तुम्हाला स्क्रॅबल आवडतं का? पुढे दिलेल्या सूचनांच्या मदतीने खेळात प्रगती करा

 

स्क्रॅबल खेळणे वेगळे आणि त्या खेळात जिंकणे वेगळे. तुमची शब्दसंपदा वाढविण्यासोबतच स्क्रॅबल खेळ प्रत्येक वेळी खेळताना तुमची कौशल्ये, धोरण क्षमता वाढवतो आणि प्रत्येक वेळी अचूक शब्द निवडण्यास शिकवतो.

या खेळात प्राविण्य मिळवायचे आहे? तर पुढे वाचा...

 

"ish" सोबत खेळा - आणि खूप गुण मिळवा!

जास्त गुण मिळवायचे आहेत? तर मग, कोणताही शब्द बनवल्यानंतर त्या शब्दाच्या पुढे "ish" जोडा. ही गुण वाढवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. उदाहरणार्थ. child या शब्दाला बनवा childish, warm ला warmish, sheep ला sheepish इत्यादी.

 

सुरूवाती पासूनच तुमच्या उत्तम चालींचा वापर करून खेळा

आपले प्रतिस्पर्धी जास्त गुण मिळवतील या भीतीने आपण नेहमीच आपले उत्तम शब्द शेवटी वापरण्यासाठी शिल्लक ठेवतो. असे करण्या ऐवजी, सुरूवाती पासूनच उत्तम शब्द वापरल्यास चांगले गुण मिळवण्यास मदत मिळते.

 

"Benjamin" खेळा - हे फक्त एक नाव नाहीये!

Brick हा शब्द बनेल airbrick.

Jump बनेल outjump.

Away बनेल flyaway.

मुळात म्हणजे यात, बोर्ड वर असलेल्या शब्दाला तीन अक्षरी विस्तार जोडून तुम्हाला पाच अक्षरी शब्द बनवायचा असतो.

 

तीन अक्षरी शब्दांचा वापर करून खेळा - मोठे शब्द जास्त बनवू नका.

कधी कधी आपण मोठे शब्द बनवण्याच्या नादात इतके गुंग होतो की तीन अक्षरी शब्दांचा प्रभाव आपल्या लक्षात रहात नाही. तीन अक्षरी शब्द वापरून जास्त गुण देणाऱ्या टाइल्स आपण मिळवू शकतो. विशेषतः, दोन किंवा तीन अक्षरी चौरसावर मिळणाऱ्या पॉवर टाइल मिळवता येतात.

 

तुमच्या "E" आणि "S" चा नीट वापर करा!

प्रत्येक सेट मध्ये फक्त 4 "s" आणि "e" असल्यामुळे, त्यांचा वापर विचारपूर्वक करा. बऱ्याच शब्दांमध्ये s आणि e एकत्र लागत असल्यामुळे, तुम्हाला त्यांचा वापर जास्त काळजीपूर्वक करावा लागेल.

आता तुम्हाला मूळ गोष्टींची नीट कल्पना आली आहे, त्यामुळे तुमच्या पीसी वर पुढे दिलेले स्क्रॅबल खेळण्यास सुरूवात करा :

Funky Potato (फंकी पोटॅटो)

Scrabble Sprint (स्क्रॅबल स्प्रिंट)

Lexulous (लेक्झलस)

खेळ खेळताना सोबत तुमच्या टाइपिंगमध्ये सुधारणा करायची आहे का? तसे असेल, तर पुढे दिलेल्या सूची चा वापर करा!