पीसी प्रो मालिका: तुमचं सादरीकरण उठून कसं दिसेल!

 

एक चित्र हजार शब्दांपेक्षा बोलकं असतं अशी एक जुनी म्हण आहे.

आपण जे बघतो त्याचा आपल्यावर खोल परिणाम होतो-म्हणूनच नेमक्या प्रतिमा असलेलं आणि सुव्यस्थित संपादन केलेलं सादरणीकरण तुमच्या शिकवण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेतं.

इमेज क्रॉप करणं

यामुळे प्रतिमेच्या योग्य त्या भागाकडे लक्ष वेधलं जातं आणि अनावश्यक भाग गाळला जातो.

कसं:

 • प्रेझेन्टेशन उघडा
 • मेन्यूमधून ‘इन्सर्ट’ निवडा
 • खाली इमेज पर्यंत स्क्रोल करा.
 • अपलोड फ्रॉम कंप्यूटर चा पर्याय निवडा.
 • प्रतिमा निवडा आणि ओपन वर क्लिक करा.
 • प्रतिमा क्रॉप करण्यासाठी तिच्यावर डबल क्लिक करा आणि काळे टॅब खेचून हव्या त्या आकारात आणा.

इमेज कॉल-आउट

हे पॉवरपॉइंटचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. कॉल-आउटमध्ये तुम्ही एखादा आकार कापून प्रतिमेच्या विशिष्ट भागाकडे लक्ष वेधू शकता.

कसं:

 • जी प्रतिमा एडिट करायची असेल ती कॉपी-पेस्ट करा.
 • दुसऱ्या चित्रावर बसवा.
 • इन्सर्ट टॅबमधून शेप्स निवडा
 • हवा असलेला आकार निवडा.
 • फॉरमॅट वर जा आणि खाली फॉरमॅट ऑप्शन्सपर्यंत स्क्रोल करा
 • फॉरमॅटच्या पर्यायांतून साईज अँड पोझिशन बॉक्सवर क्लिक करा.
 • नेमका आकार तयार करण्यासाठी रुंदी आणि उंची समान असायला हवी.
 • मूळ प्रतिमेतल्या फॉरमॅट पर्यायांमध्ये जा आणि रिड्यूस ब्राइटनेस वर क्लिक करा. यामुळे मूळ प्रतिमेच्या तुलनेत कॉल-आउट उठून दिसेल.

इमेज ओव्हरले:

अक्षरं वाचायला त्रासदायक ठरु शकतात आणि ती प्रतिमेमध्ये हरवून जाण्याची भीती असते. इमेज ओव्हरलेमुळे अक्षरं वाचण्याजोगी होतात. यात मूळ प्रतिमेवर एक पारदर्शक आकार चढवला जातो. हा आकार अक्षरं आणि प्रतिमा दोन्ही ठळकपणे दिसतील एवढा गडद असतो.

कसं:

 • इन्सर्ट मेन्यू बारवर शेप्स(आकार) निवडा
 • कोपरे कर्सरने पकडून तुमच्या प्रतिमेत नीट बसतील अशा प्रकारे खेचा.
 • मेन्यू बारवरच्या फिल कलर मध्ये जा.
 • तळाकडच्या कस्टम वर क्लिक करा.
 • पारदर्शकतेसाठी नवी विंडो उघडेल
 • ते जवळजवळ पूर्ण पारदर्शक होईपर्यंत पारदर्शकता कमी करा. प्रतिमा ही अक्षरं वाचता येण्याएवढी आणि चित्र स्पष्ट दिसण्याएवढी गडद असली पाहिजे.

ही कौशल्यं आत्मसात केलीत, तर सगळे तुमच्या सादरीकरणाकडे लक्ष देतील. त्यात आणखी प्रावीण्य मिळवण्यासाठी हे घ्या वर्गात तुमची सादरीकरणाची कौशल्यं अधिक विकसित करण्याचे पाच मार्ग