या मदतीने अध्ययन आणि प्रत्यक्ष अध्ययन यात निवड करणे विद्यार्थ्यांवर अवलंबून असते.
  • तर दुसऱ्या बाजूला, ब्लेंडेड अध्ययनात ऑनलाईन आणि प्रत्यक्ष उपक्रम शिक्षकाद्वारे ठरवले जातात.
  • हायब्रीड अध्ययनात प्रत्यक्ष शिकणारे आणि ऑनलाईन शिकणारे विद्यार्थी वेगवेगळे असतात.
  • तर ब्लेंडेड अध्ययनात तेच विद्यार्थी प्रत्यक्ष आणि ऑनलाईन दोन्ही वर्गात सहभागी होतात.

जरी दोन्ही प्रकारची अध्ययन मॉडेल्स PC च्या मदतीने अध्ययन आणि प्रत्यक्ष अध्ययन यांचा वापर करत असली तरीही, ही अध्ययनाची दोन वेगवेगळी मॉडेल्स आहेत. सध्यासारख्या परिस्थितीत, अध्ययनाची दोन्ही मॉडेल्स विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी अतिशय उपयुक्त आहेत.