उदयोन्मुख विद्यार्थ्यांच्या खुल्या समूहाच्या विकासासाठी स्क्रीनद्वारे पोहोचणे

मागील एक-दोन वर्षांमध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मचा अवलंब केलेला दिसून येतो. जरी साथीच्या रोगापासून प्रत्येकाला सुरक्षित ठेवण्याचा हा एकमेव मार्ग असला, तरी ऑनलाइन शिक्षणाने शिक्षक आणि विद्यार्थ्यांदरम्यान एक मोठे अंतर निर्माण केले. यामुळे शिकण्याच्या प्रक्रियेवर फार मोठा परिणाम झाला आहे. दुरून शिकणे कमी अंतराचे बनविण्यासाठी काही सोपे उपाय येथे दिले आहेत:

संवादात्मक शिक्षण: प्रत्येक जणाने आवाज आणि कॅमेरा बंद ठेवल्यास विद्यार्थी सहजपणे विचलित होऊ शकतो. शिक्षण फलदायी बनविण्यासाठी संपूर्ण सत्रात मुलांचे लक्ष वेधून ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे, विद्यार्थ्यांना ऑडियो आणि व्हिडियो चालू ठेवण्यास प्रेरित करा.

मजेदार उपक्रमे: सोबत शिकणाऱ्यांची अनुपस्थिती शिकणे कंटाळवाणे बनवते. अशा प्रत्यक्ष अनुपस्थितीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी काही मजेदार गोष्टी करा. उदा. विविध वनस्पतींबद्दल बोलताना एखाद्या बागेत शिकवणे.

चाचणी घेत रहा: लहान, अचानक घेतलेल्या चाचण्यांमुळे मुले धड्यांकडे निश्चितच लक्ष देतील. विभिन्न विषयांवर आठवड्यातून एकदा एमसीक्यू किंवा एखादी लहान प्रस्तुती शिकणे मजेदार आणि परिणामकारक बनवेल. त्याशिवाय, यामुळे मुलांमधील सामाजिक कौशल्ये वाढण्यात देखील मदत मिळेल.

प्रशंसा करा आणि पुरस्कार द्या: प्रशंसा आणि पुरस्कारांमुळे मुलांना कठोर मेहनतीसाठी प्रोत्साहन मिळते. लहान पुरस्कार अतिशय उपयुक्त ठरतात आणि अचूक उत्तरासाठी केलेल्या प्रशंसेमुळे ते जागरूक राहतात. यामुळे इतर मुलांना देखील अधिक परिश्रमासाठी प्रोत्साहन मिळते.

या व्यतिरिक्त, शिक्षक संवादात्मक उपक्रमांबद्दल विचार करण्यासाठी, प्रश्नोत्तराची सत्रे आयोजित करण्यासाठी समूह बनवू शकतात आणि तसेच, ऑनलाइन शिक्षण मजेदार बनवण्यासाठी पाहुणे शिक्षकांना आमंत्रित देखील करू शकतात.