पीसी प्रो मालिका: या#जागतिकविद्यार्थीदिनानिमित्त कॉपीविरुद्ध ठाम भूमिका घ्या

 

जनरेशन झेड किंवा सहस्रकाच्या पिढीचं असण्याचा मोठा फायदा म्हणजे शाळेत कंप्यूटर असणं. तुमचा पीसी जेव्हा कार्यक्षण असतो, तेव्हा माहिती तुमच्या बोटांवर असते, याचा फक्त एकच तोटा आहे, नक्कल किंव कॉपी करणं. हे अतिशय अनैतिक आहे कारण यामुळे पुढील गोष्टींना चालना मिळते:

कल्पनेचीचोरी: यामुळेविद्यार्थीआचारसंहितेचाभंगहोतो, कारणतुम्हीइतरकुणाचीतरीकल्पनाआणिलेखनचोरता.

सहकाऱ्यांचा अनादर: जर तुम्ही इतर विद्यार्थ्यांचा गृहपाठ त्यांच्या नकळत उतरवत असाल तर त्यामुळे त्यांची उत्तरं तुम्हाला दिसण्याचा धोका संभवतो. हा गृहपाठ मुळात कोणी लिहीला हे शिक्षकांना कळणार नाही आणि जरी सत्य समोर आलं आणि त्या विद्यार्थ्याचं नाव खराब झालं नाही, तरी शाळेत तुमची फसवणूक करणारा म्हणून ख्याती होऊ शकते!

यामुळे शिक्षणाचा उद्देशच नष्ट होतो: तुमच्यात विश्लेषणात्मक विचार आणि तर्कसंगत कारणमीमांसेची क्षमता विकसित व्हावी हा शाळेत पेपर सोडवणं आणि त्यांचं मूल्यांकन करण्यामागचा उद्देश असतो. तुम्ही दुसऱ्याची कॉपी केलीत तर या शैक्षणिक उद्देशालाच हरताळ फासला जातो.

पीसीचा वापर करुन तुम्ही नक्कल कशी टाळू शकता?

गर्भितार्थ जाणून घ्या: विकीपिडीया आणि गूगल सर्चसारख्या स्रोतांमधून मिळालेली माहिती आंधळेपणाने कॉपी-पेस्ट न करता त्या माहितीचा संदर्भ समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याऐवजी ती माहिती तुम्ही स्वतःच्या शब्दांत पुन्हा लिहा.

अवतरण द्या: मजकूर इतर स्रोतांमधून उद्धृत केलाय हे दर्शवण्यासाठी अवतरणचिन्हांचा वापर करा. हे अवतरण तुम्ही जिथून घेतलं असेल अगदी तसंच असलं पाहिजे.

अचूक उद्धरण द्या: स्रोतामधून थेट घेतलेला कोणताही शब्द किंवा कल्पना अवतरणात दिली पाहिजे. चाचणीनंतर तुम्ही काढलेला निष्कर्ष अवतरणात द्यायची गरज नाही. त्याचप्रमाणे, तथ्यं किंवा सामान्य ज्ञानाशी संबंधित बाबीसुद्धा अवतरणात द्यायची गरज नसते.

संदर्भ: नक्कल टाळण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे संदर्भ देणं. तुमच्या गृहपाठाच्या शेवटी संदर्भ पृष्ठक्रमांक किंवा अवतरण दिलेल्या पुस्तकातला पृष्ठ क्रमांक द्या.

तुम्हाला नकलेपासून वाचवणारी पीसी साधनं अशी:

1.  https://www.duplichecker.com/

2. https://www.grammarly.com/plagiarism-checker

3.  https://www.quetext.com/

हे कदाचित सुरुवातीला अवघड वाटेल, पण एकदा तुम्ही नक्कल टाळण्याची सवय बाणवलीत तर त्याची तुम्हाला अतिअभ्यासू विद्यार्थी बनायला मदत होईल, म्हणूनच नकलेला नाही म्हणा आणि मौलिकतेला होकार द्या.