शिक्षणासाठी कॉम्प्युटर: तंत्रज्ञानाच्या मदतीने केमिस्ट्री (रसायनशास्त्र) अधिक प्रभावीपणे शिकवा

 

''काय शिकवायचे नाही, हे जो जाणतो तो खरा उत्तम शिक्षक.''

- ओट्टो न्यूराथ

 

केमिस्ट्री शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकाची पद्धत ही निराळी आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. काही शिक्षक त्यातल्या सिद्धांतांची दैनंदिन जीवनाशी सांगड घालून शिकवतात, काही जण ग्रुप अॅक्टिव्हिटींना प्राधान्य देतात, तर काही फक्त शिद्धांत समजावून देण्यावर भर देतात. पद्धत कोणतीही असो, तंत्रज्ञानाची मदत घेतली तर त्यांचे शिकवणे आणखी प्रभावी होऊ शकते. कॉम्प्युटरच्या मदतीने केमिस्ट्री हा विषय अधिक प्रभावीपणे शिकवायचा असेल तर सुरवात करण्यासाठी काही रिसोर्सेस (साधने) इथे दिलेले आहेत:

 

1. केम कलेक्टिव्ह

केमिस्ट्री लॅब्स (प्रयोगशाळा) आपल्याला नेहमी उपलब्ध होतीलच असे नाही, पण कॉम्प्युटर मात्र होऊ शकतो. केम कलेक्टिव्हची व्हर्च्युअल (आभासी) लॅब ही खऱ्या किंवा प्रत्यक्षातल्या लॅबसारखीच वाटते. शाळेमध्ये देखील उपलब्ध होऊ न शकलेल्या केमिकल्सचा (रसायने) वापर करून शेकडो सिम्युलेशन्सच्या मदतीने, विद्यार्थी त्यांना हवे तेवढ्या वेळा प्रयोग करून पाहू शकतात. एवढेच नाही, तर शिकवण्याचा वेळ वाया जाऊ नये म्हणून शिक्षक हे प्रयोग डाउनलोड करून घेऊन ते ऑफलाईन पाहू शकतात.

 

2. सायन्स बडीज

लेसन प्लान्स मिळवण्यासाठीचा हा एक सर्वसमावेशक रिसोर्स आहे. यातील प्रत्येक रिसोर्समध्ये वर्कशीट्सपासून ते प्रोजेक्टसाठीच्या कल्पना (आयडिया) दिलेल्या आहेत आणि सायन्स बडीज वरून आपण त्या प्रिंट स्वरूपात मिळवू शकतो. सायंटिफिक मेथड सेक्शन (वैज्ञानिक पद्धत विभाग) तर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण इथे प्रत्यक्ष जीवनातील एखादा सिद्धांत आकृत्या आणि क्रमवार मार्गदर्शिकेच्या मदतीने अनुभवता येतात.

 

3. रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री

प्रत्येक विद्यार्थी हा मुळातच स्पर्धात्मक वृत्ती बाळगून असतो. मग या वृत्तीला ग्रिडलॉक गेम्स सिरीजच्या मदतीने खतपाणी द्या. या गेममध्ये जर तुम्ही बरोबर उत्तर दिलेत तरच ती लेव्हल अनलॉक करता येते (पुढच्या लेव्हलकडे जाता येते). सब अॅटोमिक पार्टिकल्स ते सिम्बॉल्सपर्यंत सगळ्या गेम्समधून समस्या सोडवण्याचे कौशल्य (प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्कील) आणि सैद्धांतिक ज्ञान (थिअरॉटिकल नॉलेज) विकसित केले जाते.

 

4. फ्यूज स्कूल व्हिडिओ

वर्गात टॉपिक शिकवून झाल्यावर, सर्वात शेवटी व्हिडीओच्या माध्यमातून सारांश सांगणे हे अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे विद्यार्थ्याना ती थिअरी (सिद्धांत) चांगली लक्षात राहते, ते प्रश्न विचारतात शिवाय त्यांना कंटाळाही येत नाही. फ्यूज स्कूल व्हिडिओंमध्ये अतिशय रंजक आणि गुंतावून ठेवू शकेल अशा अॅनिमेशनचा वापर केलेला आहे, मुद्देसूद माहितीचा कटाक्षाने वापर केलेला आहे आणि मुख्य म्हणजे तो व्हिडिओ संक्षिप्त आहे- अगदी दोन ते पाच मिनिट लांबीचा.

 

5. हार्डेस्ट पिरीऑडिक टेबल क्विज एवर (आवर्त सारणीवरील सर्वाधिक कठीण प्रश्नमंजुषा)

ही प्रश्नमंजुषा बझफीडने तयार केलेली आहे. ही एकतर वर्गात प्रोजेक्टरच्या मदतीने एकत्रितपणे घेतली जाते किंवा विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या रूपात विचारली जाते. यातील प्रत्येक प्रश्न हा आवर्त सारणीशीच (पिरीऑडिक टेबल) संबंधित असतो आणि यामध्ये सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असतो अगदी सिम्बॉल्सपासून ते एलिमेंट्सच्या अॅटोमिक नंबरपर्यंत.

तुम्ही लेसन प्लान्सचा संदर्भ घ्या किंवा प्रत्येक वर्गात खेळातून पुढाकार घ्या, कॉम्प्युटरच्या मदतीने विद्यार्थी केमिस्ट्री शिकण्यात खात्रीने रस घेतील आणि सगळे सिद्धांत वर्गातच अधिक चांगल्या रीतीने त्यांना समजतील. जर तुम्हाला ठराविक विषय-संदर्भाने कॉम्प्युटरवरील रिसोर्सेस किंवा शैक्षणिक साधनांची माहिती हवी असेल, तर आमचा टीचर्स फोरम (शिक्षक मंच) तुमच्या मदतीला आहेच.