तुम्हाला कलेची आवड आहे? तर मग पुढे दिलेले पीसी स्त्रोत वापरून पहा!

 

“प्रत्येक मुल हे कलाकार असते. पण त्या कलाकाराला मोठे झाल्यावर सुद्धा टिकवून कसे ठेवायचे हा खरा प्रश्न असतो.”

- पाब्लो पिकासो

 

तुमची सृजनशीलता आणि कल्पनाशक्ती वाढविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आर्ट प्रोजेक्ट्स (कला प्रकल्प). पीसी वर उपलब्ध असलेल्या अनेक डिजिटल आर्ट टूल्स पैकी काही चांगल्या चित्रकला कार्यक्रमांची माहिती पुढे दिली आहे. त्यामधून तुम्हाला जे आवडेल त्याची निवड करा.

चला तर मग डिजिटल आर्ट चा पुरेपुर वापर करण्यासाठी तयार व्हा!

 

ऑटोडेस्क स्केचबुक

ऑटोडेस्क स्केचबुक हा पीसी वरील फार पूर्वी पासूनचा चित्रकलेचा उत्तम प्रोग्राम आहे. याचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही चित्र काढायला सुरूवात करताच युजर इंटरफेस दिसेनासा होतो आणि तुम्ही मोकळेपणाने काम करू शकता.  

 

क्रिता

चित्रकला आवडते ना? मग क्रिता च्या मदतीने तुमची कौशल्ये आणखी प्रगत करा. एखाद्या उभऱत्या कलाकाराला आवश्यक असणारी सर्व व्यावसायिक टूल्स क्रिता मध्ये उपलब्ध आहेत.

 

इंकस्केप

नवनिर्माण करण्याची आवड असणाऱ्यांसाठी इंकस्केप हा एक दर्जेदार ड्रॉइंग प्रोग्राम आहे. जर तुम्हाला तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून चित्रे काढण्याची आवड असेल, तर इंकस्केप तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. या टूल मध्ये ऑब्जेक्ट क्रिएशन, ऑब्जेक्ट मॅनिप्युलेशन, कलर सिलेक्टर, नोड एडिटिंग आणि इतरही अनेक वैशिष्ट्ये आहेत.

 

पेंट 3डी

जर तुम्ही नुकतीच चित्रकला शिकायला सुरूवात केली असेल, आणि डिजिटल ड्रॉइंगचा वापर करून पहायचा असेल, तर मायक्रोसॉफ्टचा पेंट 3 डी हा चांगला पर्याय आहे. हा प्रोग्राम विंडोजच्या उपकरणांमध्ये आधीपासूनच इन्स्टॉल केलेला असतो. यात अनेक विविध ब्रशेस आणि साधने असतात ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्यातील सृजनशीलता वाढवू शकता.

 

फायर अॅल्पॅका

यात लाइट टूल्स आणि मूलभूत वैशिष्ट्ये यांचा योग्य समतोल साधलेला असतो. हे 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि विंडोज् मध्ये नीट चालते. हे अतिशय साधे टूल आहे ज्यात तुम्ही अगदी सुरूवातीपासून शिकून तुमची कौशल्ये विकसित करू शकता.

 

नाविन्यपूर्ण आणि चांगले चित्र काढण्याबरोबरच चांगला विद्यार्थी होणे देखिल महत्वाचे असते. शाळेचा अभ्यास, असाइनमेंट्स, अभ्यासेतर गोष्टी यांच्यात समतोल राखणे अतिशय कठीण असते, पण तुमच्याकडे जर योग्य साधन असेल तर प्रॉडक्टिव बनणे अगदी सोपे असते.