नविन युगाच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होताना आवश्यक गोष्टी!

वर्षातील ती वेळ परत आली. तुमचा पाल्य नविन शैक्षणिक वर्षात पदार्पण करायला तयार झालाय. नविन वर्ष नेहमीच नविन अपेक्षा, नविन आव्हाने आणि उत्साह घेऊन येते. उन्हाळ्याची सुट्टी संपत आलेली असतानाच, नविन वर्षाबद्दलची उत्सुकता शिगेवर पोचलेली असते. नविन मित्रमंडळी, नविन विषय आणि शाळेसाठी आवश्यक नविन वस्तू या सगळ्यांबाबतच खूप अपेक्षा असतात.

शाळेची नविन बॅग निवडण्यापासून ते  योग्य असा पेन्सिल बॉक्स निवडण्यापर्यंतची प्रत्येक गोष्ट मुलांसाठी नविन वर्षाची उत्सुकता वाढवत असते. पारंपारिक गोष्टींच्या बरोबरीलाच आम्ही देखिल काही नविन देऊ इच्छितो. या नविन #BackToSchool गोष्टींसोबत तुमचा पाल्य शाळेतील नविन वर्षासाठी अगदी तयार होईल.

 

1. एक पी सी 

मुलांच्या सर्वंकष विकासासाठी कंप्यूटर्स कसे उपयोगी ठरतात त्याबद्दल भरपूर संशोधन केले गेले आहे. केवळ तितकेच नाही तर #BackToSchool Essentials गोष्टींच्या यादीत पी सी चे स्थान अशासाठी महत्वाचे आहे कारण 21 व्या शतकात शिक्षणासाठी ते अत्यंत महत्वाचे साधन आहे. पी सी हे मुलांना जगातील  माहिती सहज उपलब्ध करून देऊ शकतात. 

 

2. यूएसबी ड्राइव

वायरलेस तंत्रज्ञानामुळे आता शिक्षण कुठेही उपलब्ध होऊ शकते. यूएसबी ड्राइव मुळे मुले त्यांना आवश्यक ती माहिती सहजतेने घरून शाळेत किंवा इतरत्र नेऊ शकतात.

 

3. प्लानर

मुलांना वेळेचे नियोजन करायला शिकविणे अत्यंत गरजेचे असते. एखादे आकर्षक प्लानर किंवा डायरी दिल्यास मुले स्वतः त्यांचा दिनक्रम निश्चित करून त्याप्रमाणे वागू लागतील.

 

4. प्रिंटर

आता प्रत्येकाच्या घरी एक चांगला प्रिंटर असणे आवश्यक बनले आहे. एक असा प्रिंटर ज्यावर तुम्ही बुक रिपोर्ट्स साठी इमेजेस स्कॅन करू शकता, होमवर्क आणि असाइनमेंट्स साठी पुस्तकाच्या प्रिंट्स काढू शकता आणि अन्य काही प्रिंटिंगची कामे असतील तर ती देखिल करू शकता. 

 

5. एड्युराइट

मुलांना शिक्षणासाठी जी साधने आवश्यक असतात ती नेहमी दिली पाहिजेत. Edurite एक लर्निंग पोर्टल आहे ज्यावर देशभरातील मुले त्यांच्या त्यांच्या बोर्ड्स च्या अनुषंगाने अभ्यास शिकू शकतात. मुलांना शाळेतील अभ्यासात मदत होण्यासाठी हे फारच उपयुक्त आहे. 

 

#DellAarambh चा वापर करून ट्विट करा आणि आम्हाला सांगा की तुमच्या #BackToSchool Essentials च्या यादीत काय काय आहे.