शिक्षणासाठी कॉम्प्युटर: तंत्रज्ञानाच्या मदतीने फिजिक्स (भौतिकशास्त्र) अधिक चांगले शिकवा

ऑनलाईन सर्च करा - फिजिक्स

तुम्हाला दिसेल की, "फिजिक्स क्वेस्चन्स" (भौतिकशास्त्रावरील प्रश्न) असे सर्वाधिक वेळा शोधले गेले आहे, यावरून हेच लक्षात येते की, भौतिकशास्त्रातील संकल्पना समजून घेण्याकडे आणि त्याविषयी सखोल माहिती मिळवण्याकडे अनेक जणांचा कल आहे आणि मागणीही. म्हणूनच कॉम्प्युटरच्या मदतीने भौतिकशास्त्र अधिक चांगल्या रीतीने शिकवण्यासाठी तुम्ही शिक्षक म्हणून काय प्रयत्न कराल?

 

1. फिजिक्स अर्थात भौतिकशास्त्राचा वर्ग

भौतिकशास्त्र शिकवणाऱ्या एखाद्या शिक्षकाला उत्तमरीतीने तो विषय शिकवता यावा यासाठी, लेसन प्लान्स (पाठ नियोजन), सिम्युलेशन्स (मॉडेल्स किंवा प्रतिकृती), अॅक्टिव्हिटीच्या निरनिराळ्या युक्त्या, अधिक वाचन, वर्कशीट्स आणि प्रश्नमालिका (क्विझ), शा साधनांनी सुसज्ज असा एक वर्ग अपेक्षित असतो. तो वर्ग म्हणजेच फिजिक्स क्लासरूम. प्रत्येक पाठासाठी सुनिश्चित नियोजन आणि असा साधनांनी सासज्ज वर्ग उपलब्ध असेल, तर वेळही वाचतो आणि विद्यार्थ्यांना वर्गात खिळवूनही ठेवतो. आता फक्त तुमचा कॉम्प्युटर सुसज्ज झाला की गेट सेट गो...!

 

2. पीएचईटी सिम्युलेशन्स (मॉडेल्स/प्रतिकृती)

वर्गात सिम्युलेशन्स किंवा मॉडेल्स दाखवणे हे खरच उपयुक्त असते कारण त्यामुळे शिकलेले सिद्धांत (थिअरी) प्रत्यक्ष अनुभवता येतात आणि ते दैनंदिन जीवनाशी जोडून पाहता येतात. पीएचईटी मध्ये नानाविध विषयांवरची, सर्व वयोगटातील विविध शैक्षणिक स्तरांना अनुरूप अशी सिम्युलेशन्स किंवा मॉडेल्स उपलब्ध आहेत. याशिवाय, वर्गात शिकवताना वेळ वाचावा आणि शिकवताना वारंवार वापर करता यावा यासाठी, उपलब्ध असलेले ऑनलाईन सिम्युलेशन्स डाउनलोड करता येतात.

 

3. फिजिक्स सेन्ट्रल

एखादी नवीन गोष्ट, गोष्टीच्या मदतीने शिकणे हे अतिशय गंमतशीर असते आणि त्यामुळे अवघड गोष्टी अगदी सोप्या होऊन जातात. याहीपेक्षा त्या जर सुपरहिरोंच्या कॉमिक्समधून समोर आल्या तर चित्र अधिकच स्पष्ट होते. फिजिक्स सेन्ट्रल ची क्वेस्ट सिरीज ही मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे कारण कितीही अवघड सिद्धांत ती मनोरंजनातून अतिशय सोपी करून सांगते. परिणामी, ते सिद्धांत दीर्घकाळ लक्षात ठेवण्यासही मदत होते.

 

4. नासा स्पेस सेंटर

"तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचे आहे?", असा प्रश्न मुलांना विचारले असता, एक उत्तर हमखास मिळते, ते म्हणजे "अॅस्ट्रोनॉट अर्थात अंतरिक्षयात्री". अवकाश/स्पेस आणि त्याभोवतीच्या सर्वच गोष्टींचे मुलांना वेड्यासारखे आकर्षण आहे, हे अगदी साहजिक आहे. शिवाय इस्रोने(ISRO) हल्लीच पार पाडलेल्या एकाहून एक सरस कामगिरी म्हणजे चर्चेला अधिकच उधाण आले आहे. नासाच्या स्पेस प्लेसमध्ये, एरव्ही समजायला अत्यंत कठीण असलले सिद्धांत अतिशय मूलभूत घटकांच्या मदतीने सोपे करून सांगणारे अनेक व्हिडिओ आणि प्रयोग आहेत.

फिजिक्स हा विषय अतिशय सखोल आहे आणि त्याची व्याप्तीही खूप आहे. पण ज्यांना खरोखरच त्याविषयात रस आहे आणि त्याहीपेक्षा ज्यांना खूप प्रश्न पडतात, त्यांना या विषयात पुढे जाण्यासाठी खूप वाव आहे. एक शिक्षक म्हणून कॉम्प्युटर उपलब्ध करून देत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही फायदा करून घ्यायला हवा अगदी पाठ नियोजन संशोधनापासून ते वर्गात प्रत्यक्ष एखादा सिद्धांत शिकवण्यापर्यंत. [1] चला तर! कॉम्पुटरच्या सौजन्याने, शाळेत फिजिक्सच्या नवीन लाटेचा आरंभ होऊदे!