उपक्रमाचा परिणाम

भारतात संगणक-प्रसाराच्या समस्येच्या मुळापर्यंत जाऊन ती सोडवण्यासाठी आम्ही डेल-आरंभ हा उपक्रम सुरु केला. ‘आरंभ’ हा संपूर्ण भारतीय उपखंडात राबवला जाणारा उपक्रम आहे. तंत्रज्ञानाच्या शक्तीचा वापर करुन पालक, शिक्षक आणि मुलांचं शिक्षण अधिक विकसित करण्याच्या हेतूने हा उपक्रम अस्तित्वात आला. संपूर्ण भारतात संगणकाशी संबंधित शिक्षणाची संकल्पना, वापर आणि एकूणच संगणक शिक्षणात क्रांती घडवणं हे आमचं उद्दीष्ट होतं.

 

 

परिणामाचं मोजमाप

या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षक आणि मुख्याध्यापकांना संगणक शिक्षणाची गरज आणि महत्व यांची जाणीव झाली आहे का, याचा आम्ही कांतार अहवालाच्या माध्यमातून आढावा घेतला. हे प्रशिक्षण घेतलेला चाचणी-गट आणि न घेतलेला नियंत्रित गट यांच्या आम्ही नियोजनबद्ध मुलाखती घेतल्या.

आम्ही अॅपनुसार वापराचाही आढावा घेतला. त्यात स्मार्टफोन असणारे 100% शिक्षक आणि स्मार्ट वर्गाची सुविधा असलेल्या 66% शाळा, तसंच सरासरी 15 संगणकांचा समावेश होता.

 

 

प्रशिक्षण

8 पैकी 10 शिक्षकांनी प्रशिक्षण सामग्री सोपी, सुरचित, परिणामकारक आणि स्पष्ट वाटली. त्यांना प्रशिक्षणाची वारंवारता वाढून ती 3 महिन्यांपर्यंत न्यावी अशी इच्छा होती, 8 पैकी 10 शिक्षकांनी ऑनालाईन प्रशिक्षणाशी सहज जुळवून घेतलं.

 

 

दृष्टीकोनातला बदल

संगणकविषयक दृष्टीकोनात खूपच फरक पडला आहे. आता शिक्षक संगणक आणि स्मार्टबोर्डस् यांचा वापर करुन स्वतः शिकत आहेत आहेत आणि वर्गावर शिकवायची तयारी करत आहेत.

संगणक हा शिक्षणात सकारात्मक भूमिका निभावतो असं 92% शिक्षकांना वाटतं, तर 68% शिक्षकांनी संगणक वापरामध्ये प्राविण्य मिळवलं आहे. 83% नियंत्रित गटाला संगणक शिक्षणासाठी गरजेचा आहे असं वाटतं.

 

 

प्रशिक्षणावर झालेला परिणाम

संगणकाचा स्वतंत्रपणे वापर करुन त्यातून अभ्यास-सामग्री तयार करणं, उदाहरणं आणि एव्हीजच्या माध्यमातून संकल्पना परिणामकारतेने पोहचवणं आणि विद्यार्थ्यांशी दुरुनही संपर्क साधून एकत्रितपणे काम करणं यात शिक्षकांना रस वाटत आहे. छोट्या शहरांमधल्या शिक्षकांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे.

संगणकाचा वापर आता शिकवण्यासाठी धड्याच्या सामग्रीचा आराखडा तयार करणं, विद्यार्थ्यांना स्वाध्याय देणं आणि स्मार्टबोर्डस वापरणं या विविध कृतींमध्ये विकसित झालेला आहे. आधी ज्या शिक्षकांच्या मनात संगणकाविषयी नकारात्मक विचार होते, ते सुद्धा आता संगणक वापरात निपुण झालेले आहेत.

 

 

संगणक-केंद्री भविष्य

शिक्षक स्वतंत्रपणे संगणकाचा वापर करायला लागले आहेत (37%), तर स्मार्ट वर्गात 100% उपस्थिती असते, असा शिक्षकांचा विश्वास आहे.

शिक्षण क्षेत्रात समग्र बदलाच्या पार्श्वभूमीवर आणि शिक्षक, विद्यार्थी आणि मुख्याध्यापक यांच्या वाढत्या स्वीकारामुळे आम्ही येत्या काळात बदल घडवण्यासाठी उत्सुक आहोत.