माझी मुलगी मुळाक्षरे शिकण्यासाठी पीसी चा वापर करते

 

 

स्नेहा जैन या अनेक कार्ये करणारी आई असण्याबरोबरच https://blogsikka.com वर ब्लॉगर देखिल आहेत. 12 वर्षे त्या मायक्रोबायोलॉजिस्ट होत्या आणि त्यांनी संशोधनही केले आहे. त्यांना तंत्रज्ञानाची खूप आवड आहे. गेल्या 18 वर्षांपासून त्या पीसी वापरत आहेत.

1. शिक्षणासाठी पीसी वापरण्याबद्दल तुमचे मत काय आहे?

मी म्हणेन की नविन गोष्टी शिकण्यासाठी पीसी हा एक विस्मयकारक आणि संवादात्मक मार्ग आहे. पीसी आपल्याला लहान वयापासूनच खूप गोष्टी शिकायला आणि जलद गतीने प्रगती करायला मदत करतात. दिवसभरात पालकांच्या निगराणीखाली, काही ठराविक तास पीसी वापरणे नेहमीच चांगले असते.

2. एक पालक म्हणून, भविष्यातील शिक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटते?

प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. मला वाटते की मुले ज्या पद्धतीने शिकत आहेत त्यात बदल होईल. शिक्षण वेगळे आणि संवादात्मक होईल, हळूहळू दृकश्राव्य पद्धतीने शिकणे वाढेल. पण आत्ताची पिढी इतकी वेगवान आहे की त्यांना सर्व काही पटकन शिकायचे असते. मला वाटते ते फक्त पीसी आणि इंटरनेट च्या वापरानेच शक्य होऊ शकते.

3. तुमच्या लहानग्यांच्या शिक्षणासाठी तुम्ही पीसी चा वापर कसा करता?

माझी मुलगी मुळाक्षरे शिकणे, नविन बालगीते शिकणे आणि प्राणी, रंग इत्यादी अनेक गोष्टी शिकण्यासाठी पीसी चा वापर करते.

मला असे वाटते की पीसी येण्याच्या आधीच्या काळापेक्षा आत्ता शिक्षण सोपे झाले आहे. माझ्या मुलीला हस्तकला, जीवनमूल्ये आणि नियम शिकविण्यासाठी मी लाइव व्हिडिओज आणि ॲनिमेशन्सचा वापर करते. एका ठराविक क्षणी तिला त्याचे व्यसन लागू शकते हे मला माहित आहे, त्यामुळेच मी पीसी चा अतिरेक न करता ठराविक मर्यादेतच वापर करते. मी त्यावर काही निर्बंध घातले आहेत. मी माझ्या मुलीला पीसी वापरून पेंट आणि डिक्शनरी यांसारख्या गोष्टी शिकवते. ती त्यावर चित्रे काढणे, शब्द लिहिणे इत्यादी गोष्टी शिकते. त्यामुळे घरी पीसी असलाच पाहिजे असे मला वाटते. इतकेच नाही तर पीसी मला तिच्यासाठी वर्कशीट्स बनविणे, गृहपाठ म्हणून येणा-या गोष्टी डाऊनलोड करणे इत्यादी गोष्टींसाठी देखिल उपयोगी पडतो. पीसी वरून मी विविध चित्रे घेते आणि ती त्यात रंग भरते. पीसी च्या मदतीने, ती गोष्टींची चित्रे कशी काढायची, त्या बनवायच्या कश्या आणि त्यांचे आराखडे कसे बनवायचे ते शिकते. एवढेच नाही तर मी माझ्या पीसी मध्ये अनेक शैक्षणिक सीडी लावते त्यामुळे तीला अनेक संकल्पना प्रत्यक्ष पाहून शिकता येतात.