शिक्षणासाठी पी सी चा वापर : तंत्रज्ञानाच्या मदतीने इतिहास अधिक चांगल्या प्रकारे शिकवा

 

इतिहास शिकविणे आव्हानात्मक ठरू शकते कारण उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून तुम्ही विज्ञानातील संकल्पना आणि गणितातील प्रमेये तर शिकवू शकता पण, मुलांना आवड निर्माण होईल आणि शिकण्यास सोपे जाईल अश्या प्रकारे इतिहास कसा शिकवता येईल?

पारंपारिक पद्धतीने शिकविल्या जाणा-या इतिहासात फक्त महत्वाच्या तारखा आणि महत्वाच्या घटना मुलांकडून पाठ करून घेतल्या जातात परंतु इतिहासात या पेक्षाही कितीतरी अधिक शिकण्यासारखे असते. योग्य साधने आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शिकविल्यास इतिहास हा विषय मुलांसाठी अतिशय चित्तवेधक आणि आवडीचा ठरू शकतो.

इतिहास हा विषय अधिक चांगल्या प्रकारे शिकविण्यासाठी पुढे काही साधने आणि वेबसाइट्स दिल्या आहेत.

1. बॅटल इट आऊट व्हिडिओज् चा वापर करून इतिहासाची पुनरावृत्ती

पुस्तकात वाचून शिकण्यापेक्षा मुले ऐकून आणि प्रत्यक्षात त्या गोष्टी करून जास्त शिकतात. इतिहासाच्या तासाला केवळ पुस्तकात वाचण्यापेक्षा मुलांना त्या घटनांवर एखादी फिल्म तयार करायला लावा. मुले त्या व्हिडिओ मध्ये युद्धातील विविध प्रसंग हायलाइट करून त्या बद्दल दिग्दर्शकाचा अहवाल देखिल देऊ शकतील. ती डीव्हीडी जपून ठेवून शिक्षक पुढील वर्षीच्या मुलांना दाखवू शकतील किंवा दर वर्षी मुले नविन व्हिडिओ बनवू शकतील.  

2. गांधींसोबत "मैत्री"

शिक्षक इतिहासातील महत्वाच्या व्यक्तींची फेसबुक वर प्रोफाइल्स तयार करून विद्यार्थ्यांना त्यांच्याशी मैत्री करायला सांगू शकतात. विद्यार्थी जेव्हा इतिहासातील व्यक्तींबद्दल पुस्तकात माहिती वाचतात, तेव्हा त्यांना ते अतिशय कंटाळवाणे वाटते. परंतु जेव्हा ते त्या व्यक्तींसोबत आभासी संवाद करतात, तेव्हा त्यांना त्यात रस येऊन ऐतिहासिक घटना समजणे सोपे जाते.

कल्पना करा की तुम्ही राष्ट्रपिता गांधींसोबत मैत्री करत आहात!

3. विकी क्लासरूम्स

तुमच्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक, वापरण्यास सोप्या अश्या परिसरात इतिहास शिकवू शकता. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक घटनांचे विकी बनवायला सांगा. उदाहरणार्थ - दूस-या महायुद्धात जपान ने हवाई वर केलेला हल्ला ही घटना दिली असेल तर, एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांचा समूह त्या घटनेच्या एका भागावर माहिती बनवू शकतो तर याच घटनेच्या दूस-या भागावर दूसरा समूह माहिती बनवेल. आणि जेव्हा तुम्ही सर्वांकडून माहिती गोळा कराल, तेव्हा तुम्हाला आढळून येईल की विद्यार्थ्यांना ती घटना जवळपास पूर्ण पाठ झाली आहे.

4. नॅशनल जिऑग्राफीचे इंटरॅक्टिव मॅप्स

इंटरॅक्टिव मॅप म्हणजे वेब वर बनविला गेलेला नकाशा ज्यातील जागांवर आपण क्लिक करू शकतो. क्लिक केल्यावर एक बॉक्स दिसतो ज्यात टेक्स्ट, चित्रे, व्हिडिओज् तर असतातच शिवाय त्या विषयाशी संबंधित इतर साइट्स च्या लिंक्स दिलेल्या असतात. एखाद्या शहराशी किंवा देशाशी संबंधित इतिहासातील घटना शिकवून झाल्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना असे इंटरॅक्टिव मॅप्स बनवायला सांगू शकतात. याप्रकारच्या अतिशय साध्या साध्या गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे त्या विषयाचे ज्ञान पक्के करता येते.

विविध प्रकारची ग्रहणशक्ती असलेल्या विद्यार्थांना समान ज्ञान देण्यासाठी आणि त्यांना किती समजले आहे ते तपासण्यासाठी शिक्षकांना तंत्रज्ञानाची मदत घेता येईल. इतिहास शिकविण्यासाठी या पद्धतींचा वापर केल्यास लवकरच तो त्यांच्या आवडीचा विषय बनेल. #DellAarambh चा वापर करून ट्विट करा आणि आम्हाला तुमचा अनुभव सांगा.