संगणकाधारित शिक्षणामुळे देशातल्या शिक्षणक्षेत्राचं भवितव्यात आमूलाग्र बदल घडून येत आहे

आपण ज्या काळात जगत आहोत त्या काळात शिक्षणक्षेत्रात मूलभूत बदल घडून येत आहेत, कारण येत्या काही वर्षांत संगणक प्रशिक्षण शिक्षणक्षेत्राची धुरा वाहून न्यायला सज्ज आहे.
भारतात संगणक प्रशिक्षणाला दीर्घ इतिहास आहे, कारण देशात संगणक-विज्ञान शिक्षणाची सुरुवात 19631. साली झाली. तेव्हापासूनच वेगवान इंटरनेटचा सर्वत्र प्रसार झाल्यामुळे देशभरात ऑनलाईन शिक्षण रुजलं आहे. जानेवारी 2020 च्या आकडेवारीनुसार भारतात 688 दशलक्ष सक्रीय डिजिटल वापरकर्ते आहेत.2

आज भारत ही ई-शिक्षणाची जगातली दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. तिचे सुमारे 9.5 लाख वापरकर्ते आहेत आणि 2021 पर्यंत तिची किंमत 1.96 अमेरिकन डॉलर्स एवढी असेल.3

संगणकाधारित शिक्षण म्हणजे काय?

संगणाकाधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना दृक-श्राव्य माध्यमांच्या मदतीने संकल्पनांचं आकलन करणं आणि त्या लक्षात ठेवायला मदत होते. हे घोकंपट्टीवर आधारित पारंपरिक शिक्षणाच्या अगदी उलट आहे. या शैक्षणिक आणि माहितीपूर्ण शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थ्यांना विषय केवळ पाठ करण्यापेक्षा ते खरोखर समजायला मदत होते.

 याशिवाय संगणक मुलांना पुढील गोष्टींसाठी मदत करतो-

  • जगभरातल्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणं

  • अस्तित्वात असलेल्या समस्या सोडवण्याचे वैशिष्ट्यपूर्ण आणि क्रांतिकारक मार्ग शोधणं

  • त्यांना सोयीस्कर अशा फॉरमॅटमधून शिकणं मग ते श्राव्य, दृश्य, अक्षर किंवा चित्र अशा कोणत्याही माध्यमातून असेल.
  • प्रकल्पांवर काम करताना एकत्र काम करुन आणि कल्पनांची देवाणघेवाण करुन इतर विद्यार्थ्यांकडून शिकणं

  • त्यांच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार घरुन शिक्षण घेणं

  • गुण मिळवण्यासाठी संकल्पना पाठ करण्यापेक्षा शंकाचं तात्काळ निरसन करणं


संगणाकाधारित शिक्षणात एक देश म्हणून आपण खूपच मोठी मजल मारली आहे, तरीही आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. जरी 2019 वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशभरात 3.4 लाख संगणक युनिटसचं वितरण झालं असलं, तरी देशात संगणकाचा एकूण प्रसार अद्याप 10% हून कमी आहे.4

आमचा उपाय?

डेल-आरंभ - पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना डिजिटल भारतात प्रवेश करण्यासाठी मदत करणारा एक अखिल भारतीय संगणक-शिक्षण उपक्रम. हा संगणक-शिक्षण उपक्रम त्यांना अधिक चांगल्या शिक्षणासाठी संगणक कसा वापरायचा याचं ज्ञान देईल.
आमच्या डेल चॅम्प्स शाळा संपर्क उपक्रमातून आम्ही अगोदरच 1.5 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहचलो आहोत. या विद्यार्थ्यांना आम्ही सृजनशीलतेला चालना देण्यात, चिकित्सक विचार करण्यात आणि गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यात मदत करत आहोत.

आतापर्यंत या 4,793 शाळांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे, 91,351 शिक्षकांना प्रशिक्षण मिळालं आहे आणि 1,29,362 मातांनाही प्रशिक्षण देण्यात आलं आहे. आपल्या देशात शिक्षण क्षेत्र भविष्यासाठी तयार असावं म्हणून, आम्ही संगणकाचा प्रसार वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.