चला! वर्गात ई-बुक्स आणूया आणि वर्गाचा कायापालट करूया!

 

मनोरंजन/करमणूक

अध्ययन/शिकणे

हे एकत्रितपणे होऊ शकते का?

हो, नक्कीच!

जर तुमच्याकडे पीसी असेल आणि तो वापरण्याचे ज्ञान असेल, तर वर्गात कॉम्प्युटरचा सर्वोत्तम वापर करण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही.

शिक्षण आणि पीसी किंवा कॉम्प्युटर यांचा उत्तम समन्वय ई-बुक्सच्या माध्यमातून साधला गेला आहे. ई-बुक्सच्या मदतीने तुम्ही प्रभावीपणे कसे शिकवू शकता, याविषयी जाणून घेऊया:

 

1. आता तुमचे विद्यार्थी कधीही आणि कुठेही शिकू शकतात.

ई-बुक्स आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि ती वजनाने हलकी असल्याने ने-आण करण्यासाठी सुद्धा सोयीची ठरतात. तसेच ई-बुक्स कमी जागा व्यापतात आणि अनेक पुस्तके जवळ बाळगण्यापेक्षा ते खूपच चांगले आहे. याशिवाय, विद्यार्थी स्वत:च त्यांच्या गतीने आणि त्यांना सोयीस्कर अशा पद्धतीने अभ्यास करू शकतात.

 

2. सदासर्वकाळ/दिवस-रात्र (24*7) उपलब्ध

ई-बुकला नेहमी इन्टरनेटची आवश्यकता असतेच असे नाही. तुमचे विद्यार्थी आधी ई-बुक डाउनलोड करुन ठेवू शकतात आणि नंतर ऑफलाईन राहून ब्राऊज (पाहू) करु शकतात. त्यामुळे इंटरनेट नसतानाही ते अभ्यास करू शकतात. शिवाय यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय सुद्धा येणार नाही.

 

3. सुलभ वैशिष्ट्ये

ई-बुक्स वापरण्यास अगदी सोपी असतात - कारण:

  • टेक्स्ट सर्च करू शकतो/शोधू शकतो.
  • टेक्स्ट बॉक्स मध्ये पेज क्रमांक टाईप केला की आपोआप त्या पेजवर जाऊ शकतो.
  • पुढे काही संदर्भ हवा असेल तर बुकमार्किंगची सोय असते.
  • दृश्य किंवा टेक्स्ट झूम इन आणि झूम आऊट (लहान-मोठे) करु शकता.


4. ज्ञानरंजन! ज्ञानरंजन! ज्ञानरंजन!

ई-बुक मध्ये दिलेल्या लिंक्सवर क्लिक केले असता तुमच्यासाठी इंटरॅक्टिव्ह मीडिया उघडतो जसे - प्रेझेन्टेशन्स आणि व्हिडिओज. यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना तो विषय समजून घ्यायला आणि अधिक काळासाठी लक्षात ठेवायला मदत होते.

 

5. प्रिंटींगच्या खर्चात बचत

ई-बुक्स ही पर्यावरण-पूरक असतात. एरव्ही होणारी पुस्तक प्रिंटींगची प्रक्रिया याबाबतीत होतच नसल्याने त्यासाठी येणारा सर्वात मोठा खर्च आपण वाचवू शकतो.

 

6. तात्कालिक आणि अद्ययावत संदर्भ/माहिती

ई-बुक मध्ये तुम्ही दररोज तुमचा विषय तपशिल (कंटेंट) अपडेट करू शकता. अद्ययावत अध्ययन साहित्याच्या मदतीने शिक्षक ई-बुकमधील माहिती अद्ययावत (अप-टू-डेट) ठेवू शकतात. यामुळे प्रिंटींगसाठी पुन्हा पुन्हा येणारा खर्च आणि त्या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ या दोन्हींची बचत होऊ शकते.

 

7. डोळ्यांसाठी उपयुक्त

ई-बुक च्या स्क्रीनचा ब्राईटनेस (प्रकाश/चमक) विद्यार्थी  दिवसातल्या त्या त्या वेळेनुसार आणि त्यांच्या इच्छेनुसार कमी-जास्त (अॅडजस्ट) करू शकतात. शिवाय डोळ्यावर ताण येऊ नये म्हणून विद्यार्थी टेक्स्टचा फॉन्ट सुद्धा बदलू शकतात.

 

आपल्या शिकण्याच्या अनुभवात ई-बुक्समुळे जवळच्या भविष्यात नक्कीच कायापालट होणार आहे, हे निश्चित! पीसीच्या मदतीने उदयास आलेली आणि शिक्षक म्हणून तुम्हाला समृद्ध करणारी शिक्षणाच्या क्षेत्रातली ही एक नवी क्रांती आहे.