पुढील गोष्टींचा वापर करून तुमच्या मुलांना इंटरनेटचा वापर करताना सुरक्षित ठेवा

 

 

प्रत्येक पालकाला खऱ्या तसेच काल्पनिक जगात वावरताना आपल्या बाळाने सुरक्षित रहावे असे वाटत असते. परंतु आपण सर्वजण कामात व्यस्त असल्यामुळे मुलांवर सतत लक्ष ठेवणे कठीण जाते. जगात काय चालले आहे याची सतत अद्यावत माहिती ठेवल्याने तुम्ही शांतपणे जगू शकता. पुढील गोष्टींचे पालन करा आणि तुमच्या पाल्याला सुरक्षितपणे इंटरनेट वापरून प्रगती करताना बघण्याचा आनंद घ्या.

1. मुळापासून सुरूवात करा

सुरूवातीला हे खूप वेळखाऊ वाटेल पण नंतर त्याचे चांगले परिणाम दिसायला लागतील. सर्वात आधी तुमच्या पीसी वर मल्टीपल यूजर्स सेट करून घ्या जेणेकरून तुमचा पाल्य त्याच्या वयाला साजेश्या नसणाऱ्या वेबसाइट्स ओपन करू शकणार नाही. नंतर, एज फिल्टर सेट करण्यासाठी तुमच्या ब्राउजर सेटिंग्ज मध्ये जा. सर्वात शेवटी, पीसी लर्निंग रिसोर्सेस (पीसी शैक्षणिक स्त्रोत) ना बुकमार्क करा म्हणजे तुमची मुले त्या वेबसाइट्स सहजपणे वापरू शकतील. तुमचा पाल्य जेव्हा इंटरनेट वापरत असेल, तेव्हा एक तर त्याच्यासोबत बसा किंवा स्क्रीन वर काय चालले आहे ते तुम्हाला दिसेल याची व्यवस्था करून ठेवा.

2. वेळापत्रक बनवा

हे एक असे तंत्र आहे ज्याचा तुमच्या मुलांना नक्कीच फायदा होईल. तुम्हाला फक्त मुलांचा, मनोरंजन आणि अभ्यास यासाठीचा वेळ याचे वेळापत्रक बनवायचे आहे. यामुळे कोणत्यावेळी तुमचा पाल्य काय करत आहे याचा तुम्हाला अंदाज असेल. उदाहरणार्थ, जर संध्याकाळी 4 ते 6 ही वेळ गणिताच्या अभ्यासाची असेल, तर तुम्हाला त्यात जास्त लक्ष घालायची गरज नाही. जर संध्याकाळी 6 ते 6.30 ही यू-ट्यूब च्या वापराची वेळ असेल, तर तुम्हाला मुलांच्या स्क्रीन कडे लांबून लक्ष ठेवता येईल. जेव्हा तुम्ही घरात नसाल, तेव्हा मुलांकडे लक्ष ठेवण्याचे काम घरातील इतर मोठ्या व्यक्तींना सोपवता येईल.

3. एकत्र बसा

प्रत्येक पालकाने नियमितपणे हे केले पाहिजे. असे करताना तुमची मुले खुश होतीलच त्याच बरोबर तुम्हाला सुद्धा नविन गोष्टी शिकता येतील. एकत्र बसून तुम्ही खेळ खेळू शकता किंवा ऑनलाइन विविध गोष्टींवरचे लेख वाचू शकता. संपुर्ण कुटुंबाने एकत्र बसून करण्यासारख्या अनेक पीसी ॲक्टिविटीज् उपलब्ध आहेत. विविध पीसी स्त्रोत जाणून घेतल्याने तुमच्या मुलांसाठी काय चांगले आहे ते देखिल तुम्हाला समजते.

यू-ट्यूब ही तुमच्या मुलांची आवडती वेबसाइट आहे का? जर असेल, तर त्यावर दिलेल्या सर्व शैक्षणिक व्हिडिओज् चा फायदा घेऊन मुलांचे शिक्षण मजेशीर बनवा:
https://www.dellaarambh.com/marathi/post/this-is-how-you-can-make-youtube-safe-for-your-little-ones

हॅप्पी लर्निंग!