शिक्षकांनी पाहिलेच पाहीजेत असे 8 टेड टॉक्स

 

कामात नेहमीच अत्यंत व्यग्र असलेल्या शिक्षकांनो, तुमच्या वर्गाला प्रोत्साहीत करण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली प्रेरणा मिळविण्यासाठी तुम्ही 15 मिनिटांचा वेळ नक्कीच काढू शकता, आणि ते करण्यासाठी जागतिक कीर्तीच्या वक्त्याचे टेड टॉक ऐकण्याइतका चांगला पर्याय दुसरा कोणताही नाही.

1. शिक्षकांना ख-या फीडबॅकची (प्रतिसादाची) गरज असते

10 मिनिटांच्या या भाषणामध्ये, बिल गेट्स अनेक यशकथा सांगून नविन आणि मुरलेल्या दोन्ही प्रकारच्या शिक्षकांना प्रतिसाद मिळविण्याचे महत्व पटवून देतात. [1] 

2. विज्ञान शिक्षकांनो - त्याला मजेशीर बनवा

एक विज्ञान शिक्षक असलेले आणि यू ट्यूब वापरणारे टायलर डेविट, हे आपल्याला सांगतात की विज्ञानातील संकल्पना एखाद्या गोष्टीच्या माध्यमातून सोप्या करून सांगितल्याने मुलांना तो विषय खरोखर आवडू लागतो. [2]

3. जादू कशी तयार करावी ते शिक्षकांना शिकवा

शिक्षकांसाठी थोडे अपारंपारिक असेल परंतु क्रिस्टोफर एमडीन यांनी एक वैध मुद्दा मांडला आहे तो म्हणजे, शिक्षकांनी वर्गातील चैतन्यमय वातावरण टिकवून ठेवण्यासाठी कलाकारांसारख्या इतर व्यक्तींकडून शिकले पाहिजे. [3]

4. प्रत्येक मुलाला एका विजेत्याची गरज असते

40 वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षिका असलेल्या रीटा पिअर्सन सांगतात की मुलांसोबत भावनिक नाते जोडल्याने, त्यांना कशी प्रेरणा मिळते आणि वर्गात उत्साहाने अभ्यास करण्याचे वातावरण निर्माण होते. [4]

5. शिक्षणाचे नूतनीकरण करण्यासाठी व्हिडिओज् चा वापर करा

शैक्षणिक उद्योजक बनलेले हेज फंड चे एक विश्लेषक, सल खान त्यांचा विचार मांडताना सांगतात, मुलांना घरी पाहण्यासाठी लेक्चर्स (व्याख्यान) चे व्हिडिओ बनवून द्या आणि होमवर्क (गृहपाठ) त्यांना वर्गात शिक्षकांच्या मदतीने करू द्या. [5]

6. वर्गात शिक्षण मनोरंजक बनविणारे तीन नियम

वर्गात चर्चासत्र सुरू केल्यास त्याद्वारे विषय चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतो आणि ते सुरू करण्यासाठी मुलांचे प्रश्न हे शिक्षकांचे सर्वात उत्तम अस्त्र आहे असे रसायनशास्त्र शिकविणारे शिक्षक रामसे मुसलम सांगतात. [6]

7. कंप्युटरचा वापर करून गणित शिकवणे

गणितज्ञ कॉनरॅड वोल्फ्राम आपल्यासमोर त्यांची, कंप्युटर प्रोग्रामिंगचा वापर करून गणित शिकविण्याची मूलगामी कल्पना मांडतात. या पद्धतीचा वापर केल्यास मुले दैनंदिन जीवनातील समस्यांसोबत सिद्धांतांना पडताळून पहायला शिकतात. त्याचा त्यांना भविष्यात खूप फायदा होऊ शकतो. [7]

8. वर्गात करता येण्यासारखे सोपे DIY (डू इट यॉरसेल्फ) प्रोजेक्ट्स (प्रकल्प)

तंत्रज्ञ फॉन क्वि, कमी खर्चिक आणि करायला सोप्या अश्या विज्ञान प्रयोगांच्या कल्पना सुचवतात. या प्रयोगांद्वारे मुलांना मजा करता करताच विज्ञानातल्या संकल्पना प्रत्यक्षात साकार होताना पहायला मिळतात. [8]

पीसी आणि काही मोफत शैक्षणिक साधनांच्या मदतीने तुम्ही तयार आहात!