मला वाटते की मुलांना मदत करण्यासाठी पालकांना तंत्रज्ञानाबद्दल माहिती असली पाहिजे

 

 

दोन मुलांची आई असलेल्या एकता शाह या लाइफ ऑफ अ मदर द्वारे शब्दांच्या माध्यमातून बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

1. शिक्षणासाठी पीसी - भारतीय विद्यार्थ्यांना कसा फायदा होऊ शकेल?

हल्ली, शिक्षणासाठी पीसी चा वापर करणे जीवनावश्यक बनले आहे. ज्ञान मिळविण्याच्या पद्धतींमध्ये, तंत्रज्ञान कशाप्रकारे अमूलाग्र बदल घडवून आणत आहे ते मी गेल्या काही वर्षांपासून बघत आहे. शिक्षकांची कमतरता असलेल्या ग्रामिण विभागांमध्ये देखिल ऑनलाइन शिक्षणामुळे प्रगती होत आहे. दृक-श्राव्य पद्धतीने अभ्यास केल्यास, संकल्पना नीट समजतात आणि जास्त काळ लक्षात राहतात.

माझ्या मुलांना जेव्हा मी शैक्षणिक व्हिडिओज च्या मदतीने शिकवते, तेव्हा मला फरक जाणवून येतो. शिकविण्याचा हा सोपा आणि मजेदार मार्ग आहे.

2. डिजिटल पालकत्वामध्ये तुम्ही मातब्बर आहात असे तुम्हाला वाटते का?

होय, मी आहे. तुम्ही यापासून दूर राहू शकत नाही. मला असे वाटते की मुलांना अभ्यासात मदत करण्यासाठी आधी पालकांनी तंत्रज्ञान समजून गेतले पाहिजे. तंत्रज्ञानाने आपले आयुष्य सुखकर केले आहे यात काही शंका नाही पण, त्याची दूसरी बाजू देखिल आहे जी आपण पूर्णपणे नजरेआड करू शकत नाही. मला जर त्याचे परिणाम माहित असतील तरच मी माझ्या मुलांना त्यातील धोके सांगू शकेन. इंटरनेटचा नीट वापर कसा करावा हे माहित असल्याशिवाय ते वापरणे सुरक्षित नसते. मुलांना इंटरनेट वापरण्याची मुभा द्यायच्या आधी पालकांनी त्यांना नीट समजावले पाहिजे.

3. तुमच्या लहानग्यांना अभ्यासात मजा यावी यासाठी तुम्ही काय करता?

प्रामाणिकपणे सांगायचे तर कित्येक वेळेस त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती असते. पण मी त्यांना मोजक्या शब्दांत उत्तरे देण्याचे टाळते. बहुतांश वेळा मी माझा अनुभव त्यांना गोष्टीच्या रूपात सांगते, त्याने तो जास्त मनोरंजक होतो. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना जे पहायचे असते किंवा शिकायचे असते त्यासाठी मी त्यांना लॅपटॉप किंवा डेस्कटॉप देते आणि एका ठराविक अंतरावरून आणि नीट बसून वापरण्याची परवानगी देते. मोबाइल सारख्या लहान स्क्रीन वापरण्यास देत नाही.

4. लाइफ ऑफ अ मदर या तुमच्या ब्लॉग मध्ये ब-याच विषयांवर माहिती असते - प्रत्येक पालकाने लक्षात ठेवावी अशी कोणती गोष्ट आहे?

पर्फेक्ट हा शब्द अतिशय धोकादायक आहे आणि आयुष्यात उगीचच तणाव निर्माण करू शकतो. प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते. त्यांच्यात काही गोष्टी चांगल्या असतात काही वाईट असतात. कधीही कोणाचीही तुलना करू नये. मुले जशी आहेत तसे त्यांना स्विकारा, तुमच्या अपेक्षांनुसार त्यांना बदलायचा प्रयत्न करू नका. मुलांनी न घाबरता पालकांना सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. त्यांना हे समजले पाहिजे की चूका करणे आयुष्याचा एक भाग आहे आणि प्रत्येक चूकीतून काहीतरी नवीन शिकून आयुष्यात पुढे चालत रहावे लागते.