शिक्षणासाठी कॉम्प्युटर: टेक्नॉलॉजीच्या (तंत्रज्ञान) मदतीने अधिक चांगले इंग्लिश शिका

 

''लक्षात ठेवा: एक पुस्तक, एक पेन, एक मूल आणि एक शिक्षक तुमचे आख्खे आयुष्य बदलू शकतात.''

- मलाला युसफजाई

मुलांचा वर्गातील सहभाग वाढवताना आणि शिकवण्यासाठी डिजिटल साधनांचा उपयोग करताना, केलेली एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा खूप परिणामकारक ठरू शकते आणि ही अशीच एक पद्धत(मेथड) आहे. ऑनलाईन रिसोर्सेस(शैक्षणिक साधने) वापरून लेसन प्लान्स(पाठ-नियोजन) तयार करणे असो, परीक्षांचे निकाल झटपट देण्यासाठी मुलांना एखाद्या गोष्टीत गुंतवून ठेवणे असो- शिक्षकांना शाळेतील कॉम्पयुटरचा अनेक प्रकारे उपयोग होतो.

 

1. इंग्लिश क्लब

इंग्लिश क्लब, हा नवीन तसेच हंगामी शिक्षकांना, वर्कशीट्स, हँड-आऊट्स, ग्रुप अॅक्टिव्हिटीच्या युक्त्या आणि पाठ-नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त असा सर्वपरिचित स्रोत(सोर्स) आहे. ह्या वेबसाईटचा मुख्य उद्देश, शिक्षकांची अध्ययन क्षमता-वृद्धी हा असल्यामुळेच, ही वेबसाईट इतरांपेक्षा सरस ठरते. ही वेबसाईट मुख्यत:, विद्यार्थ्यांबरोबर संवाद कसा साधावा याविषयी सल्ला, ट्रेनिंग टूल्स(प्रशिक्षण साधने) आणि जगातील इतर कोणत्याही ठिकाणी असलेल्या शिक्षकांबरोबर संवाद साधण्यासाठी एक माध्यम अशा प्रकारचे रिसोर्सेस(साधने) पुरवते.

 

2. टेडएड, लेखकांची कार्यशाळा

टेडएड हे शिक्षणाचे एक उत्तम साधन(रिसोर्स) आहे. त्यातील व्हिडिओ हे संक्षिप्त स्वरुपाचे, संबंधित मालिकेचा भाग असतात आणि शिक्षण तसेच मनोरंजनाचा उत्तम मेळ साधतात. टेडएड ओरीजिनल्स आणि व्हिडीओजच्या एक्स्पर्ट्सद्वारे निर्मित द रायटर्स वर्कशॉप ही अशीच एक मालिका आहे.

याशिवाय, प्रत्येक व्हिडिओमध्ये पुढे बहु-पर्यायी प्रश्नमालिका(क्विझ), पुढील वाचन आणि प्रेक्षकांना ती संकल्पना अधिक सखोल अभ्यासता यावी, यासाठी प्रश्नोत्तरांचे तसेच चर्चांचे एक माध्यम उपलब्ध होते.

 

3. इंग्लिश भाषा शिकण्यासाठी खेळ

खेळावर आधारित शिक्षण म्हणजे मुलांसाठी मजाच मजा विशेषत: वाढत्या वयातील मुलांसाठी. शिवाय वर्गात शिकवलेल्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि त्यावर परीक्षा घेण्यासाठी हे पद्धत अगदी योग्य आहे. इंग्लिश शिकण्यासाठी खेळांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जसे- व्याकरण, शब्दसंग्रह(व्होकॅब्युलरी), स्पेलिंग आणि इतर अनेक विषय(टॉपिक्स). वेबसाईटवरील गेम्सचा उपयोग करून शिक्षक, प्रत्येक तासाच्या शेवटी दोन, दोन मुलांमध्ये किंवा समूहामध्ये वर्गातल्या वर्गात खेळ घेऊ शकतात आणि त्यामुळे वर्ग सतत उत्साही सुद्धा राहील.

 

4. मायक्रोसॉफ्ट एज्युकेटर कम्युनिटी

शिक्षक आणि एक्स्पर्ट्सचा सल्ला मिळण्यासाठी उपलब्ध असणारे एक व्यासपीठ(प्लॅटफॉर्म), शिक्षणजगतातील सद्य प्रवाहांविषयी(करंट ट्रेंड्स) चर्चा आणि कल्पनांची देवाणघेवाण करणारे, मायक्रोसॉफ्ट एज्युकेटर कम्युनिटी हे एक वाढते आणि मानाचे ऑनलाईन नेटवर्क आहे. या व्यासापीठावर दिली गेलेली माहिती शिक्षणतज्ञांमार्फत नियंत्रित केली जाते आणि त्यानंतरच त्या माहितीला विश्वासार्हता प्राप्त होते.

तंत्रज्ञानाने शिक्षणाला खऱ्या अर्थाने पुनरुज्जीवन दिले आहे कारण त्यामुळे शिक्षकांना त्यांचा वर्गातील अनुभव अधिकाधिक चांगला करण्याची संधी मिळाली आहे आणि ते शिक्षक तसेच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हितकारक आहे.

इंग्लिश भाषा शिकवण्यासाठी तुम्ही इतर कोणते साधन वापरले आहे का? #DellAarambh वापरून ट्वीट करा आणि आम्हाला कळवा!