भारतातील सर्वोत्तम इ-शिक्षिकेबद्दल अधिक जाणून घ्या!

मिस रश्मी काठुरिया, यांना 2007 मध्ये डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी भारतातील सर्वोत्तम इ-शिक्षिका म्हणून गौरविले होते. एक सामान्य शिक्षिका ते देशातील सर्वोत्तम इ-शिक्षिका होण्यापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाची त्यांनी आम्हाला माहिती दिली.

सन 2000 मध्ये त्यांनी त्यांच्या शाळेत गणिताची प्रयोगशाळा स्थापन केली. या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना काँक्रीट च्या वस्तू वापरून गणितातील संकल्पना मूर्त स्वरूपात आणून प्रयोगातून त्यांच्याबद्दल जाणून घेता येते. तसेच त्यांनी प्रयोगशाळेच्या बरोबरीने विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एक ब्लॉग देखिल सुरू केला ज्या वर 500 हून अधिक समृद्ध स्त्रोत, प्रकल्प कल्पना आणि इतरही अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट वर इतक्या सुलभ भाषेत सर्व माहिती उपलब्ध करून दिल्या बद्दल सन 2010 मध्ये त्यांना राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नॅशनल आय सी टी पारितोषिक ही मिळाले आहे.

मिस काठुरिया यांच्या सोबत झालेला आमचा संवाद पुढे दिला आहे -

तुम्ही वर्गात तंत्रज्ञानाचा वापर कधीपासून करत आहात?

गेल्या 12 वर्षांपासून मी शिकविताना तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. मी प्रथम ब्लॉग्ज लिहिण्यास सुरूवात केली. त्या ब्लॉग्ज ची लिंक मी माझ्या विद्यार्थ्यांसोबत शेअर करत असे. एखाद्या विषयावरील माझे सर्व संशोधन मी इंटरनेटवर अपलोड करत असे जेणे करून विद्यार्थी त्या विषयांबद्दल संवाद साधू शकतील. तसेच मी विकी क्लासरूम देखिल सुरू केली आणि मला जिला विद्यार्थी आणि इतर शिक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला.

 

तुम्हाला उपयुक्त वाटणा-या काही तांत्रिक साधनांची (टेक टूल्स) तुम्ही उदाहरणे देऊ शकाल काय?

मी गणित विषय शिकविण्यासाठी तांत्रिक साधनांचा वापर करण्यास सुरूवात केली. भूमिती (जिओमेट्री) आणि अंकगणित (अलजिब्रा) शिकविण्यासाठी मी जिओजिब्रा चा वापर करते. या टूल मध्ये वर्गात शिकविल्या जाणा-या जवळपास सर्व घटकांचा समावेश आहे. वर्गात शिकविण्याचे तास मर्यादित असतात आणि आलेख काढण्यात बराचसा वेळ वाया जातो म्हणून आलेख शिकविताना देखिल मी काही टूल्स चा वापर करते.

शिकविण्यास सुरूवात केल्यानंतर काही काळाने माझ्या असे लक्षात आले की जर विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी काही स्त्रोत उपलब्ध करून देता आले तर त्यांच्यासाठी ते फायदेशीर ठरेल, मग मी स्त्रोत तयार करण्यास सुरूवात केली. तुम्ही rashmikathuria.webs.com  या ठिकाणी मी तयार केलेले सर्व शैक्षणिक स्त्रोत एकत्रित पाहू शकता.

 

तंत्रज्ञानानी तुम्हाला कोणत्या क्षेत्रात सर्वात जास्त मदत केली?

घेतलेल्या चाचण्यांचे मूल्यांकन करण्यात खूप वेळ वाया जात असे आणि मी ज्या विषयांवर संशोधन करते त्या संशोधनासाठी मला वेळ कमी पडत असे. मग मी एम सी क्यू टेस्ट्स तयार करण्यासाठी गूगल फॉर्म्स चा वापर करण्यास सुरूवात केली आणि त्याचा फायदा असा झाला की विद्यार्थ्यांनी उत्तरे लिहिताच ती गूगल वर लगेचच तपासली जाऊ लागली आणि मला शिकविण्यासाठी जास्त वेळ मिळू लागला.

 

वर्गातील शिक्षणाबद्दलचा तुमचा सध्याचा नविन तांत्रिक प्रयोग कोणता?

तंत्रज्ञानाच्या मदतीने मला माझी शिकविण्याची पद्धत अधिक चांगली करता येते तसेच माझ्या विद्यार्थ्यांसोबत देखिल चांगल्या प्रकारे संवाद साधता येतो. वर्गात चाललेल्या गोष्टी सर्वांना समजाव्यात आणि कोणी मागे पडू नये म्हणून मी वेगवेगळ्या वर्गांचे वेगवेगळे व्हॉट्सॲप ग्रुप्स तयार केले आहेत तसेच सोशल प्लॅटफॉर्म्स वर देखिल मी त्यांच्याशी संवाद साधत रहाते. प्रत्येक वर्गाचे एक स्वतंत्र गूगल डॉक्यूमेंट आहे ज्यावर विद्यार्थी त्यांच्या शंका विचारू शकतात आणि मी त्यांना लगेचच उत्तरे देऊ शकते.

 

नविन शिक्षकांसाठी काही सूचना?

वर्गात तंत्रज्ञानाचा वापर करणे नक्कीच फायदेशीर आहे आणि आता आपण सर्वांनी मिळून तंत्रज्ञानाचा वापर करून एक वर्च्युअल क्लासरूम तयार करण्याची वेळ आली आहे.