हल्ली पीसी हे शिक्षणाचा अविभाज्य भाग बनले आहेत

 

परमिंदर शर्मा एक लेखिका, ब्लॉगर, बँकर आणि दोन गोंडस मुलांच्या आई आहेत.

1. "शिक्षणासाठी पीसी चा वापर" याबद्दल तुमचे विचार काय आहेत?

शिक्षणामध्ये, पीसीचा जो सहभाग आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. पीसीमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला तर चांगला वाव मिळतोच, पण त्याच बरोबर डिजिटल जगात काय चालले आहे त्याबद्दलची अद्यावत माहिती देखिल मुलांना मिळते.

पीसी च्या मदतीने असाइनमेंट्स करणे असो, स्मार्ट क्लासेस असोत किंवा गृहपाठात मदत करणारी ॲप्स असोत, सध्याच्या काळात पीसी हा केवळ एक अभ्यासाचा विषय राहिला नसून, शिक्षणाचा अविभाज्य भाग बनला आहे.

2. तुमच्या पाल्याने भविष्याला सामोरे जायला तयार असावे या दृष्टीने एक पालक म्हणून तुम्ही काय करू शकता?

मुलांच्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी तर पालकांवर असतेच, त्याचबरोबर पालकांचे सर्वात महत्वाचे कर्तव्य असते ते म्हणजे मुलांना जगाला तोंड देण्यास आणि आव्हाने झेलण्यास तयार करणे. मुलांना भविष्यासाठी तयार करण्यात सध्या तंत्रज्ञानाचा मोठा हातभार लागतो. त्या तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे वापर मुलांना करू देणे इतकेच आपले काम असते.

"जेव्हा आपण मुलांना गॅजेट्सच्या व्यसनापासून मुक्त करण्याबद्दल चर्चा करत असतो, तेव्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांना तंत्रज्ञानापासून दूर करण्याऐवजी तंत्रज्ञानाचा वापर योग्य प्रकारे करण्यास शिकविण्याची गरज आहे."

जगात होणा-या सुधारणांची जितकी अद्यावत माहिती मुलांना असेल, तितका त्यांना अभ्यासात त्याचा फायदा होतो.

3. तुमच्या लहानग्यांना तुम्ही ऑनलाइन सुरक्षित कसे ठेवता?

ख-या जगाप्रमाणेच सायबर जग हे देखिल धोक्यांनी भरलेले आहे, पण त्यातील धोके प्रत्यक्ष दिसून येत नसल्याने, ते जास्त भीतीदायक आहे. मुलांना या जगाची ओळख करून देणे जितके महत्वाचे आहे तितकेच त्यांना त्यापासून सुरक्षित ठेवणे देखिल महत्वाचे आहे.

"हे मुलांना रस्ता ओलांडण्यास शिकविण्यासारखेच असते. आपण त्यांना रहदारीचे सर्व नियम सांगतो, झेब्रा क्रॉसिंग चा वापर, फूटपाथचा वापर इत्यादी शिकवतो आणि त्यांनी तसे केले की त्यांना आणखी प्रोत्साहन देतो."

मुलांना त्यांच्या सायबर हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आपण सायबर गुन्ह्यांच्या गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजेत. त्याचबरोबर त्यांच्या सायबर वापरावर लक्ष ठेवून, गरज भासल्यास योग्य ते उपाय योजले पाहिजेत.

4. साइनऑफ करण्याआधी, आम्हाला तुमच्या नविन पुस्तकाबद्दल माहिती द्या.

माझे नविन पुस्तक - फ्रॉम मंकींग टू पेरेंटिंग (माकडचेष्टांपासून ते पालकत्वापर्यंत), नातेसंबंध आणि कौटुंबिक मूल्ये यांबद्दल माहिती देते. यात पालकत्वाच्या सर्व पैलूंबद्दल लिहिले आहे. यात स्वतःला, तुमच्या जोडीदाराला, सासू-सास-यांना आणि शिक्षकांना योग्य ते महत्व देण्याबद्दल सांगितले आहे. मुलांच्या बाबतीत, आजच्या पालकांना वारंवार भेडसविणा-या शैक्षणिक समस्या, गुंडगिरी, हट्टीपणा, अतिउत्साहीपणा इत्यादी गोष्टींवर कसे उपाय योजावेत ते देखिल सांगतले आहे.