संवादात्मक शिक्षण पद्धतीमुळे मुलांना अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यास मदत मिळते

शिक्षण सतत बदलत असते. मुलांसाठी शिक्षण मजेदार, रोचक आणि मनोरंजक बनविता यावे यासाठी शिक्षणतज्ञ सतत प्रयत्नशील असतात. वर्गात आणि वर्गाबाहेर अश्या दोन्ही ठिकाणी जी पद्धत सर्वात जास्त परिणामकारक दिसून आली आहे ती म्हणजे संवादात्मक शिक्षण.  

संवादात्मक शिक्षण म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून दिले जाणारे शिक्षण. ही ज्ञान आणि त्याचा वापर यांच्या  आक्लन आणि समजाची प्रक्रिया असते ज्यात विद्यार्थ्यांना पाठ केवळ समजून घेण्याचीच नाही तर त्यात रमून जाण्याची गरज असते. संवादात्मक शिक्षण पद्धतीत शैक्षणिक साहित्यात तंत्रज्ञानाचा वापर केल्याने विद्यार्थ्यांना एक अजोड शैक्षणिक अनुभव प्राप्त होतो.

पहा याचा मुलांना अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी कसा फायदा होतो

1. प्रश्नाचा सर्वांगिण विचार करून तो सोडविण्याच्या कौशल्याचा विकास होतो.

संवादात्मक शिक्षण पद्धतीत, अत्यंत क्रियाशील वातावारणात वाढलेल्या मुलांना अभ्यासात रमवून ठेवण्यासोबतच, प्रश्नाचे विश्लेषण करून तो सोडविण्याची सवय वाढीस लागण्यासाठी आवश्यक ती सखोल विचार करण्याची कौशल्ये निर्माण केली जातात.[1]
ब-याच विद्यार्थ्यांना गणिताची नावड असते. ही समस्या, प्रश्न सोडविण्याचे कौशल्य वाढविणा-या संवादात्मक खेळांच्या माध्यमातून सोडविली जाऊ शकते.

2. आभासी भूमिका-नाट्यांमुळे दैनंदिन जीवनातील समस्यांना तोंड देण्याचे कौशल्य निर्माण होते. 

विद्यार्थ्यांना भूमिका नाट्ये आणि संवादात्मक खेळ यात गुंतवून ठेवल्याने त्यांच्यातील आंतरवैयक्तिक, नेतृत्व, संघ भावना, सहकार्य इत्यादी कौशल्ये वाढतात आणि दैनंदिन जीवनातील प्रश्नांकडे ती मुले डोळसपणे पाहण्यास शिकतात.
'स्टार क्राफ्ट' सारख्या काही ऑनलाइन खेळांमध्ये विचार करून योजना बनवून मार्ग काढण्यास शिकल्याने, काल्पनिक तसेच दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्याची क्षमता वाढीस लागते.
हार्वर्ड स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लाइड सायन्सेस मधील फिजिक्स अँड अप्लाइड फिजिक्स चे प्राध्यापक एरिक मॅझर, बालकॅन्स्की यांच्या मते, संवादात्मक शिक्षण मुलांना सहकार्य करून आणि समुहात राहून यशस्वीपणे काम कसे पूर्ण करायचे ते शिकविते. हे अतिशय महत्वपूर्ण आहे कारण भविष्यात त्यांना कामाच्या ठिकाणी त्याचा फायदा होऊ शकतो.

3. यात त्यांची एकाग्रता आणि हाती असलेल्या कामाप्रती समर्पण वाढविले जाते.
संवादात्मक शिक्षण हे शिक्षणाचा एक उत्तम प्रकार आहे. विद्यार्थी शिक्षणात गढून गेल्यामुळे, त्यांची एकाग्रता आणि हाती असलेल्या कामाप्रती समर्पणाची भावना वाढते. ऑनलाइन उपलब्ध असलेले काही फ्लॅश खेळ विद्यार्थांची एकाग्रता वाढविण्यास मदत करतात तर काही जणांच्या बाबतीत ते ADHD वरील उपाय म्हणून देखिल वापरले जातात. 

4. यात विद्यार्थांना सृजनात्मक आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यास सक्षम बनविले जाते.

संवादात्मक शिक्षण म्हणजे नेहमीचे "बे दुणे चार" असे शिक्षण नाही. यात पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन नेहमीच्या घोकंपट्टीच्या शिक्षण पद्धतीला टाळले जाते. यात विद्यार्थ्यांना संबंधित सामग्री दिली जाते तसेच सृजनात्मक उपाय शोधून प्रश्न सोडविण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. विद्यार्थ्यांना प्रश्न आणि शैक्षणिक सामग्री हाताळण्यास देऊन त्यांना स्पष्ट आणि परिणामकारक रितीने विचार करण्यास शिकविले जाते.[2]

विद्यार्थी जेव्हा संवादात्मक पद्धतीने शिकतात, तेव्हा त्यांना संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजतात आणि ते दैनंदिन जीवनात त्यांचा प्रभावीपणे वापर करू शकतात. संवादात्मक शिक्षणाची मुख्य खुण म्हणजे विद्यार्थी मजकूर पाठ करण्याऐवजी निर्माण करण्यास शिकतात जे आत्ताच्या तांत्रिक जगतात अतिशय महत्वाचे ठरते. 

विद्यार्थ्यांना संवादात्मक शिक्षणाची ओळख करून देणे आणि महत्वपूर्ण संकल्पनांची ओळख करून देण्यासाठी पीसी हे महत्वाचे साधन आहे. पाल्याच्या शिक्षण आणि विकासासाठी असलेली पीसी ची भूमिका आता पालकांना समजू लागली आहे आणि त्यामुळे घरात शैक्षणिक पीसी चे स्वागत होऊ लागले आहे. शैक्षणिक साधन म्हणून जेव्हा पीसी चा वापर केला जातो तेव्हा, पीसी विद्यार्थ्यांना शिक्षण मजेशीर बनविणे, त्यांना हुशार, कुशाग्र आणि सृजनशील बनविणे यासाठी मदत करतो.

शुभम हा नाशिक मधला माध्यमिक शाळेतील विद्यार्थी आहे. त्याच्याकडे कंप्युटर असल्यामुळे त्याच्या अभ्यासातील संकल्पना अतिशय स्पष्ट आहेत. पीसी मुळे अभ्यास करायला मजा येते आणि शुभमला ते आवडते.

मुलांना संकल्पना नीट समजण्यासाठी संवादात्मक शिक्षणाच्या अनेक वेबसाइट्स उपलब्ध आहेत. त्याचेच एक उदाहरण म्हणजे  - http://interactivesites.weebly.com/ जी मुलांना केवळ नविन संकल्पना शिकण्यासच नाही तर जुन्या संकल्पनांची उजळणी करण्यात देखिल मदत करते.