शिक्षणासाठी पी सी चा वापर : तंत्रज्ञानाच्या मदतीने भूगोल अधिक चांगल्या प्रकारे शिकवा

 

आत्ताच्या युगात जागतिकीकरणावर आणि जागतिक वित्तव्यवस्थेवर सर्वांचे लक्ष केंद्रित होत असल्यामुळे भूगोल हा विषय अतिशय चांगल्या प्रकारे शिकविला जाणे अत्यंत आवश्यक आहे. आत्ताचे विद्यार्थी हे उद्याचे नेते बनू शकतात त्यामुळे जगातील घडामोडी समजून घेऊन त्यानुसार योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात विकसित होणे अतिशय महत्वाचे आहे.

दुर्दैवाने अनेक मुलांना भूगोल हा विषय अतिशय रूक्ष आणि कंटाळवाणा वाटतो. विद्यार्थ्यांना त्या विषयात रस निर्माण व्हावा म्हणून भूगोलाच्या शिक्षकांनी काही नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतींचा अवलंब केला पाहिजे.

1. फ्री राइस - जगातील देशांच्या राजधान्या आणि सर्व देशांचे झेंडे यांची माहिती मिळविण्यासाठी

देशांच्या राजधान्या शिकणे हे पाढे पाठ करण्याइतकेच कंटाळवाणे ठरू शकते. फ्री राइस ही युनाइटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्राम (संयुक्त राष्ट्र जागतिक अन्न कार्यक्रम) यांच्या द्वारे ना-नफा तत्वावर चालवली जाणारी वेबसाइट आहे. या वेबसाइटवर संवादात्मक खेळ उपलब्ध असतात ज्यांच्या माध्यमातून मुलांना जगातील राजधान्या आणि झेंडे लक्षात ठेवणे सोपे जाते. मुलांनी दिलेल्या प्रत्येक बरोबर उत्तरासाठी फ्री राइस ही साइट जगातील उपासमारी संपविण्याच्या दृष्टीने तांदळाचा एक दाणा दान करते. तुम्ही तुमच्या मुलांना या महान कार्याची माहिती देऊन त्यांना या साइटवरील खेळांमध्ये सहभागी व्हायला प्रोत्साहन देऊ शकता. यात मुलांचे भूगोलाचे ज्ञान ही वृद्धिंगत होते. ही एक विन - विन प्रणाली आहे.

2पर्यटन सादरीकरणे

भूगोल शिकविताना तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना विविध देश, राज्ये, शहरे आणि गावे यांच्या बद्दल शिकवत असता. या सर्व गोष्टींबद्दल अधिक परिणामकारक रितीने शिकविण्याकरीता, तुम्ही विद्यार्थ्यांना पर्यटन सादरीकरणे तयार करायला सांगू शकता. या कामासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला जगातील एक ठिकाण (देश, खंड, शहर इत्यादी) द्यावे ज्याच्या बद्दल त्यांनी माहिती शोधून काढायची. माहिती गोळा करून मग विद्यार्थी त्यांनी काय शोधून काढले ते सर्वांना समजविण्यासाठी त्याचे सादरीकरण करतील किंवा पोस्टर बनवतील किंवा माहितीपत्रक बनवतील.

3. गूगल मॅप्स चा वापर करून आभासी सहली

हे शिक्षकांसाठी फारच उपयुक्त ठरू शकते. गूगल मॅप्स चा वापर करून खूप व्यापक प्रमाणावर मुलांना चांगले ज्ञान देता येईल पण फार कमी शिक्षक त्याचा वापर करतात. तुम्ही गूगल मॅप्सचा वापर करून आभासी सहली आखू शकता, दोन ठिकाणांमधील अंतरे मोजू शकता तसेच तुम्ही दिशांचे ज्ञान मिळवून विविध मॅप्सची तुलना करू शकता.

4गुगल अर्थ

विविध खंड, देश, शहरे तसेच महासागर यांची छान माहिती मिळविण्यासाठी गुगल अर्थ हे अत्यंत उपयुक्त साधन आहे. गुगल अर्थ वापरण्याची एक पद्धत म्हणजे, जगातील एखाद्या ठिकाणी झूम करणे म्हणजेच एखादे ठिकाण मोठे करून पहाणे. एखादी जागा खूप मोठी करून विद्यार्थ्यांना त्या जागेशी संबंधित प्रश्न विचारून होय किंवा नाही मध्ये उत्तरे द्यायला सांगा. एखाद्या प्रश्नाचे होय असे उत्तर मिळाले की तुम्ही थोडेसे झूम आऊट करून ते दर्शवू शकता.

तुम्ही भूगोल शिकविण्यासाठी दूसरे कुठले साधन वापरले आहे का? #DellAarambh चा वापर करून ट्विट करा आणि आम्हाला त्याबद्दल माहिती द्या.