वर्गात दररोज नाविन्य आणणे शक्य आहे - कसे ते पुढे पहा

 

विद्यार्थ्यांना वर्गात लक्ष केंद्रित करायला लावणे हे शिक्षिकेसमोरचे सर्वात मोठे आव्हान असते
तसेच विद्यार्थी वर्गातून निघाल्यानंतर देखिल शिकवलेल्या संकल्पना त्यांच्या लक्षात राहतील अश्या पद्धतीने त्या शिकविणे हे देखिल आव्हानात्मक असते. वर्गात उत्सुकता आणि कल्पकतेचे वातवरण निर्माण करून ही अडचण दूर करण्यात पीसी मदत करू शकतात.

अशाप्रकारे तुम्ही वर्गात दररोज नाविन्यपूर्ण वातावरण निर्माण करू शकता :

1. वर्च्युअल रिॲलिटी

वर्च्युअल रिॲलिटी मुळे विद्यार्थ्यांना परस्परांशी संवाद साधायला एक नविन विश्व मिळते. हे सध्या एक स्वप्न वाटू शकते परंतु गूगल कार्डबोर्ड, पॉली आणि ब्लॉक्स सारख्या सहज उपलब्ध होणा-या साधनांमुळे संवादात्मक शिक्षणाला एक नविन अर्थ प्राप्त झाला आहे त्यामुळे ते स्वप्न लवकरच सत्यात उतरेल यात शंका नाही. वर्गांमध्ये वीआर चा वापर करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे, तुमच्या धड्यांमध्ये वर्च्युअल फिल्ड ट्रिप्स चा अंतर्भाव करणे. केवळ मोजक्या क्लिक्स करून तुमचे विद्यार्थी वर्गात बसूनच आर्क्टिक प्रदेश किंवा थार चे वाळवंट यांसारखी जागतिक आश्चर्ये वर्गात बसून अनुभवू शकतील.

2. ऑगमेंटेड रिॲलिटी (वाढीव वास्तवता)

वर्च्युअल रिॲलिटीचा जवळचा नातेवाईक म्हणजे ऑगमेंटेड रिॲलिटी. यात मुलांचा ख-या जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन 'ऑगमेंट' केला जातो म्हणजेच वाढविला जातो. तुमच्या वर्गात वापरण्यासाठी याला अनुकूल करण्याचे बरेच मार्ग आहेत. त्यापैकी एक म्हणजे स्कॅवेंजर हंट. तुमच्या विद्यार्थ्यांना लिखित किंवा चित्रांच्या स्वरूपात संकेत देण्यासाठी शाळेत सर्वत्र QR कोड्स विखरून ठेवा. या अद्भुत तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष आकर्षित होऊन त्यांना अभ्यासाबद्दल उत्साह वाटू लागतो आणि तुम्हाला ख-या अर्थाने भितींच्या मर्यादा नसलेला वर्ग तयार केल्याचे समाधान मिळते.

3. कोडिंग

सर्वच बाबतींमध्ये तंत्रज्ञानाच्या वापराला मिळणारी वाढती प्रसिद्धी लक्षात घेता, कंप्युटर सायन्सचे ज्ञान मिळविणे अत्यंत आवश्यक बनले आहे. कोडिंग हा बहुसंख्य तंत्रज्ञानाचा पाया असतो. विद्यार्थ्यांना कोडिंग शिकविल्याने त्यांच्यासमोर अपरिमित शक्यतांची कवाडे उघडली जातात. www.code.org किंवा www.codecademy.com सारख्या वेबसाइट्स वरील स्त्रोत वर्षभर उपलब्ध असतात ज्यांच्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होतो. JavaScript आणि C++ या काही सोप्या भाषा आहेत ज्यांचा वापर करून विद्यार्थी शिकण्यास सुरूवात करू शकतात.

नविन युगातील तंत्रज्ञानाच्या परिचयाने मुलांना विभिन्न कल्पना सुचण्यास मदत होते. पीसी वर चालणारी साधने किंवा तंत्रे वापरण्याने वर्गात नाविन्य आणण्यास मदत होते. तसेच डिजिटल लर्निंगमुळे शिकविण्यातील कंटाळवाणा एकसारखेपणा जाऊन तुमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित ठेवता येते.