शिक्षणासाठी पीसी - तंत्रज्ञानाच्या मदतीने गणित अधिक चांगल्या प्रकारे शिकविणे

शिकविण्यासाठी गणित हा नेहमीच एक अवघड विषय म्हणून गणला जातो. यामागचे कारण असे असू शकते की, परिणामकारक रीतीने गणित शिकविण्यासाठी शिक्षकांना संकल्पना बांधणी आणि प्रश्नांची उकल यांसाठी अनेक संधी द्याव्या लागतात आणि ते देखिल मुलांना संपूर्ण वेळ त्यात गुंतवून ठेवून.

ब-याचदा शाळेतील विशेषतः वरच्या वर्गांतील मुले या विषयाच्या तांत्रिक स्वरूपामुळे त्याची धास्ती घेताना आढळून येतात. गणित शिकविताना वर्गात तंत्रज्ञानाचा वापर केला गेल्यास तो विषय शिक्षक तसेच विद्यार्थी या सर्वांसाठीच अधिक मनोरंजक आणि संवादात्मक बनून त्यातील एकसूरीपणा कमी होण्यास मदत मिळेल.

चला तर मग पाहूया गणित अधिक चांगल्या प्रकारे शिकविण्यासाठी कोणत्या साधनांचा आणि वेबसाइट्सचा वापर करता येइल !

1. Mathpickle.com
MathPickle.com हे शिक्षकांसाठी एक व्यवहार्य संसाधन आहे. यातील आकर्षक कोडी आणि खेळ विद्यार्थ्यांना जटील प्रश्न सोडविण्यात गुंतवून ठेवतात. इयत्ता आणि विषयांच्या अनुषंगाने असलेले प्रत्येक कोडे 45-60 मिनिटांसाठी बनविले गेले आहे.

 

उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांना पाढ्यांची उजळणी करण्यास सहसा आवडत नाही. परंतु मॅथपिकलच्या राऊंड टॉवर या संवादात्मक आणि मजेशीर खेळाद्वारे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना पाढ्यांची उजळणी करण्यास प्रोत्साहित करू शकता.

2. PatrickJMT

 


Patrick JMT चे गणित विषयीचे विनामुल्य व्हिडिओ हे यू-ट्यूब वरील अत्यंत प्रसिद्ध अश्या शैक्षणिक वाहिन्यांपैकी एक आहे. त्याचे 150,000 पेक्षा जास्त ग्राहक असल्याचा त्यांचा दावा आहे. याचे यजमान (होस्ट) पॅट्रीक जेएमटी हे एका सामाजिक महाविद्यालयात गणित विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांची अशी इच्छा आहे की त्यांच्याकडे असलेले ज्ञान ग्रहण करून विद्यार्थ्यांनी शाळेत चांगले गुण मिळवावेत. पॅट्रीक जेएमटी यांच्या विनामुल्य गणित वाहिनीवर असंख्य प्ले-लिस्ट्स आहेत, ज्यांमध्ये गणितातील साध्या अपूर्णांकांपासून ते प्रगत अश्या लॉगॅरिदम पर्यंत अनेक विषयांवर चर्चा केलेली आढळून येते. शिक्षक देखिल जटील मुद्द्यांना सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी या व्हिडिओज् चा वापर करू शकतात.

3. Math-salamanders.com


बालवाडी आणि प्राथमिक शाळेतील शिक्षकांनो तुमच्या मदतीसाठी मॅथ सॅलॅमॅन्डर्स हजर आहे !
मुलांसाठी परीक्षा आणि चाचण्या तयार करणे हे कधी-कधी कठीण ठरू शकते, परंतु मॅथ सॅलॅमॅन्डर्स वरील बालवाडी ते इयत्ता पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे गणितातील प्रत्येक मुद्द्यावरील प्रश्न तुमचे हे कठीण वाटणारे काम सोपे करतात. शिवाय यात बौद्धिक गणितावरील (mental mathematics) प्रश्न देखिल आहेत, ज्यांचा वापर करून मुले शालेय अभ्यासक्रमाच्या बाहेरील ज्ञान देखिल संपादन करू शकतात. क्लिष्टतेच्या विविध पातळ्यांवरील प्रश्न उपलब्ध असल्यामुळे शिक्षक वर्गात चाचण्या घेताना सहजतेने त्यांचा वापर करू शकतात.  
मॅथ सॅलॅमॅन्डर्स तर्फे ही एक बौद्धिक गणितावर आधारित प्रश्नपत्रिका

4. Desmos


डेसमॉस हे एक अत्यंत वेगवान असे ऑनलाइन गणनयंत्र (calculator) आहे जे कोणत्याही कार्याचा (function) आलेख तयार करू शकते. यात वापरकर्त्याला नियंत्रण, प्रतिगमन करण्यासोबतच इतर गोष्टींमध्ये संपूर्ण डेटा सारण्यांचा वापर करण्याची मुभा असते. वर्गात अक्षीय भूमिती आणि रेखा समीकरणे यांसारख्या अवजड संकल्पना शिकवित असताना विद्यार्थ्यांना त्यात गुंतवून ठेवणे कधी कधी कठीण जाते अश्यावेळेस डेसमॉस तुमची मदत करू शकते. या साधनाचा वापर करून तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवत असलेल्या विषयाची अद्ययावत माहिती देऊन त्यांना वर्गात लक्ष एकाग्र करण्यास मदत करू शकता.

वर दिलेल्या साध्या साध्या साधनांचा वापर करून गणित विषय केवळ मनोरंजकच नाही तर संवादात्मक आणि तुमच्या विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवणारा असा बनवा. त्यांना आव्हान देऊन त्यांची कौशल्ये परखा आणि सोबतच त्यांना वर्गात मजा देखिल करू द्या. गणित शिकणे हे पूर्वी कधीही इतके आनंददायी नव्हते.